ETV Bharat / sukhibhava

पावसाळ्यात त्वचेची सुरक्षा कशी करावी? तज्ज्ञांनी सुचवले 'हे' उपाय - healthy skin Expert Savita Kulkarni

पावसाळ्यातील वातावरणात जास्त ओलावा असतो. तसेच, जर पाऊस झाला नाही तर वातावरणात दमटपणा आणि गर्मीही खूप वाढते. आवश्यक्ते पेक्षा जास्त गर्मी, ओलावा आणि ठंडीचा आपल्या त्वचेवर जास्त परिणाम होतो. अशावेळी आपल्या त्वचेची काळजी घेणे खूप गरजेचे असते.

प्रतिकात्मक
प्रतिकात्मक
author img

By

Published : Aug 17, 2021, 7:31 PM IST

Updated : Aug 17, 2021, 8:00 PM IST

पावसाळ्यात त्वचेला निरोगी ठेवण्यासाठी जास्त खबरदारी घेण्याची गरज असते. ज्यासाठी छोट्या सवयींना आपल्या नियमित दिनक्रमात समाविष्ट केले जाऊ शकते. त्याचबरोबर, आपण काय खातो? आणि कोणत्या प्रकारचे फॅब्रिकचे (विणलेले कपडे) कपडे घालतो? याचा देखील आपल्या त्वचेवर परिणाम होतो. त्यामुळे, पावसाळ्यात त्वचेला निरोगी आणि सुरक्षित ठेवण्यासाठी काय करावे? याबाबत जाणून घेण्यासाठी 'ईटीव्ही भारत सुखीभवने' सौंदर्य तज्ज्ञ सविता कुलकर्णी आणि आहार व पोषण विशेषज्ञ डॉ. संगीता मालू यांच्याशी बातचीत केली.

आहारावर द्या लक्ष

आहार आणि पोषण विशेषज्ञ डॉ. संगीता मालू सांगतात की, प्राचीन काळापासूनच पावसाळ्यात काही विशेष प्रकारच्या खाद्य पदार्थांना टाळण्याचे सांगितल्या जाते. पावसाळ्याचा मोसम हा संसर्गाचा मोसम असल्याचे बोलले जाते आणि संसर्ग पसरवण्यात अन्न हा देखील एक महत्वाचा घटक आहे. त्यामुळे, पावसाळ्यात जास्त मसालेदार आणि तेलकट पदार्थ खाणे टाळावे किंवा त्याचे कमीत कमी सेवन करावे.

या मोसमात हलके, ताजे आणि पौष्टिक आहार घेतले पाहिजे. त्याचबरोबर, फळांचे अधिक प्रमाणात सेवन देखील आरोग्यासाठी चांगले असते. कारण फळांमधील पौष्टिक तत्व शरीराला उर्जा तर देतातच, त्याचबरोबर त्यांच्यातील अँटीऑक्सिडेंट आपल्या शरीरातील विषारी कणांना बाहेर काढण्यासाठी मदत देखील करतात. त्याचबरोबर, या मोसमात न शिजवलेल्या किंवा कच्च्या भाज्या आणि सलाद खाणे टाळले पाहिजे, कारण या मोसमात सामान्यत: हिरव्या भाजांमध्ये किडे पडू लागतात. या मोसमात शरीराला हायड्रेटेड ठेवणे देखील गरजेचे आहे, त्यामुळे जास्तीत जास्त प्रमाणात पाणी पिले पाहिजे, असे डॉ. संगीता मालू यांनी सांगितले.

त्वचेची नियमित काळजी घेणे आवश्यक

सौदर्य तज्ज्ञ सविता कुलकर्णी यांनी सांगितले की, पावसाळ्याच्या मोसमात वातावरणात ओलावा वाढल्याने फक्त महिलाच नव्हे तर पुरुषांमध्ये देखील त्वचेच्या समस्या वाढू लागतात. विशेषत: तेलकट किंवा मिश्र त्वचा असलेल्या लोकांना अशा प्रकारच्या समस्यांना अधिक समोरे जावे लागते. त्यामुळे, या मोसमात काही विशिष्ट सवयींना आपल्या नियमित स्किन केअर दिनक्रमात सामील करणे गरजेचे आहे, ज्यामुळे महिला आणि पुरुषांना त्वचेसंबंधी समस्यांपासून मुक्तता मिळू शकते. या सवयी पुढील प्रमाणे आहे,

- नियमितपणे फेस वॉशने दिवसातून कमीत कमी दोन ते तीन वेळा (विशेषत: सकाळी झोपून उठल्यानंतर आणि झोपण्यापूर्वी) चेहरा धुआ. यामुळे चेहऱ्यावरील घाम, जिवाणू, धुळ आणि मातीचे कण साफ होतात. पण, फेस वॉश हे खूप सौम्य म्हणजेच हल्के असणे गरजेचे आहे, तसेच त्यात रासायनिक घटक कमी असावे आणि ते त्वचेच्या प्रकृतीनुसारच असावे.

- या मोसमात त्वचेचे छिद्र बंद करणे आणि मृत पेशींना काढून टाकण्यासाठी त्वचेला नियमितपणे एक्सफोलिएट करणे गरजेचे असते. यासाठी पपई किंवा इतर फळांपासून बनवलेले पॅक आणि दहीचा वापर करता येऊ शकते.

- सतत बदलत असलेले मोसम आपल्या त्वचेच्या रोम छिद्रांवर देखील प्रभाव टाकतात. सहसा लोकं या बाबीवर जास्त लक्ष देत नाही आणि रोम छिद्रांमध्ये घाण साचल्याने त्वचेवर मुरुमासारख्या (मुहांसे) समस्या होतात. त्यामुळे, त्वचेची नियमित टोनिंग देखील गरजेची आहे. टोनिंगसाठी बाजारात मिळणाऱ्या हलक्या किंवा कमी रासायनिक टोनरचा वापर करता येईल. त्याचबरोबर, घरातच निंबूचे रस, काकडीचे पाणी आणि ग्रीन टी सारख्या पदार्थांचा देखील प्राकृतिक टोनरच्या रुपात वापर केला जाऊ शकतो.

- या मोसमात रात्री झोपण्यापूर्वी त्वचेला हलक्या फेश वॉशने धुतल्यानंतर तिच्यावर जर गुलाब जल शिंपडले तरी त्वचेला फायदा मिळू शकतो.

सविता कुलकर्णी सांगतात की, या मोसमात मुख्यत: सूती कपडे घालायला प्राधान्य दिले पाहिजे. सोबतच कपडे शरीरावर जास्त घट्ट नसावेत आणि खुले आणि हवेशीर असावेत. त्याचबरोबर, चेहऱ्याला पुसण्यासाठी वापरण्यात येणारा रुमाल आणि टॉवेल हा शक्य असल्यास सूतीच असायला हवा. कारण तो ओलावा अधिक चांगल्या प्रकारे शोषून घेण्यास सक्षम असतो.

हेही वाचा - मातेचे दूध नवजात बाळाला देते सुरक्षा; स्तनपानाचे 'हे' फायदे

Last Updated : Aug 17, 2021, 8:00 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.