ETV Bharat / entertainment

अल्लू अर्जुन आणि रणबीर कपूर स्टारर चित्रपटाची प्रतीक्षा... हा सिनेमा 'धूम 4' असण्याचाही प्रेक्षकांचा अंदाज - ALLU ARJUN AND RANBIR IN DHOOM4

अल्लू अर्जुन आणि रणबीर कपूर यांच्यासह चित्रपट बनणार का? आणि हा चित्रपट 'धूम 4' तर नसेल? अशा चर्चेला उधाण आलं आहे.

Allu Arjun and Ranbir Kapoor
अल्लू अर्जुन आणि रणबीर कपूर ((IANS/ANI))
author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : Nov 15, 2024, 6:17 PM IST

मुंबई - तेलुगू चित्रपटाचे लोकप्रिय नायक असलेले नंदामुरी बालकृष्णा यांचा एक टॉक शो सध्या खूप गाजत आहे. यात दिग्गज सेलेब्रिटींची हजेरी लागत असल्यामुळे शोला अफाट लोकप्रियता मिळत आहे. या शोमध्ये अलीकडेच तेलुगू स्टार अल्लू अर्जुन उपस्थित होता. यावेळी नंदामुरी बालकृष्णा यांनी विचारलेल्या एका प्रश्नावर अल्लू अर्जुननं रणवीर सिंगचं कौतुक केलं. त्याची ही क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर, प्रत्येकजण असा अंदाज लावत आहे की अल्लू अर्जुन आणि रणवीर सिंग एकाच चित्रपटात झळकणार. काही जणांनी हा चित्रपट 'धूम 4' असावा असा अंदाज व्यक्त करायलाही सुरूवात केली आहे.

अल्लू अर्जुन-रणबीर कपूर एका मल्टीस्टारर चित्रपटात दिसणार?

टॉक शोमध्ये अल्लू अर्जुन म्हणतो की, "रणबीर कपूर हा बॉलिवूडचा सर्वोत्कृष्ट अभिनेता आहे आणि या पिढीचा तो माझा वैयक्तिक आवडता अभिनेता आहे." यावर बाळकृष्ण म्हणतात, "यावेळी माझं मन काय सांगतंय ते बोलू का?" यावर अल्लू अर्जुन म्हणतो, "प्लीज, मला सांगा सर." तेव्हा बालकृष्ण म्हणतात, "रणबीर कपूर आणि अल्लू अर्जुन यांना घेऊन एक मल्टीस्टारर चित्रपट बनवावा", असे मला वाटते. यावर सर्वांनी टाळ्या वाजवल्या. तेव्हा बालकृष्ण म्हणतात, " येत्या ६ महिन्यांत जर कोणी चित्रपटाचा विचार केला नाही तर मी स्वतः त्याची कथा लिहीन."

चाहते म्हणाले- हा चित्रपट 'धूम 4' तर नाही!

या सर्व गोष्टींमुळे दोन्ही कलाकारांच्या चाहत्यांमध्ये उत्साह वाढला आहे. आता चाहते त्या दोघांच्या या मल्टीस्टारर चित्रपटाच्या घोषणेची वाट पाहत आहेत. या दोघांचा समावेश असलेला चित्रपट सुरू आहे की काय, असा अंदाजही अनेकजण लावत आहेत. 'हा धूम ४ चित्रपट आहे का?' अशी विचारणा सोशल मीडियावर बरेच नेटिझन्स करताना दिसत आहेत. अल्लू अर्जुन आणि रणवीर सिंग यांना एकत्र पाहणं हा दोघांच्याही

वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर अल्लू अर्जुन त्याच्या आगामी 'पुष्पा 2' चित्रपटासाठी चर्चेत आहे जो 5 डिसेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होत आहे. तर रणबीर कपूर नितीश तिवारी रामायणामुळे चर्चेत आहे. ज्यामध्ये तो रामच्या भूमिकेत दिसणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.