ETV Bharat / sukhibhava

हायपरथर्मिया म्हणजे काय? जाणून घ्या कसं टाळावं! - what hyperthermia is

Hyperthermia Symptomps : हायपरथर्मिया हा एक आजार आहे. यामध्ये शरीरातील उष्णता सामान्यपेक्षा जास्त वाढते. या समस्या अनेक कारणांमुळे असू शकतात. या कारणांमध्ये हवामानातील बदल, तापमानातील चढ-उतार आणि थकवणारे काम यांचा समावेश होतो.

Hyperthermia Symptomps
हायपरथर्मिया
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 10, 2023, 12:58 PM IST

हैदराबाद : हायपरथर्मियामध्ये शरीरातील उष्णता सामान्यापेक्षा जास्त वाढते. हा आजार अनेक कारणांमुळे होऊ शकतो. या कारणांमध्ये बदलत्या हवामानाची परिस्थिती, तापमानातील चढउतार आणि थकवणारे काम यांचा समावेश असू शकतो. याव्यतिरिक्त विशिष्ट औषधे वापरल्यानं हायपरथर्मियादेखील होऊ शकतो. जेव्हा आपल्या शरीरातून घाम योग्य प्रकारे बाहेर पडत नाही, तेव्हा शरीरात उष्णता वाढू लागते. याला हायपरथर्मिया रोग म्हणतात. या आजारावर वेळेवर उपचार न केल्यास तुम्हाला गंभीर समस्या उद्भवू शकतात. हायपरथर्मिया रोग टाळण्यासाठी त्याची कारणे आणि लक्षणे जाणून घेणं फार महत्वाचे आहे

हायपरथर्मिया रोग टाळण्याचे मार्ग:

  • भरपूर पाणी प्या: हायपरथर्मिया टाळण्यासाठी स्वतःला हायड्रेटेड ठेवा. जेव्हा शरीरातील पाण्याच प्रमाण कमी होते, तेव्हा आपल्याला शरीरांतर्गत तापमानावर नियंत्रण ठेवणं अधिक कठीण होतं. घाम येणं हा आपल्या शरीराला थंड करण्याचा मार्ग आहे. शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी भरपूर पाणी प्या. दिवसातून 8 ग्लास पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. उन्हाळ्यात बाहेर वेळ घालवताना पाण्याची बाटली सोबत ठेवा.
  • योग्य पोशाख करा: हायपरथर्मिया टाळण्यासाठी योग्य कपडे घाला. हायपरथर्मियाग्रस्त लोकांसाठी हलके रंग आणि सैल कपडे वापरण्याची शिफारस केली जाते. या कपड्यांमुळे हवा शरीरात चांगली पोहोचते. तर, सुती कपडे हा एक चांगला पर्याय असू शकतो. कारण हे कपडे घाम शोषून घेण्यास आणि शरीर थंड ठेवण्यास मदत करतात.
  • शरीर थंड ठेवा : जर तुम्ही उन्हाळ्यात बाहेर वेळ घालवत असाल तर काही वेळ सावलीत बसणेही गरजेचं आहे. जास्त वेळ उन्हात राहिल्याने शरीराचे तापमान वाढू शकते. त्यामुळे शरीर थंड ठेवण्यासाठी सावलीत थोडा वेळ घालवा.
  • औषधांविषयी माहिती असणे गरजेचे : आजच्या काळात लोक अनेक आरोग्य समस्यांना बळी पडतात. या समस्या टाळण्यासाठी लोक विविध प्रकारची औषधे घेतात. काही औषधांमुळे हायपरथर्मियाचा धोका वाढू शकतो. यामध्ये उच्च रक्तदाब आणि हृदयाशी संबंधित आजारांवरील औषधांचा समावेश आहे. तुम्ही एखादे औषध घेत असाल तर उन्हाळ्यात त्या औषधांमुळे होणाऱ्या त्रासाबाबत डॉक्टरांचा सल्ला घ्या.
  • ही लक्षणे हायपरथर्मियाला कारणीभूत आहेत: जर तुम्हाला चक्कर येणं किंवा स्नायू सुजणं जाणवू लागले, तर हे शरीर जास्त गरम होण्याची चिन्हे असू शकते. त्यामुळे आराम करण्याचा प्रयत्न करत स्वतःला हायड्रेट ठेवा.

हेही वाचा :

  1. कांद्याच्या सुकलेल्या पापुद्र्याचे अनेक फायदे, फेकून देत असाल तर हे नक्की वाचा
  2. हिवाळ्यात अशा प्रकारे नवजात बाळाची काळजी घ्या
  3. हिवाळ्यात गोड पदार्थ आवडत असतील तर बनवा 'हा' हेल्दी आणि चविष्ट केक

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.