हैदराबाद : फेब्रुवारी महिना म्हणजे प्रेमी-युगलांसाठी प्रेमाचा महिना. कपल्स या सात दिवसांत आपल्या पार्टनरला गुलाब, चॉकलेट, गिफ्ट्स आणि इतर अनेक भेटी देऊन प्रेम व्यक्त करतात. तर अनेक जण आपल्या क्रशला किंवा आवडत्या व्यक्तीला प्रपोज करण्यासाठी देखील व्हॅलेंटाईन डे निवडतात. या खास क्षणी तुम्ही तुमच्या जोडीदाराला हे खास गिफ्ट देऊन तुमचा व्हॅलेंटाईन वीक साजरा करा.
रोझ डे 2023 - 7 फेब्रुवारी : व्हॅलेंटाईन सप्ताह अधिकृतपणे रोझ डेला सुरू होतो. कपल्स त्यांचे प्रेम व्यक्त करण्यासाठी एकमेकांना गुलाबाचे फुल देतात. उत्कटतेचे आणि प्रेमाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी सर्वात प्रसिद्ध गुलाब म्हणजे लाल गुलाब.
प्रपोज डे 2023 - 8 फेब्रुवारी : रोझ डे नंतर प्रपोज डे येतो. या दिवशी तुम्ही तुमच्या आवडत्या व्यक्तीला प्रपोज करू शकता. तुमच्या क्रशला प्रश्न विचारण्यासाठी प्रपोज डेपेक्षा मोठा दिवस असूच शकत नाही. तुम्ही डिनर डेट प्लॅन करू शकता आणि त्यांनी तुम्ही हार्ट शेप असलेली पिलो गिफ्ट देऊ शकता.
चॉकलेट डे 2023 - 9 फेब्रुवारी : चॉकलेट डेच्या निमित्ताने 'कुछ मीठा हो जाये'ची कल्पना करू शकता. तुमची काळजी असलेल्या व्यक्तीसोबत चॉकलेट शेअर केल्याने तुमचे नाते मजबूत होऊ शकते. जेव्हा तुम्ही तुमच्या प्रियकराला चॉकलेटचा एक मोठा बॉक्स किंवा चॉकलेटचा एक तुकडा प्रेमाने शेअर करता तेव्हा ते तुमच्या विचारशीलतेची प्रशंसा करतील.
टेडी डे 2023- 10 फेब्रुवारी : झोपण्याच्या वेळेचा उत्तम साथीदार म्हणजे टेडी बिअर. ज्याला तुम्ही घेवून झोपू शकता. हे तुमच्या जोडीदाराची तुमच्याबद्दलची आपुलकी आणि काळजी दर्शवते. तुम्ही त्याच्या मिठीचा आनंद लुटता.
प्राॅमीस डे 2023 - 11 फेब्रुवारी : तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीला जे हवे आहे ते दिले पाहिजे. प्रॉमिस डे हा तुमच्या जोडीदारासोबत सर्व प्रकारचे करार करण्याची वेळ आहे. प्रॉमिस डेच्या निमित्ताने तुम्ही एखादा सुंदर मग गिफ्ट म्हणून देऊ शकता.
हग डे 2023 - 12 फेब्रुवारी : आपल्या प्रियकराला उबदार, घट्ट आणि प्रेमळ मिठी देण्यापेक्षा आपण त्यांची किती काळजी आणि प्रेम करतो हे दर्शविण्याचा कोणताही चांगला मार्ग नाही. हग डे ही तुमच्या जोडीदाराच्या जवळ जाण्याची आणि त्यांना आश्वस्त करण्याची संधी आहे. तुम्ही त्यांना परफ्युम देऊ शकता.
किस डे 2023 - 13 फेब्रुवारी : किस डेचा उद्देश आपले नाते अधिक दृढ करणे आहे. किस हे वचनबद्धतेचे आणि आत्मीयतेचे लक्षण आहे. ते आपुलकीचा संवाद साधण्यासाठी वापरले जातात. ते तुमच्या नात्यातील बंध मजबूत करतात. तुम्ही त्यांना घड्याळ देऊ शकता.
व्हॅलेंटाईन डे 2023- 14 फेब्रुवारी : प्रेम आणि काळजी अनेक मार्गांनी दर्शविल्या गेलेल्या सर्व दिवसांनंतर व्हॅलेंटाईन डे, वर्षातील सर्वात रोमँटिक दिवस असतो. हा एक प्रणय आणि प्रेमाने भरलेला दिवस आहे. तुम्ही त्यांना अंगठी गिफ्ट देऊ शकता. या दिवशी तुमच्या प्रियकरासाठी भेटवस्तू खरेदी करणे किंवा रोमँटिक जेवण आणि सहलीचे आयोजन करू शकता.
व्हॅलेंटाईन आठवड्याचे दिवस :
7 फेब्रुवारी 2023 - रोझ डे - मंगळवार
8 फेब्रुवारी 2023 - प्रपोज डे - बुधवार
9 फेब्रुवारी 2023 - चॉकलेट डे - गुरुवार
10 फेब्रुवारी 2023 - टेडी डे - शुक्रवार
11 फेब्रुवारी 2023 - प्राॅमीस डे - शनिवार
12 फेब्रुवारी 2023 - हग डे - रविवार
13 फेब्रुवारी 2023 - किस डे - सोमवार
14 फेब्रुवारी 2023 - व्हॅलेंटाईन डे - मंगळवार
15 फेब्रुवारी 2023 - स्लॅप डे - बुधवार
16 फेब्रुवारी 2023 - किक डे - गुरुवार
17 फेब्रुवारी 2023 - परफ्यूम डे - शुक्रवार
18 फेब्रुवारी 2023 - फ्लर्टिंग डे - शनिवार
19 फेब्रुवारी 2023 - कन्फेशन डे - रविवार
20 फेब्रुवारी 2023 - मिसिंग डे - सोमवार
21 फेब्रुवारी 2023 - ब्रेक अप डे - मंगळवार
हेही वाचा : प्रजासत्ताक दिनानिमित्त बनवा 'या' स्पेशल रेसिपी