ETV Bharat / sukhibhava

Benefits of Dry Fruits :हिवाळ्यात बनवा 'ड्राय फ्रुट्सचे हेल्दी लाडू', जाणून घ्या रेसिपी - Benefits of Dry Fruits

सुका मेव्यामध्ये अनेक पोषक तत्व असतात. सुका मेवा आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे. त्यांचे सेवन केल्याने शरीराला शक्ती मिळते. अनेकजण सुका मेवा मिठाईत घालून खातात. तुम्ही अशा प्रकारे अनेक वेळा ड्रायफ्रुट्सचे सेवन केले असेल. पण, तुम्ही ड्रायफ्रूट लाडू बनवून खाल्ले आहेत का? नसेल तर आज आम्ही तुमच्यासाठी लाडू बनवण्याची रेसिपी घेऊन आलो आहोत. चला तर मग जाणून घेऊया 'ड्राय फ्रुट्सचे हेल्दी लाडू'ची (Dry Fruits Healthy Laddu) रेसिपी...

Benefits of Dry Fruits
सुक्या मेव्याचे फायदे
author img

By

Published : Nov 9, 2022, 3:25 PM IST

हैदराबाद: महाराष्ट्रात सगळीकडे चांगलीच थंडी पडायला लागली आहे. हिवाळ्यातील थंड वातावरणात शरीराला गरम ठेवण्यासाठी आहारात काही बदल करणं गरजेचे असतात. अशावेळी काही आरोग्यदायी पदार्थांचा आहारात समावेश करण्यात येतो. थंडीमध्ये ड्रायफ्रुट्स, गुळ, शेंगदाणे, डिंक आणि सुंठ असे पदार्थ खाण्याचा सल्ला देण्यात येतो. (Dry Fruits Healthy Laddu)

साहित्य: बदाम - १ कप, काजू - १ कप, पिस्ता - १/२ कप, खरबूज बिया - 2 टीस्पून, खजुराचे तुकडे - १/२ कप, वेलची पावडर - 2 टीस्पून, तूप - आवश्यकतेनुसार

कृती: प्रथम कढई गरम करा आणि कढईत तूप टाका. तूप गरम करून त्यात चिरलेला पिस्ता, खरबूज, काजू, बदाम टाका. हे सर्व ड्राय फ्रूट्स मिश्रणात चांगले मिसळा. खजूर मिक्सरमध्ये टाका आणि बारीक करून घ्या. वेगळ्या पॅनमध्ये, खजूर पेस्ट घाला. मिश्रण सुमारे 3-4 मिनिटे शिजवा. आता त्यात थोडे तूप घालून नीट मिक्स करा. यानंतर वेलची पावडर आणि भाजलेले ड्रायफ्रुट्स घाला. मिश्रण चांगले तळून घ्या. मिश्रण तळल्यानंतर थंड होण्यासाठी ठेवा. मिश्रण थंड झाल्यावर हातात तूप लावून लाडू तयार करा. त्याच मिश्रणातून गोलाकार लाडू तयार करा.तुमचे चविष्ट ड्रायफ्रूट लाडू तयार आहेत. हवाबंद डब्यात साठवा, त्यानंतर तुम्ही त्यांचा कधीही स्वाद घेऊ शकता. तयार लाडू एका डब्ब्यामध्ये भरून ठेवा.

ड्राय फ्रुट्सचे लाडू खाल्ल्याचे फायदे: अनेक पोषक तत्त्वांनी समृद्ध तसेच प्रथिने आणि फायबरयुक्त सुकामेवा खाल्ल्याने शरीराला ऊर्जा (Benefits of Dry Fruits ) मिळते. यामध्ये जीवनसत्त्व ई, कॅल्शियम, सेलेनियम, कॉपर, मॅग्नेशियम आणि रायबोफ्लेविन हे घटक भरपूर प्रमाणात असतात याशिवाय लोह, पोटॅशियम, जस्त आणि जीवनसत्त्व बी, नियासिन, थायमिन आणि फोलेट ही तत्त्वेही सुकामेव्यामध्ये असतात. त्यामुळे सुकामेव्याचे दररोज सेवन करणे शरीरासाठी फायदेशीर असते. दररोज सकाळी उपाशीपोटी ड्राय फ्रुट्सचे लाडू खावे. त्याव्यतिरिक्त सायंकाळी नाश्त्याच्या वेळीही खाल्ला (Dry Fruits Laddu) तरी चालतो, मात्र अति प्रमाणात खाऊ नये.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.