हैदराबाद : जेव्हा नैसर्गिक उपायांचा विचार केला जातो तेव्हा टोमॅटोचे उपाय चमत्कार करू शकतात. निरोगी आणि स्वच्छ त्वचेसाठी टोमॅटो हा सर्वात प्रभावी उपाय आहे. टॅन काढून टाकण्यापासून ते अतिरिक्त तेल आणि मुरुमांशी लढण्यापर्यंत, ते तुमच्या त्वचेशी संबंधित अर्ध्या समस्या सोडवू शकते. टोमॅटो केवळ पोषक तत्वांनीच भरलेले नाही तर त्वचेचे आजार बरे करण्यात आणि त्वचा नितळ करण्यातही अत्यंत प्रभावी आहे. ज्यामुळे ब्लॅकहेड्स आणि व्हाईटहेड्स कमी होऊ शकतात.
असे करा उपाय : दोन चमचे टोमॅटोच्या रसात दोन थेंब लिंबाचा रस आणि थोडा मध मिसळा आणि चेहऱ्यावर लावा. पंधरा मिनिटांनंतर कोमट पाण्याने धुवून घ्या. टोमॅटो मॅश करून त्यात दोन चमचे काकडीचा रस मिसळा. हे चेहर्यावर लावा आणि वीस मिनिटांनी धुवा आणि लगेच मॉइश्चरायझर लावा. रोज असे केल्याने पिंपल्स कमी होतात. टोमॅटोचे थंड आणि तुरट गुणधर्म त्वचेला शांत करतात आणि अतिरिक्त तेल शोषून घेतात. उन्हामुळे त्वचा जळली आहे का? दोन चमचे टोमॅटोच्या रसात चार चमचे ताक, एक चमचा एरंडीचे तेल आणि थोडा मध मिसळून घ्या. हे मिश्रण चेहऱ्यावर लावा आणि हलक्या हाताने मसाज करा. पूर्णपणे कोरडे झाल्यानंतर स्वच्छ धुवा. हे नियमित केले तर समस्या आटोक्यात येईल. अल्ट्राव्हायोलेट किरणांचा प्रभाव त्वचेवर होत नाही. चेहरा निर्जीव झाला आहे का? दोन चमचे दही अर्ध्या टोमॅटोचा रस आणि एक चमचा बदामाची पेस्ट मिसळून घ्यावे. वीस मिनिटांनी कोमट पाण्याने स्वच्छ धुवा. दह्यामधील पोषक घटक त्वचेला घट्ट आणि उजळ करतात, तर टोमॅटोने तो ताजा दिसतो. बदामामुळे त्वचेला चमक येते.
टोमॅटो खाण्याचे इतर आरोग्यदायी फायदे : टोमॅटोमध्ये नैसर्गिकरित्या फॅट, कोलेस्ट्रॉल, कॅलरीज आणि सोडियमचे प्रमाण कमी असते.सर्वसाधारणपणे, टोमॅटोसह इतर भाज्या आणि फळे खाल्ल्याने उच्च रक्तदाब, उच्च कोलेस्ट्रॉल, स्ट्रोक आणि हृदयविकारापासून संरक्षण होते.
कॅन्सरशी लढण्यासाठी फायदेशीर : टोमॅटो ही एकमेव अशी भाजी आहे. जी कॅन्सरशी लढण्यासाठी नैसर्गिकरित्या उपयुक्त आहे. टोमॅटोचे अँटिऑक्सिडंट्स, म्हणजे जीवनसत्त्वे ए आणि सी, रॅडिकल्सशी लढतात, ज्यामुळे पेशींचे नुकसान होण्यापासून वाचते. कर्करोगाशी लढण्यासाठी टोमॅटोचे सेवन करण्याचा सल्लाही डॉक्टर देतात.
निरोगी केस : टोमॅटोमध्ये असलेले पोषक तत्व तुमचे केस चांगले आणि चमकदार बनवण्यास मदत करतात. टोमॅटोमध्ये आढळणारे व्हिटॅमिन केस मजबूत आणि चमकदार बनवण्याचे काम करतात. जर तुमचे केस पातळ होत असतील, तर यासाठी टोमॅटोचा फायदा होणार, त्यामुळे तुमचे केस पूर्वीपेक्षा नक्कीच चांगले होतील.
दृष्टीत सुधारणा : तुम्हाला डोळ्यांच्या काही समस्या असेल तर टोमॅटोमुळे तुमची दृष्टी सुधारू शकते. टोमॅटोमधील व्हिटॅमिन ए तुमची दृष्टी सुधारण्यास आणि रातांधळेपणा टाळण्यास मदत करू शकते. नुकत्याच झालेल्या एका संशोधनात असे दिसून आले आहे की, टोमॅटोचे सेवन केल्याने मॅक्युलर डिजेनेरेशन कमी होण्यास मदत होते, डोळ्यांची गंभीर आणि स्थिती सुधारते.
निरोगी त्वचा : टोमॅटोचे दररोज सेवन केल्याने तुमची त्वचा सुधारण्यास मदत होते. आंघोळ करण्यापूर्वी टोमॅटोचे तुकडे डोळ्यांवर 30 मिनिटे ठेवल्यास किंवा टोमॅटोची पेस्ट लावल्यास चेहऱ्यावरील काळे डाग दूर होऊ शकतात. चेहऱ्यावरील सुरकुत्या दूर करण्यासाठी टोमॅटोचा वापर केला जाऊ शकतो.
हेही वाचा : Tips To Gain Weight : निरोगी वजन वाढवण्यासाठी वापरून पहा 'या' टिप्स