हैदराबाद : सध्या विभक्त कुटुंब पद्धती निर्माण झाल्यामुळे नागरिकांना एकाकी आयुष्य जगावे लागते. मात्र कुटूंब हा समाजाचा पाया आहे. त्यामुळे नागरिकांनी कुटूंब संस्थेच्या माध्यमातून कल्याण करने गरजे आहे. विभक्त कुटूंब पद्धती रुजल्याने सामाजिक संरचना बदलली आहे. मात्र या बदलणाऱ्या सामाजिक संरचनेत कुटूंबाला महत्व प्राप्त होण्यासाठी जागतिक पातळीवर प्रयत्न करण्यात आले. त्यासह जग हे देखील एक कुटूंबच असल्याची संकल्पना पुढे आली. त्यामुळे संयुक्त राष्ट्र संघाने 1994 हे वर्ष आंतरराष्ट्रीय कुटुंब वर्ष म्हणून घोषित केले आहे. तेव्हापासून 15 मे हा दिवस आंतरराष्ट्रीय कुटुंब दिन म्हणून साजरा करण्यात येतो.
काय आहे आंतरराष्ट्रीय कुटूंब दिनाचा इतिहास : मानवाची सुरुवात आदिमानवापासून झाली. त्यानंतर मानव गट करुन राहू लागला. त्यानंतर मानवाला जशी समज येत गेली, त्यानुसार मानवाने कुटूंबाला सुरूवात केली. त्यामुळे आदिम काळापासून सुरू झालेली कुटूंबाची संरचना आजही तितकीच महत्वाची आहे. मात्र आता काही नागरिक विभक्त कुटूंब पद्धतीने राहत असल्याने त्यांना कुटूंबाचे महत्व फारसे वाटत नाही. काही नागरिक तर त्यांच्या जीवनात कुटुंबाला अजिबात महत्त्व देत नाहीत. त्यामुळे संयुक्त राष्ट्र संघाने 1993 मध्ये नागरिकांमध्ये कुटुंबांचे महत्त्वाबाबत जनजागृती केली. याचवर्षी 15 मे आंतरराष्ट्रीय कुटूंब दिन म्हणून साजरा करण्याची घोषणा केली. त्यानंतर संयुक्त राष्ट्र संघाने 1994 पासून दरवर्षी 15 मे हा दिवस आंतरराष्ट्रीय कुटुंब दिन म्हणून साजरा केला जातो.
काय आहे कौटुंबिक दिनाचा उद्देश : संयुक्त राष्ट्र महासभेने मूलभूत कुटुंब पद्धतीचे महत्त्व ओळखले आहे. त्यामुळे 1993 मध्ये 15 मे हा आंतरराष्ट्रीय कुटुंब दिन म्हणून संयुक्त राष्ट्राने घोषित केला. त्यानंतर 15 मे 1994 रोजी पहिल्यांदा हा दिवस साजरा करण्यात आला. कौटुंबिक व्यवस्था हा सामाजिक सुसंवाद आणि समाजाचा सर्वात महत्वाचा घटक आहे. संयुक्त राष्ट्रसंघ १९९६ पासून या दिवसासाठी वार्षिक थीम सादर करत आहे. युनायटेड नेशन्सच्या सरचिटणीसांनी सार्वजनिक धोरणकर्त्यांना कुटुंब व्यवस्थेतील अडथळे दूर करण्याचे आवाहन केले आहे. पालकांच्या कामाची परिस्थिती त्यांना त्यांच्या कुटुंबात गतिशील भूमिका बजावण्यासाठी प्रभावित करते. कौटुंबिक स्तरावर बालकांच्या पोषणाबाबत गरजा आधारित धोरणे विकसित करण्यासाठी कार्य करणार्या धोरणकर्त्यांसाठी आंतरराष्ट्रीय कुटुंब दिन लक्ष वेधून घेणारा आहे. अकार्यक्षम कुटुंबव्यवस्था कार्यरत समाज निर्माण करू शकत नाही.
कुटुंब दिनाचे प्रतीक : आंतरराष्ट्रीय कुटुंब दिनाचे प्रतीक लाल आकृतीसह हिरव्या वर्तुळाचा समावेश आहे. यात हृदय आणि घरे यासारख्या साध्या प्रतिमांचा समावेश आहे.
पितृसत्ताक भारतीय कुटुंब पद्धती : बहुतेक समाजशास्त्रीय अभ्यासात आशियाई आणि भारतीय कुटुंबांना पितृसत्ताक आणि संयुक्त कुटुंब पद्धती मानतात. या पद्धतीत तीन किंवा अधिक पिढ्या एकत्र राहतात. संरचनात्मकदृष्ट्या भारतीय संयुक्त कुटुंबात आजी-आजोबा, आई-वडील, काका, काकू, भाची आणि पुतण्या यांच्यासह तीन ते चार पिढ्या असतात. ते एकाच घरात एकत्र राहतात आणि एकच स्वयंपाकघर वापरतात.
बदलत आहे भारतीय कुटुंब पद्धती : विभक्त कुटुंब पद्धती भारतात देखील प्रचलित आहे. परंतु संयुक्त राष्ट्रसंघाच्या 2019 च्या जागतिक महिला अहवालानुसार भारतात एकल माता असलेल्या कुटुंबांची टक्केवारी वाढत आहे. विभक्त कुटुंब पद्धतीचा पाया जसा वाढला आहे, त्याचप्रमाणे एकल कुटुंबांची टक्केवारीही वाढली आहे. देशात घटस्फोटाच्या वाढत्या प्रमाणानुसार एकल मातांच्या टक्केवारीतही वाढ झाली आहे. 25-54 वयोगटातील अर्ध्याहून अधिक अविवाहित महिला काम करतात. शक्यतो कौटुंबिक अडचणी किंवा गरजांमुळे या समस्या उद्भवतात. अविवाहित पुरुषांपेक्षा जास्त टक्के विवाहित पुरुष श्रमशक्तीमध्ये सहभागी होतात. म्हणजे विवाहाचा त्यांच्या सहभागावर परिणाम होत नसल्याचे या अहवालातून स्पष्ट झाले आहे.
हेही वाचा -