हैदराबाद : समाज आणि समाजाच्या विकासात भाषांची महत्त्वाची भूमिका याबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी 30 सप्टेंबर रोजी 'आंतरराष्ट्रीय अनुवाद दिन' साजरा केला जातो. हा दिवस भाषा व्यावसायिकांच्या कार्याचं करणयाचा दिवस आहे, जे राष्ट्रांना एकत्र आणण्यात, संवाद, समज आणि सहकार्य सुलभ करण्यासाठी, विकासात योगदान आणि जागतिक शांतता, सुरक्षा मजबूत करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात.
'आंतरराष्ट्रीय अनुवाद दिना'चा इतिहास : 'आंतरराष्ट्रीय अनुवाद दिन' दरवर्षी ३० सप्टेंबर रोजी साजरा केला जातो. 24 सप्टेंबर 2017 रोजी, संयुक्त राष्ट्र महासभेनं 30 सप्टेंबर हा आंतरराष्ट्रीय अनुवाद दिन म्हणून घोषित करणारा ठराव संमत केला. प्रत्येक देशाची स्वतःची भाषा असते, तर भारत असा देश आहे ज्यामध्ये 22 भाषांना अधिकृत भाषेचा दर्जा आहे. 122 प्रमुख भाषा आहेत आणि त्याशिवाय इतर 1599 भाषा आहेत. जर आपण जगाबद्दल बोललो तर संपूर्ण जगात 7.151 भाषा आहेत. या सर्व भाषांचं भाषांतर करण्याचं काम अनुवादक करतो.
बायबल भाषांतरकाराचा जन्म : ३० सप्टेंबर ही तारीख आंतरराष्ट्रीय भाषांतर दिन म्हणून साजरी करण्यासाठी निवडण्यात आली कारण त्या दिवशी सेंट जेरोम या बायबल भाषांतरकाराचा जन्म झाला. सेंट जेरोम हे ईशान्य इटलीतील एक धर्मगुरू होते, जे बायबलच्या नवीन कराराच्या ग्रीक हस्तलिखितांचं लॅटिनमध्ये भाषांतर करण्याच्या त्यांच्या प्रयत्नांसाठी ओळखले जातं. त्यांनी हिब्रू गॉस्पेलचे काही भाग ग्रीकमध्ये भाषांतरित केले. 24 मे 2017 रोजी, सर्वसाधारण सभेनं भाषा व्यावसायिकांना आवाहन करणारा ठराव मंजूर केला आणि आंतरराष्ट्रीय अनुवाद दिवस घोषित केला. इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ ट्रान्सलेटर, FIT, ज्याची स्थापना 1953 मध्ये झाली, 1991 मध्ये जगभरात या व्यवसायाला प्रोत्साहन देण्यासाठी भाषांतर दिन ओळखण्याची कल्पना सुरू केली.
अनुवादक बजावतात महत्त्वाची भूमिका : भारताबद्दल बोलायचं झालं तर, उत्तरेत राहणाऱ्या नागरिकांना दक्षिणेतील भाषा येत नाहीत, पण तरीही त्यांनी बनवलेले चित्रपट सर्वत्र लोकप्रिय आहेत. कारण हे चित्रपट इतर अनेक भाषांमध्ये डब केले जातात. जेणेकरून भारताबरोबरच बाहेरच्या देशांनाही हे दक्षिणेचे चित्रपट पाहता येतील. यासोबतच इतर देशांतील अनेक चित्रपट भारतीय भाषांमध्ये अनुवादित केले जातात. जेणेकरून आपण ते चित्रपट पाहू शकू. मग जेव्हा राजकारणाचा विषय येतो तेव्हा आपलं मत मांडण्यासाठी आणि इतरांना समजून घेण्यासाठी अनुवादकाची गरज असते. पाहिले तर जगातील देशांना जोडण्यात अनुवादक महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. या योगदानाचा गौरव करण्यासाठी 'आंतरराष्ट्रीय अनुवाद दिन' सुरू करण्यात आला आहे. हा दिवस दरवर्षी एक थीम घेऊन साजरा केला जातो.
'आंतरराष्ट्रीय अनुवाद दिना'ची थीम : 'आंतरराष्ट्रीय अनुवाद दिन' 2023ची थीम 'भाषांतर मानवतेचे अनेक चेहरे प्रकट करतं' ही आहे. या थीमच्या आधारावर हा दिवस साजरा केला जाईल.
हेही वाचा :