हैदराबाद : पुरेशी झोप घेणं आपल्या आरोग्यासाठी आवश्यक आहे. जेव्हा आपण झोपतो तेव्हा आपलं शरीर विश्रांतीच्या स्थितीत जातं आणि दिवसभराच्या थकव्यातून बाहेर पडत. यावेळी आपल्या शरीराचे सर्व अवयव स्वतःला पुनर्स्थापित करतात. आपलं शरीर आराम करतं. निरोगी राहण्यासाठी 7-8 तासांची झोप घेणं आवश्यक आहे. झोपेच्या कमतरतेमुळं आरोग्याशी संबंधित अनेक समस्या उद्भवू शकतात. उच्च रक्तदाब हा एक आजार आहे जो झोपेच्या कमतरतेमुळं होऊ शकतो. ज्या महिलांना निद्रानाशाचा त्रास होतो त्यांना उच्च रक्तदाब होण्याची शक्यता असते. झोपताना आपला रक्तदाब कमी होतो, परंतु पुरेशी झोप न मिळाल्यानं आपल्या शरीराचा रक्तदाब कमी होत नाही, ज्यामुळं उच्च रक्तदाब होऊ शकतो. त्याचवेळी उच्च रक्तदाबामुळं निद्रानाश देखील होऊ शकतो. या दोन समस्या एकमेकांशी संबंधित आहेत. जाणून घ्या हायपरटेन्शनची लक्षणं आणि प्रतिबंध करण्याच्या पद्धती काय आहेत.
हायपरटेन्शनची लक्षणं कोणती?
- डोकेदुखी
- छाती दुखणं
- धाप लागणे
- मळमळ
- उलट्या
- धडधडणं
- चिंता
- नाकातुन रक्तस्त्राव
- धूसर दृष्टी
- चक्कर येणं
कसं करावं संरक्षण ?
- व्यायाम करा : दररोज किमान 30 मिनिटं व्यायाम करा. असं केल्यानं हृदयाशी संबंधित आजार होण्याची शक्यता कमी होते. हृदय निरोगी राहतं. व्यायाम केल्यानं रक्तदाबही नियंत्रित राहतो, त्यामुळं उच्च रक्तदाब होण्याचा धोकाही कमी होतो.
- दारू आणि धूम्रपान करू नका : धूम्रपान आणि मद्यपान केल्यानं बीपीची समस्या होऊ शकते. त्यामुळं दारू आणि सिगारेटचं सेवन करू नका.
- वजन कमी : जास्त वजनामुळं उच्च रक्तदाबाचा धोका वाढतो. जास्त वजनामुळं कोलेस्ट्रॉल वाढू शकतं, जे उच्च रक्तदाबाचं प्रमुख कारण आहे. म्हणून, निरोगी वजन असणं खूप महत्वाचं आहे.
- निरोगी अन्न खा : हिरव्या भाज्या, फळं, संपूर्ण धान्य, दही, काजू, दूध, चीज खाल्ल्यानं आपल्या शरीराला सर्व पोषक तत्वं मिळतात. आजारांचा धोकाही कमी होतो. यासोबतच जास्त तळलेलं अन्न, साखर, अति कॉफी इत्यादीचं सेवन करू नका. यामुळे कोलेस्टेरॉल वाढतं. त्यामुळं हायपरटेन्शन तसेच इतर आजार होऊ शकतात.
- तणाव कमी करा : उच्च रक्तदाबामागं तणाव हे प्रमुख कारण आहे. त्यामुळं तणावाचं व्यवस्थापन करणं अत्यंत गरजेचं आहे. यासाठी तुम्ही योग, ध्यान, व्यायाम इत्यादींची मदत घेऊ शकता.
हेही वाचा :