ETV Bharat / sukhibhava

Hanuman Jayanti 2023 : वर्षातून दोन वेळा का साजरी करण्यात येते हनुमान जयंती, वाचा काय आहे कारण

हनुमान जयंती देशभरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते. प्रभू श्रीराम यांचे परमभक्त म्हणून हनुमान यांचा उल्लेख करण्यात येतो. त्यामुळे मोठ्या भक्ती भावाने नागरिक हनुमान जयंतीचा उत्सव साजरा करतात.

Hanuman Jayanti 2023
संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : Apr 1, 2023, 10:26 AM IST

Updated : Apr 6, 2023, 6:40 AM IST

हैदराबाद : प्रभू श्रीराम यांचे परमभक्त म्हणून हनुमान यांचा उल्लेख करण्यात येतो. हनुमानांविषयी अनेक अख्यायिका रामायणात सुप्रसिद्ध आहेत. जन्मल्याबरोबर हनुमान यांनी सुर्याला गिळण्याचा प्रयत्न केल्याचा उल्लेख रामायणात येतो. त्यानंतर त्यांनी प्रभू श्रीराम यांचा सेवक म्हणून केलेल्या कार्याची महती रामायणात वर्णन करण्यात येते. त्यामुळे हिंदू धर्मात हनुमान जयंतीला विशेष महत्व आहे. जाणून घेऊया प्रभू श्रीरामाच्या या परमभक्ताविषयीची माहिती.

Hanuman Jayanti 2023
संग्रहित छायाचित्र

वर्षातून दोनवेळ साजरी करण्यात येते जयंती : प्रभू श्रीरामाचे परमभक्त हनुमान यांचा जन्म हिंदू कॅलेंडरनुसार चैत्र शुक्ल पौर्णिमेला झाला. त्यामुळे हनुमान जयंती चैत्र शुक्ल पोर्णिमेला साजरी करण्यात येते. चैत्र शुक्ल पोर्णिमा ही मार्च किवा एप्रिलमध्ये येत असल्याने या महिन्यात हनुमान जयंती साजरी करण्यात येते. मात्र काही भागात हनुमान जयंती कार्तिक कृष्ण चतुर्दशीलाही साजरी करण्यात येते. कार्तिक कृष्ण चतुर्दशी ही सप्टेंबर किवा ऑक्टोबर महिन्यात येते. त्यामुळे वर्षातून दोन वेळा हनुमान जयंती साजरी करण्यात येते. हनुमान जयंती विविध राज्यात विविध पद्धतीने साजरी करण्यात येते. तामिळनाडू आणि केरळमध्ये मार्गशीर्ष महिन्यातील अमावस्येला हनुमान जयंती साजरी करण्यात येते. तर ओरिसामध्ये वैशाख महिन्याच्या पहिल्या दिवशी हनुमान जयंती साजरी करण्यात येते. त्यामुळे विविध राज्यात विविध पद्धतीने हनुमान जयंती साजरी करण्यात येत असली, तरी हनुमान यांच्याविषयी नागरिकांचा भक्तीभाव सारखाच असल्याचे यातून दिसून येते.

काय आहे हनुमान यांच्या जन्माची कथा : श्रीराम यांचे परमभक्त म्हणून हनुमान यांचा उल्लेख करण्यात येतो. मात्र हनुमान यांच्या जन्माची कथा मोठी रंजक असल्याचे वाल्मिकीकृत रामायणात कथन करण्यात आली आहे. किष्कींधा नगरीजवळ असलेल्या सुमेधू येथे केसरी आणि अंजना हे राहत होते. मात्र त्यांना मूल झाले नव्हते. त्यामुळे अंजना यांनी वायूदेवाचा तप केल्यामुळे त्यांना वायूदेवाने प्रसन्न होत प्रसाद दिला. त्यामुळे अंजना यांच्यापोटी हनुमान यांचा जन्म झाल्याची अख्यायिका आहे. मात्र जन्मल्यानंतर लगेच हनुमान यांनी सुर्याला फळ समजून गिळण्याचा प्रयत्न केल्याची घटना रामायणात नमूद करण्यात आली आहे.

कशी केली जाते हनुमान यांची पूजा : श्रीरामांचे परमभक्त हनुमान यांच्या मूर्तीला शेंदूर लावण्यात येतो. त्यांची ऋईच्या फुलांच्या माळा घालून पूजा करण्यात येते. त्यासह पाप आणि दृष्ट शक्तीपासून सुटका करण्यासाठी हनुमान यांना उडदाची काळी दाळही वाहण्यात येऊन पूजा करण्यात येते. हनुमान चालिसा पठण केल्यामुळे सगळ्या भूतबाधा दूर होत असल्याची अख्यायिका रामायणात नमूद करण्यात आली आहे. त्यामुळे हनुमान भक्त मोठ्या भक्ती भावाने हनुमान चालिसा पठण करतात. देशभरात हनुमान जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते. यावर्षी हनुमान जयंती 6 एप्रिलला येत असल्याने देशभरात उत्साहाचे वातावरण आहे.

हेही वाचा - April Fool Day 2023 : मित्रांसह नातेवाईकांना मूर्ख बनवून साजरा करतात एप्रिल फूल डे, जाणून घ्या रंजक माहिती

Last Updated : Apr 6, 2023, 6:40 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.