आयुर्वेद, भारतातील प्राचीन औषधी आता पुन्हा हळूहळू लोकप्रियता मिळवू लागल्या आहेत. आता लोक कोणत्याही उपचारांसाठी रासायनिकदृष्ट्या तयार होणाऱ्या औषधांऐवजी नैसर्गिक औषधी वनस्पती वापरण्यास अधिक पसंती देतात. म्हणूनच, आम्ही आपल्यासाठी एक अतिशय प्रसिद्ध औषधी वनस्पती टिनोस्पोरा कॉर्डिफोलिया घेऊन आलो आहोत. ही औषधी बर्याच आयुर्वेदिक उपचारांमध्ये वापरली जाते. हे वनस्पती गुडुची किंवा गिलोय म्हणून लोकप्रिय आहे.
आमच्या आयुर्वेदिक तज्ज्ञ डॉ. राज्यलक्ष्मी माधवम, एमडी आयुर्वेद, एएमडी आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज, हैदराबाद येथे प्राध्यापक आहेत. त्या सांगतात, “गुडुची, गिलॉय किंवा अमृता ही एकाच औषधी वनस्पतीचे नाव आहे. अमृता हे नाव प्राचीन हिंदू धर्मग्रंथातून आले आहे. ज्यात अमृताचा उपयोग मृत व्यक्तीला पुन्हा जिवंत करण्यासाठी आणि देवाला आजारपण आणि म्हातारपणापासून मुक्त ठेवण्यासाठी केला गेला.
गुडुचीचे विविध फायदे आहेत. आयुर्वेदात केलेल्या वर्णनानुसार ते बर्याच आजारांवर उपाय म्हणून काम करते. डॉ. राज्यलक्ष्मी यांनी आपल्याला त्याचे काही फायदे सांगितले, ते असे -
- अँटी-डायबेटिक : गिलोय हे सर्वसामान्य रोगासाठी उपयुक्त आहे. मधुमेह आणि रक्तातील साखरेची पातळी खाली आणण्यासाठी गिलॉय उपयुक्त आहे.
- अँटी-पायरेटिक : गिलॉय शरीरातील तापमान कमी करण्यास मदत करते.
- अँटी-स्पास्मोडिक : गिलॉय शरिराच्या वेदना कमी करण्यासाठी उपयुक्त आहे.
- अँटी-इंफ्लेमेटरी : यामुळे ऊतींमधील दाह कमी होतो.
- अँटी आर्थराइटिक : गिलॉय संधिवातामध्ये उपयुक्त आहे.
- गिलॉय शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यात मदत करते.
- आजकाल तरुणांमध्ये तणाव आणि नैराश्याचे प्रमाण वाढत आहे. गिलॉय तणाव आणि चिंता कमी करण्यास उपयुक्त आहे.
- गिलॉयमधील काही प्रतिरोधक गुणधर्म पावसाळ्यातील आजार कमी करण्यात मदत करते.
- बर्याच लोकांना धूळ, धूर, सूर्यप्रकाश किंवा काही पदार्थांपासून एलर्जी असते. गिलॉयचे प्राशन केल्याने अॅलर्जी कमी होण्यास मदत होते.
- गिलॉयचा उपयोग एक्जिमा, कुष्ठरोग यासारख्या त्वचेच्या काही आजारांवर उपचार करण्यासाठी केला जातो.
- गिलोयमध्ये यकृताचे आजार रोखण्याची क्षमता आहे.
- गिलॉयमध्ये कर्करोगविरोधी गुणधर्म देखील आहेत.
आयुर्वेदिक चिकित्सकाशी सल्लामसलत केल्यानंतरच गोळ्या, पावडर, कशायम टॅब्लेट किंवा गुडुची सत्व या स्वरूपात गुडुची वापरली जाऊ शकते. हे पाणी किंवा मधाबरोबर किंवा डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घेता येते.
डॉ. राज्यलक्ष्मी म्हणतात, “गुडुचीवर बरेच संशोधन केले गेले आहे आणि बर्याच आजारांवर उपचार करण्यामध्ये त्यांची अष्टपैलुत्व सिद्ध केले आहे. ऋग्वेद आणि अथर्ववेदात असे म्हटले आहे की, गुडुची, कडुनिंबाच्या झाडावर वाढतात आणि त्यांची क्षमता चांगली असते. त्यामुळे रोगप्रतिकारक क्षमता वाढते.
राज्यलक्ष्मी पुढे सांगतात, की आयुष मंत्रालयाने सीएसआयआर (वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद) यांच्या सहकार्याने कोरोना विषाणूविरोधात लढा देण्यासाठी गुडुची आणि इतर आयुर्वेदिक औषधी वनस्पती तयार करण्याच्या चाचणीसाठी क्लिनिकल चाचण्या सुरू केल्या आहेत.
अलीकडे, औषधी वनस्पतीचे गुण लक्षात घेता, भारत सरकारने गुडुचीला भारताची राष्ट्रीय औषधी म्हणून घोषित केले. गिलॉय हे आपल्या देशात प्राचीन काळापासून वापरले जाणारे एक औषधी वनस्पती आहे. आम्ही आशा करतोय, की कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी गिलॉय फायदेशीर ठरेल, असे डॉ. राज्यलक्ष्मी सांगतात.