ETV Bharat / sukhibhava

तणाव आणि थकवा असू शकतं काम करण्याची क्षमता कमी होण्यामागचं कारणं; जाणून घ्या शांत झोपेची का आहे गरज - Stress and fatigue

Importance of sleep : अनेकदा कामामुळं आपण आपल्या तब्येतीकडं लक्ष देत नाही आणि तब्येत बिघडल्यामुळं आपल्याला चांगलं काम करता येत नाही. आपण याकडं फारसं लक्ष देत नाही आणि हे चक्र असेच सुरू राहतं. आपल्या आरोग्यासाठी आणि कामाच्या कामगिरीसाठी पुरेशी झोप घेणं खूप महत्त्वाचं आहे. झोप तुमची काम करण्याची क्षमता कशी सुधारते, ते जाणून घ्या.

Importance of sleep
शांत झोपेची का आहे गरज
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 24, 2023, 11:57 AM IST

हैदराबाद : झोपेच्या कमतरतेमुळं आपल्या आरोग्यावर आणि कामावर परिणाम होतो. आपल्या शरीराला दररोज 7-8 तासांची झोप आवश्यक असतं. या काळात तुमचा मेंदू आणि शरीराचे इतर अवयव चांगलं कार्य करू शकतील. पण झोप न मिळाल्यानं आपल्या शरीरातील थकवा दूर होत नाही, ज्याचा परिणाम आपल्या कामावर होतो. चांगली झोप ऑफिसमध्ये तुमची कामाची क्षमता वाढवण्यास मदत करते. त्यामुळं दररोज पूर्ण झोप घेणं अत्यंत आवश्यक आहे.

चांगली स्मरणशक्ती : झोपेच्या कमतरतेचा तुमच्या स्मरणशक्तीवर परिणाम होतो. झोपेच्या कमतरतेमुळे कामावर लक्ष केंद्रित करणं कठीण होऊन काम करण्याची क्षमता प्रभावित होते. झोपेच्या कमतरतेमुळे निर्णय घेण्याच्या क्षमतेवरही विपरीत परिणाम होतो आणि समस्या सोडवण्याची क्षमताही कमी होते, ज्यामुळे कार्यालयातील तुमची कामगिरी नकारात्मकदृष्ट्या प्रभावित होऊ शकते. त्यामुळे चांगली झोप घेणे खूप गरजेचं आहे.

कमी आजारी पडता : झोपेच्या कमतरता अनेक आजारांना निमंत्रण देते. त्यामुळे तुमच्या काम करण्याच्या क्षमतेवरही परिणाम होतो. खराब आरोग्यामुळं तुमच्या कामाची कार्यक्षमता कमी होते आणि तुम्ही चांगल्या पद्धतीनं काम करू शकत नाही. झोपेच्या कमतरतेमुळे, रक्तदाब आणि हृदयविकाराचा धोका देखील असतो, ज्यामुळे तुमच्या आयुष्यावर वाईट परिणाम होतो.

मूड चांगला राहतो : झोपेच्या कमतरतेमुळं तुमची चिडचिड होऊ शकते, ज्यामुळं ऑफिसमधील लोकांसोबत तणाव निर्माण होऊ शकतो. त्यामुळं पुरेशी झोप आणि चांगली झोप या दोन्ही गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. पुरेशी झोप घेतल्यानं तुमचा मूड सुधारतो आणि तणावही कमी होतो. या कारणामुळं तुम्ही कामावर अधिक चांगल्या प्रकारे लक्ष केंद्रित करू शकता.

उत्पादकता वाढते : तुम्ही निर्धारित वेळेत किती काम करू शकता याला तुमची उत्पादकता म्हणतात. झोपेच्या कमतरतेमुळं, तुमचं लक्ष कमी होते, जे उत्पादकता कमी होण्याचं सर्वात मोठे कारण आहे. त्यामुळे पूर्ण झोप घेणे अत्यंत आवश्यक आहे. याव्यतिरिक्तं चांगली झोप घेतल्यानं तुमची सर्जनशीलता देखील वाढते, जे तुम्हाला तुमचं काम मजेदार आणि चांगल्या पद्धतीनं करू देते.

( डिस्क्लेमर : नमूद केलेला सल्ला आणि सूचना केवळ सामान्य माहितीच्या उद्देशानं आहेत. व्यावसायिक वैद्यकीय सल्ला म्हणून घेऊ नयेत. आपल्याला काही प्रश्न किंवा चिंता असल्यास, नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. )

हेही वाचा :

  1. वाढत्या वयानुसार औषधं घेताना बाळगा सावधगिरी; होवू शकतात परिणाम
  2. हिवाळा कंटाळवाणा वाटतो? तुमच्या आहारात करा ऊर्जादायी पदार्थांचा समावेश
  3. दात आणि हिरड्या निरोगी ठेवू इच्छिता? या टिप्स फॉलो करा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.