ETV Bharat / sukhibhava

नवीन वर्षात तंदुरुस्त राहायचय? फॉलो करा 'या' टिप्स - stay fit in the new year

Healthy New Year : जर तुम्ही नवीन वर्षात फिटनेसवर लक्ष केंद्रित करण्याचा विचार करत असाल, तर काही सोप्या टिप्स आहेत, ज्याच्या मदतीनं तुम्ही तुमचं लक्ष्य सहज साध्य करू शकाल. तंदुरुस्त शरीर तुम्हाला अनेक आजारांपासून दूर ठेवते आणि तुमचा आत्मविश्वासही वाढवते.

Healthy New Year
नवीन वर्षात तंदुरुस्त राहायचय?
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 31, 2023, 10:33 AM IST

हैदराबाद : नवीन वर्ष म्हणजे नवीन सुरुवात, बहुतेक लोकांसाठी हा दिवस अनेक कामांची सुरुवात करण्यासाठी शुभ मुहूर्त आहे. ज्याचे ते बऱ्याच दिवसांपासून नियोजन करत होते. नवीन वर्षात आरोग्यावर लक्ष केंद्रित करणे, पैशांची बचत करणे, कुटुंबासाठी वेळ देणे, कामाचे दडपण न घेणे अशा अनेक गोष्टींचा त्यात समावेश असतो, पण हे लक्ष्य काही मोजकेच लोक पूर्ण करू शकतात. असे का घडते, याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? कारण अनेकदा आपण चुकीचे लक्ष्य ठरवतो. नवीन वर्षापासून जिममध्ये जाणार...हे बहुतेक लोकांचे उद्दिष्ट असते, परंतु कदाचित केवळ 5 टक्के लोक ते पूर्ण करतात, मग फक्त जिममध्येच का जायचं ? तुम्ही घरीही व्यायाम करू शकता आणि कोणत्याही उपकरणाच्या मदतीशिवायही तुम्ही तंदुरुस्त राहू शकता, फिट राहण्यासाठी अशा सोप्या टिप्स आहेत, ज्याच्या मदतीने तुम्ही 2024 मध्ये स्वत:ला तंदुरुस्त ठेवण्याचं तुमचे स्वप्न सहज पूर्ण करू शकता.

सकाळी लवकर उठण्याची सवय लावा : हिवाळ्यात सकाळी उठणे हे नि:संशय कठीण काम आहे, पण जर तुम्ही एखाद्या दिवशी लवकर उठले तर त्याचे किती फायदे होतात ते पहा. तुम्हाला व्यायामासाठी वेळ मिळेल. चहा पिताना शांतपणे बसून वर्तमानपत्र वाचण्याचा वेळ मिळेल. जो नाश्ता सकाळच्या गर्दीत चुकायचा तो आता होणार नाही. एक-दोन दिवस सांभाळणे तुमच्यासाठी कठीण असेल, पण त्यानंतर तुमचा दिनक्रम ठरेल, पण हो, सकाळी लवकर उठण्यासाठी तुम्हाला रात्री वेळेवर झोपण्याची सवयही लावावी लागेल.

पाण्याचे सेवन वाढवा : निरोगी राहण्यासाठी अन्न खाण्याइतकेच पाणी पिणे महत्त्वाचे आहे. रोज ७ ते ८ ग्लास पाणी प्यायला हवे, पण हिवाळ्यात हे करणे शक्य होत नाही, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. अशा परिस्थितीत पाण्याव्यतिरिक्त तुम्ही रस, सूप, दूध आणि नारळाचे पाणी यांसारखे इतर द्रव देखील समाविष्ट करू शकता. सकाळची सुरुवात कोमट पाण्याने करा. एकाच वेळी पाणी पिण्याऐवजी, लहान घोट घ्या.

स्वत:साठी 30 मिनिटे काढा : ही 30 मिनिटे तुमची एकट्याची असावी. फोन नाही, टीव्ही नाही. फक्त अर्ध्या तासाने तुमचा फिटनेस प्रवास सुरू करा आणि हळूहळू वेळ वाढवा. यामध्ये योगा आणि कार्डिओ व्यायामाचा समावेश आहे, ज्यासाठी जिमला जाण्याची गरज नाही.

पायऱ्यांचा वापर करा : घर किंवा ऑफिसमध्ये चढण्यासाठी-उतरण्यासाठी लिफ्टऐवजी पायऱ्यांचा वापर करा. यापेक्षा चांगली आणि स्वस्त कसरत असू शकत नाही. याच्या मदतीने तुम्ही तुमचे पाय तसेच हृदय निरोगी ठेवू शकता.

आहाराकडे लक्ष द्या : जर तुम्ही नवीन वर्षात फिटनेसवर लक्ष केंद्रित करण्याचा विचार केला असेल, तर तुमच्या आहाराकडेही लक्ष देणे खूप गरजेचे आहे. आपल्या आहारात फळे आणि भाज्यांचे प्रमाण वाढवा आणि जंक आणि प्रक्रिया केलेले अन्न कमी करा. लठ्ठपणा, मधुमेह, उच्च रक्तदाब अशा अनेक समस्यांपासून तुमची सुटका होईल.

हेही वाचा :

  1. 'असं' साजरं करा कुटुंबासह नवीन वर्ष; येणार नाही पार्टीची आठवण
  2. गुलाबी पेरू आरोग्यासाठी फायदेशीर, हिवाळ्यात तो खाल्ल्याने होतात 'हे' आश्चर्यकारक फायदे
  3. नवीन वर्षाच्या सेलिब्रेशन दरम्यान कोरोना JN1 कडे करू नका दुर्लक्ष, घ्या 'ही' काळजी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.