ETV Bharat / sukhibhava

International Street Children Day 2023 : का साजरा करण्यात येतो इंटरनॅशनल स्ट्रीट चिल्ड्रेन डे, काय आहे इतिहास - रस्त्यावर भीक मागण्याची वेळ

जगभरात रस्त्यावर भीक मागून जगणाऱ्या बालकांची संख्या किमान 150 दशलक्ष असल्याचे विविध आकडेवारीवरुन स्पष्ट झाले आहे. भारतातही रस्त्यावर भीक मागणाऱ्या बालकांची संख्या मोठी असून सर्वाधिक भिकारी मुंबईत असल्याचेही स्पष्ट झाले आहे.

International Street Children Day 2023
संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : Apr 11, 2023, 3:48 PM IST

हैदराबाद : जगभरात रस्त्यावर आयुष्य जगणाऱ्या मुलांचा विदारक प्रश्न निर्माण झाला आहे. या मुलांच्या विविध अडचणी सुजाण नागरिकांना भेडसावतात. या मुलांच्या शैक्षणिक, निवारा, इतकेच काय उदर निर्वाहाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र कोणतीच सोय उपलब्ध नसल्याने या मुलांना रस्त्यावर भीक मागण्याची वेळ येते. त्यामुळे या मुलांच्या भविष्याच्याबाबत जनजागृती करण्यासाठी 12 एप्रिलला इंटरनॅशनल स्ट्रीट चिल्ड्रेन डे साजरा करण्यात येते.

रस्त्यावर राहणाऱ्या मुलांची किती आहे संख्या : जगभरात रस्त्यावर राहणाऱ्या मुलांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला असून त्यांची समस्या भारतातही मोठी आहे. जगभरात रस्त्यावर राहणाऱ्या मुलांची संख्या किमान 100 ते 150 मिलियन असल्याचा दावा विविध साईटवरील अहवालानुसार करण्यात येतो. त्यामुळे जगभरातील 100 ते 150 मिलियन मुले रस्त्यावर आपले आयुष्य जगत असल्याचे स्पष्ट होते. या मुलांना कोणत्याही शैक्षणिक सुविधा उपलब्ध नाहीत. त्यांच्या रोजच्या जेवणाचा प्रश्न बिकट असल्याने त्यांना रस्त्यावर भीक मागून आयुष्य जगावे लागते.

काय आहे इंटरनॅशनल स्ट्रीट चिल्ड्रेन डेचा इतिहास : युनोने 1989 ला मुलांच्या हक्कांसाठी एका सभेचे आयोजन केले होते. त्यानुसार रस्त्यावरील मुलांच्याबाबत विविध प्रकारचे हक्क त्यांना मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे ठरवण्यात आले होते. त्यानुसार या मुलांना प्रेमळ वातावरणात वाढ, त्यांना आरोग्य आणि पोष्टीक खाद्य, शुद्ध पिण्याचे पाणी, वीज, स्वातंत्र्य आदी विविध सुविधा पुरवण्यासाठी सगळ्या देशांनी सहकार्य करण्याचा ठराव करण्यात आला. त्यामुळे इतर देशांनीही याबाबत विविध सुविधा रस्त्यावरील मुलांना देण्याचे प्रयत्न सुरू केले. या सभेनंतर 12 एप्रिल 2011 पासून इंटरनॅशनल स्ट्रीट चिल्ड्रेन डे साजरा करण्याला सुरुवात झाली.

मुंबईच्या रस्त्यावर आहेत सर्वाधिक भिकारी : भारतातील मुंबई, दिल्ली, कोलकाता, चेन्नई, बंगळुरू आदी मोठ्या शहरातील रस्त्यावर मोठ्या संख्येत भिकारी असल्याचे दिसून येते. मात्र मुंबईच्या रस्त्यावर सर्वाधिक भिकारी असल्याचे विविध अहवालातून स्पष्ट झाले आहे. मुंबईत भीक मागणारी 18 वर्ष वयाचे तब्बल 25 टक्के भिकारी असल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे हे सगळे भिकारी रस्त्यावर राहून आपला उदरनिर्वाह करत आहेत.

रस्त्यावरील मुले लागतात वाम मार्गाला : औद्योगिकीकरणामुळे बहुतेक नागरिकांनी शहराकडे धाव घेतली आहे. मात्र यातील अनेक जण रस्त्यावर राहुन आपला उदरनिर्वाह करतात. त्यामुळे औद्योगिक शहरात सर्वाधिक भीक मागणारी मुले असल्याचे दिसून येते. त्यातही रस्त्यावर भीक मागणाऱ्या बालकांना वाम मार्गाला लावण्याचा किळसवाना प्रकार काही समाज कंटकांकडून होत असल्याचे विविध साईटवरील अहवालानुसार स्पष्ट होते. त्यामुळे अशा समाज कंटकांना आळा घालणे गरजेचे आहे.

हेही वाचा - World Parkinsons Day 2023 : काय आहे पार्किन्सन्स आजार, जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.