लहान मुलांना रोज सकाळच्या नाश्त्यामध्ये ड्राय फ्रुट्सपासून बनलेलं ड्रिंक्स प्यायला देणं अत्यंत लाभदायक असतं. यामुळे त्यांच्या मेंदूचा विकास (Brain development) होईल, बुद्धी तल्ल्ख होईल. अशावेळी पालकांनी खास करून योग्य आहारावर (healthy food) आणि पौष्टिक डिशेसवर भर द्यायाला हवा. आज आम्ही घरगुती प्रोटीन पावडरबद्दल सांगणार आहोत. त्यात अनेक महत्त्वपूर्ण तत्त्वे असतात जी शरीराला फायदेशीर ठरतात. तसेच ते शरीराला अत्यंत पोषक ठरते. ही प्रोटीन पावडर तुम्ही तुमच्या बाळाला पाण्यात किंवा दूधात घालून देऊ शकता. तसेच या पावडरचे लाडूदेखील बनवू शकता. यामुळे शरीरात दिवसभर एनर्जी सुद्धा राखली जाईल.
प्रोटीन पावडरचे सेवन केल्याने शरीर तयार होण्यास मदत होते, परंतु ही प्रोटीन पावडर थोडी महाग असते. बऱ्याचदा बाजारातील प्रोटीन पावडरचा आपल्या शरीरावर काही घातक परिणाम झाला तर..? अशी भितीदेखील आपल्या मनात असते. तुम्ही आता ही प्रोटीन पावडर घरच्या घरीच बनवू शकता.. चला तर मग जाणून घेऊया प्रोटीन पावडर तयार करण्याची खास रेसिपी.
साहित्य : १. बदाम (१०० ग्राम) २. काजू (१०० ग्राम) ३. अक्रोड (१०० ग्राम) ४. पिस्ता (१०० ग्राम) ५. वेलची (१०) ६. उडीद डाळ (२०० ग्राम) ७. मुग डाल (१५० ग्राम) ८. ओट्स (१५० ग्राम) ९. गव्हाचे सत्व (१५० ग्राम) १०. तीळ (१५० ग्राम) ११. नाचणीचे पीठ (५०० ग्राम) १२. सोयाबीनचे पीठ (२०० ग्राम)
कृती: उडीद डाळ, मुगाची डाळ, गव्हाचे सत्व आणि ओट्स वेगवेगळे करून कढईत छान भाजणीचा वास लागेपर्यंत भाजून घ्या. सगळा सुकामेवा भुरकट रंग येण्यासाठी एकत्र भाजा. भाजून झाल्यावर हे सर्व थंड होण्यासाठी बाजूला ठेवा. प्रत्येक घटक हा कमीत कमी ३-४ मिनिटे भाजला गेला पाहिजे. ह्यातील मुग डाळ, उडीद डाळ, गव्हाचे सत्व, ओट्स, तीळ, नाचणी, आणि सोयाबीन मिक्सर मधून काढून घ्या. ह्यांची बारीक पूड होईल असे बघा. ह्या सर्वांचे पीठ एकजीव करा. कमीत कमी ५-६ मिनिटे मिक्सर मधून फिरवा म्हणजे पीठ बारीक होईल. जर पीठ मऊ नसेल तर गरजेएवढे बारीक करा. हे मिश्रण रेफ्रिजरेटर मध्ये ठेवा. काही काळानंतर येणारा खवट वास टाळण्यासाठी फ्रीज मधेच राहू दया. हे पीठ थोडे गरम दुध आणि गुळ एकत्र करून दिल्यास त्याची चव छान लागते आणि वासही छान येतो. यात वापरलेल्या घटकांमुळे बाळाला हे खायला देखील आवडेल.