हैदराबाद : निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी हंगामी फळांचे सेवन करणे फायदेशीर आहे. प्रत्येक ऋतूमध्ये वेगवेगळी फळे उपलब्ध असतात, ज्याचे लोक मोठ्या प्रमाणावर सेवन करतात. पेरूला पावसाळ्यात मोहोर येतो. हे फळ चवीला अप्रतिम असून याचे सेवन करणे आरोग्यासाठीही फायदेशीर मानले जाते. पेरू हे पोषक घटकांचे पॉवरहाऊस मानले जाऊ शकते. यामध्ये अँटिऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए, लाइकोपीन, कॅल्शियम, मॅंगनीज आणि पोटॅशियम भरपूर प्रमाणात असते. पेरूमध्ये कॅलरी कमी आणि फायबर जास्त असते. हे सर्व गुणधर्म आरोग्यासाठी वरदान ठरतात. पावसाळ्यात पेरू खाल्ल्याने शरीराला कोणते फायदे होतात ते जाणून घ्या.
रोगप्रतिकारशक्ती वाढते : पेरू आपल्या शरीराची प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतो. पेरूमध्ये व्हिटॅमिन सी असते. त्यात संत्र्यापेक्षा दुप्पट व्हिटॅमिन सी असते. व्हिटॅमिन सी तुमची रोगप्रतिकारकशक्ती सुधारण्यास मदत करते. हानीकारक जीवाणू आणि विषाणू नष्ट करून रोगांपासून आपल्या शरीराचे संरक्षण करण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. कमकुवत प्रतिकारशक्ती असलेल्या लोकांनी पेरूचे सेवन करणे आवश्यक आहे.
रक्तातील साखरही नियंत्रित राहते : पेरू खाण्यास गोड असला तरी मधुमेहाच्या रुग्णांसाठीही तो फायदेशीर आहे. पेरूमध्ये फायबर असते. त्यामुळे मधुमेही रुग्ण देखील त्याचे सेवन करू शकतात. कमी ग्लायसेमिक इंडेक्स असल्यानं साखरेची पातळी अचानक वाढण्यास प्रतिबंध करते. पेरूमध्ये आढळणारे फायबर रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास मदत करते. पेरूच्या पानांचा अर्क रक्तातील साखरेची पातळी सुधारू शकतो.
हृदय चांगले राहते : पेरूमुळे हृदय निरोगी राहते. पेरूमध्ये पोटॅशियम आणि सोडियमचे प्रमाण जास्त असते. ते उच्च रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करते. जेवणापूर्वी पिकलेले पेरू खाल्ल्याने रक्तदाब कमी होतो. पेरू खाल्ल्याने उच्च कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते. पेरू खाल्ल्याने चांगले कोलेस्ट्रॉल ८% वाढू शकते. यामुळे हृदयाचे आरोग्य चांगले राहते. पेरूच्या पानांचा अर्क हृदयरोग आणि स्ट्रोकचा धोका कमी करू शकतो.
हेही वाचा :