ETV Bharat / sukhibhava

हिवाळ्यात केसांच्या समस्या वाढल्यावर काय करावं? 'हे' पदार्थ खाऊन घ्या काळजी - केसगळती टिप्स

Hair Growth : केस गळणे, कमकुवत होणे किंवा कोरडे होणे ही केसांच्या समस्या हिवाळ्यात वाढतात. त्यामुळे तुमचे केस दाट आणि मजबूत बनण्यासाठी तुम्ही तुमचे केस निरोगी ठेवणे महत्त्वाचे आहे. यामध्ये काही खाद्यपदार्थ उपयुक्त ठरू शकतात. जाणून घ्या कोणते पदार्थ केसांना निरोगी बनवण्यास मदत करतात.

Hair Growth
केसांशी संबंधित समस्या
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 7, 2024, 12:13 PM IST

हैदराबाद : तुम्हाला हिवाळ्यात केसांशी संबंधित अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. हवेतील ओलावा नसल्यामुळे केस कोरडे होऊ शकतात. केसामध्ये आणखी कोंडा होऊ शकतो. या कारणांमुळे केस गळण्याची समस्या उद्भवू शकते. यामुळे तुमच्या लूकवर आणि आत्मविश्वासावर खूप परिणाम होतो. त्यामुळे केसांची काळजी घेणे खूप गरजेचे आहे. काही खाद्यपदार्थदेखील तुमचे केस निरोगी ठेवण्यास मदत करू शकतात. कोणते पदार्थ केसांच्या वाढीसाठी आणि ते निरोगी ठेवण्यास मदत करतात.

  • रताळे : हिवाळ्यात, तुम्हाला रस्त्यावर रताळ्याच्या अनेक गाड्या दिसतीलत्याकडे दुर्लक्ष करू नका. सकस आहारासाठी त्याचा आहारात समावेश करा. त्यातील बीटा कॅरोटीनमुळे व्हिटॅमिन ए मिळते. व्हिटॅमिन ए टाळूमध्ये सीबमचे उत्पादन वाढवते. त्यातून केस निरोगी ठेवण्यास मदत करते. तसेच केस गळतीचे प्रमाण कमी होण्यास मदत होते.
  • बेरी : बेरीमध्ये अँटी-ऑक्सिडेंट आढळतात. ते केसांच्या वाढीसाठी उपयुक्त आहे. त्यामुळे केस दाट होण्यास मदत होते. हे तुमच्या केसांना फ्री रेडिकल डॅमेजपासून वाचवते. यातून केस गळण्याची समस्या कमी होऊ शकते.
  • पालक : पालकामध्ये व्हिटॅमिन ए आणि आयर्न (लोह) या दोन्ही घटकांचे प्रमाण जास्त असते. हे केसांच्या वाढीसाठी आवश्यक असते. त्यामुळे निरोगी केसांसाठी याचा आहारात समावेश करणे फायदेशीर ठरू शकते.
  • एवोकॅडो : एवोकॅडोमध्ये निरोगी स्निग्धपदार्थ भरपूर प्रमाणात असतात. यामध्ये व्हिटॅमिन ई देखील जास्त प्रमाणात असते. त्यामुळे तुमचे केस निरोगी राहण्यास मदत होते. हे केस मजबूत करण्यास मदत करते. केस गळणे कमी होते. यामुळे केस निरोगी आणि चमकदार होतात.
  • अंडी : केसांच्या वाढीसाठी आवश्यक असलेले प्रथिने आणि लोह अंड्यांमध्ये आढळतात. केस मजबूत करण्यासोबतच ते चमकदार आणि मजबूत होण्यासही हे उपयुक्त आहे. त्यामुळे हे खाणे तुमच्या केसांसाठी खूप फायदेशीर आहे.

( डिस्क्लेमर- ही माहिती केवळ वाचकांसाठी दिलेली असून त्यात कोणताही दावा करण्यात आलेला नाही. वाचकांनी दिलेली माहिती आरोग्यासाठी वापरण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला घ्यावा.)

हेही वाचा :

  1. डोकेदुखीचेही आहेत 6 प्रकार; काय आहेत लक्षणं, वाचा सविस्तर
  2. जोडीदाराशी बोलण्याच्या पद्धतीवरुनही होऊ शकतं भांडण, वाचा काय असतात नेमकी भांडणाची कारणं
  3. सफला एकादशी 2024 : नवीन वर्षातील पहिल्या एकादशीला 'या' पद्धतीनं करा भगवान विष्णूची पूजा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.