ETV Bharat / sukhibhava

Fish Oil Benefits : फिश ऑइल आहे अनेक आजारांवर रामबाण उपाय; जाणून घ्या फायदे - Know the benefits

Fish Oil Benefits : काही लोकांना मासे खायला आवडतात, परंतु तुम्हाला माहित आहे का की ते स्वादिष्ट असण्यासोबतच तुमच्या आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहेत. माशांचं तेल त्यापेक्षा जास्त फायदेशीर आहे. या तेलामध्ये भरपूर प्रमाणात ओमेगा-३ फॅटी अ‍ॅसिड असतं जे खराब कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवतं आणि हाडं देखील निरोगी ठेवतं.

Fish Oil Benefits
फिश ऑइल
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 26, 2023, 3:57 PM IST

हैदराबाद : आपल्या सर्वांना माहित आहे की मासे खाणं आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. माशांमध्ये ओमेगा-३ फॅटी अ‍ॅसिड, व्हिटॅमिन-डी, कॅल्शियम, लोह असे अनेक पोषक घटक आढळतात, जे आरोग्यासाठी आवश्यक असतात. पण जे लोक मांसाहारी मासे खात नाहीत, त्यांच्यामध्ये ओमेगा-३ फॅटी अ‍ॅसिडची कमतरता असते. कमतरतेवर मात करण्यासाठी, तुम्ही तुमच्या आहारात फिश ऑइलचा समावेश करू शकता, ज्यामुळं आरोग्याशी संबंधित अनेक समस्या टाळता येतील. फिश ऑइल, फिश टिश्यूपासून बनवलं जातं. यात ओमेगा-३ फॅटी अ‍ॅसिड, डोकोसाहेक्साएनोइक अ‍ॅसिड, कोसापेंटायनोइक अ‍ॅसिड असते, जे तुम्हाला अनेक आजारांपासून वाचवते. चला जाणून घेऊया त्याचे फायदे.

  • रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते : माशांचं तेल रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास देखील मदत करते. यामध्ये असलेले ओमेगा-३ फॅटी अ‍ॅसिड सर्दी आणि फ्लूपासून बचाव करते. तसेच फुफ्फुस निरोगी ठेवण्यास मदत होते.
  • सांधेदुखी कमी करते : फिश ऑइलच्या मदतीनं तुम्ही सांधेदुखी आणि सूज यापासून आराम मिळवू शकता.
  • गरोदर महिलांसाठी फायदेशीर : ओमेगा-३ फॅटी अ‍ॅसिड्स गर्भातील बाळाच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावतात. यामुळं नैराश्य इत्यादी लक्षणं कमी होतात. जर तुम्ही आई होणार असाल तर फिश ऑइल तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकतं.
  • डोळ्यांसाठी फायदेशीर : डोळे निरोगी ठेवण्यासाठी मासं खाण्याचा सल्ला दिला जातो. ते ओमेगा -3 फॅटी ऍसिडमध्ये समृद्ध आहेत. शरीरात या पोषक तत्वाच्या कमतरतेमुळं डोळ्यांच्या आजारांचा धोका वाढतो. डोळे निरोगी ठेवण्यासाठी फिश ऑइल फायदेशीर ठरू शकतं.
  • हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर : माशाचं तेल हृदयाच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानलं जातं. जे लोक आहारात फिश ऑइल घेतात त्यांना हृदयविकाराचा धोका कमी असतो. फिश ऑइल चांगले कोलेस्ट्रॉल सुधारू शकते आणि खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करू शकते. त्यामुळे तुमच्या जेवणात फिश ऑइलचा वापर करा, ज्यामुळे तुम्ही हृदयाशी संबंधित आजार टाळू शकता.
  • मानसिक आरोग्याला प्रोत्साहन देते : मेंदूच्या आरोग्यासाठी ओमेगा-३ फॅटी अ‍ॅसिड खूप महत्त्वाचे आहे. त्यामुळे मन तीक्ष्ण होण्यास मदत होते. ज्या लोकांचे मानसिक आरोग्य चांगले नसते त्यांच्यात ओमेगा-३ चे प्रमाण कमी असते. ओमेगा-३ फॅटी ऍसिडस् समृद्ध फिश ऑइल मेंदूला निरोगी ठेवण्यास मदत करते.

हेही वाचा :

  1. Raw Milk benefits : कच्चं दूध पिल्यानं होतात हे फायदे...घ्या जाणून
  2. World Environmental Health Day : पर्यावरण वाचवण्यासाठी तुमच्या छोट्या छोट्या सवयी बदला, धोक्यांपासून होईल तुमचं रक्षण
  3. Healthy stomach : तुम्हालाही ठेवायचय नेहमी पोट निरोगी ? तर मग करू नका या चुका...

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.