शरीरातील अनेक समस्या कमी करण्यासाठी डिटॉक्स वॉटर (Detox Water) खूप उपयुक्त आहे. हे केवळ शरीराला हायड्रेट करत नाही तर शरीरातील वाढणारे टॉक्सिन कमी करते. त्याच्याशी संबंधित गोष्टी जाणून घ्या. या डिटॉक्स वॉटरमुळे तुमचे शरीर डिटॉक्स होण्यास मदत होते. ते प्यायल्याने शरीरातील घाण साफ होते. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे त्यात कॅलरीजचे प्रमाण नगण्य आहे, त्यामुळे ते प्यायल्याने वजन कमी होते. याशिवाय, ते चयापचय मजबूत करते, पचन सुधारते आणि शरीराला हायड्रेट ठेवते. जर तुम्ही दररोज डिटॉक्स पाणी प्यायले तर त्यामुळे त्वचेवर चमक येते.
बॉडी डिटॉक्सिफिकेशन (Body Detoxification): विविध फळे, भाज्या आणि औषधी वनस्पती पाण्यात मिसळून डिटॉक्स वॉटर ड्रिंक्स तयार केले जातात. डिटॉक्स वॉटर, जे विविध महत्त्वपूर्ण पोषक आणि अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध आहे. हे डिटॉक्स वॉटर शरीरात जमा झालेले विषारी आणि आरोग्यास हानीकारक पदार्थ बाहेर टाकते. या प्रक्रियेला बॉडी क्लीन्स किंवा बॉडी डिटॉक्सिफिकेशन म्हणतात. डिटॉक्सिफिकेशन चयापचय वाढवू शकते, जे वजन कमी (Weight Loss) करण्याच्या प्रक्रियेला देखील गती देऊ शकते. डिटॉक्स वॉटर घरी सहजपणे बनवता येते.
डिटॉक्स पाणी पिण्याचे आरोग्य फायदे (Benefits of Detox Water): शरीर हानिकारक घटकांपासून मुक्त होते, पचनशक्ती वाढवते, ज्यामुळे आम्लपित्त, बद्धकोष्ठता आणि सूज येणे यासारख्या समस्या कमी होतात, त्वचेवर नैसर्गिक चमक येते, वजन कमी करू शकते, बाॅडी हायड्रेट राहण्यास मदत होते, किडनी स्टोनचा धोका कमी होऊ शकतो, शरीरातील पीएच पातळी संतुलित राहते, इत्यादी.
डिटॉक्स वॉटर बनवण्याकरिता लागणारे साहित्य? एक मोठे लिंबू, काकडी, बर्फाचे तुकडेआणि 4 ग्लास पाणी घ्या.
असे बनवा डिटॉक्स वॉटर: लिंबू आणि काकडीचे डिटॉक्स वॉटर बनवण्यासाठी प्रथम लिंबाचे तुकडे करा. लिंबानंतर काकडीचेही तुकडे करा. हे तुकडे दोन्ही एका भांड्यामध्ये टाका आणि पाणी घालून त्यात बर्फाचे तुकडे मिसळा. हे रात्रभर ठेवले तर त्याची चव अजून चांगली होते. जर तुम्ही दररोज 1 ग्लास प्याल पाणी प्याल तर तुमच्या शरीरातील विषारी पदार्थ निघून जातात.