ETV Bharat / sukhibhava

Honey Trap : फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅपवरील हॅलो, हायचे मेसेज ठरतील घातक; हनी ट्रॅपपासून कसे वाचाल? - हनी ट्रॅपमध्ये अडकवले

फेसबुक आणि व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून हनी ट्रॅप करण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे या हनी ट्रॅपबाबत कशी काळजी घ्यावी याबाबतची माहिती ईटीव्ही भारतच्या वाचकांसाठी आम्ही देत आहोत.

Honey Trap
संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : May 5, 2023, 1:34 PM IST

हैदराबाद : लष्कर, दुतावास, संशोधन संस्थेमध्ये हेरगिरीसाठी हनी ट्रॅपचा वापर केला जातो. संरक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना यात अडकवले जाते. लष्कर जवानांनादेखील हनी ट्रॅपमध्ये अडकवून त्यांच्याकडून गोपनिय माहिती काढली जाते. परंतु काही अशी प्रकरणे समोर आली आहेत की, ज्यात सामान्य नागरिकांदेखील हनी ट्रॅपमध्ये अडकवले जात आहे.

शेअर केले जातात न्यूड फोटो : देशभरात हनी ट्रॅपच्या प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे. हनी ट्रॅपमध्ये एखाद्या व्यक्तीला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून त्यांच्याशी जवळीकता वाढवली जाते. त्याला शरीर सुखाची ऑफर दिली जाते. न्यूड व्हिडिओ कॉल केले जातात, काही न्यूड फोटो पाठवली जातात. त्यानंतर त्यांना ब्लॅकमेल केले जाते. नुकतेच पुण्यातील डीआरडीओचे संचालक प्रदीप कुरुलकर हे हनी ट्रॅपचे शिकार झाले आहेत.

सोशल मीडियातून होते फसवणूक : पाकिस्तानी गुप्तहेरांनी कुरुलकर यांच्याशी सोशल मीडियाच्या माध्यमातून संपर्क साधला. कुरुलकर यांचा विश्वास संपादित करण्यासाठी हनी ट्रॅप करणाऱ्या व्यक्तीने स्वत:चे काही खासगी फोटो आणि व्हिडिओ शेअर केले. त्यानंतर कुरुळकर यांनीही तशाच प्रकारचे फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आणि हनी ट्रॅपचे शिकार झाले. ब्लॅकमेल केल्यानंतर प्रदीप कुरुळकर यांनी भारताची संवेदनशील माहिती पाकिस्तानी आयएसआयला दिली असल्याचं एटीएसने सांगितले आहे.

हे आहेत सॉफ्ट टार्गेट : ज्येष्ठ नागरिक हे हनी ट्रॅपसाठी सॉफ्ट टार्गेट झाले आहेत. यात अडकल्यानंतर आपली अब्रु वाचवण्यासाठी ज्येष्ठ नागरिक पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करण्यासही जात नाहीत. परंतु अशा काही गोष्ट घडत असतील तर त्वरीत पोलिसांमध्ये तक्रार करावी.

ऑनलाईन हनीट्रॅप : लडकीसे चॅटींग, सेक्सी व्हिडिओ चॅटिंग अशा जाहीरातीकरून लोकांना जाळ्यात अडकवले जाते. तर काही वेळेस सोशल मीडियावर संपर्क साधत फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली जाते. हनी ट्रॅप अनेकदा आंतरराष्ट्रीय स्तरावरुन चालवले जात असते.

या जाळ्यातून कसे वाचणार : एखाद्याकडून गोपनिय माहिती किंवा पैसे उकाळण्यासाठी महिलांचा वापर केला जातो. त्याला हनी ट्रॅप म्हटले जाते. हनी ट्रॅप सर्वच क्षेत्रात होत असून अनेकजण याचे बळी होत आहेत. या जाळ्यात आपण अडकू नये, यासाठी आपण सोशल मीडिया वापरताना काळजी घेतली पाहिजे. जर तुम्ही पॉर्न पाहत आहात काळजी घेणे आवश्यक आहे. कोणत्याच लिंकवर क्लिक करू नये. सोशल मीडियावरील अनोळखी व्यक्तीशी चॅटिंग करताना वैयक्तिक माहिती देऊ नये. मर्यादेपेक्षा जास्त बोलू नका. आपण हनी ट्रॅपसारख्या जाळ्यात अडकत नाही ना, याची काळजी घेतली पाहिजे. कोणी तुम्हाला सतत मेसेज करत असेल तर त्याला ब्लॉक करा. तरीही तुमची फसवणूक झाली तर पोलिसांशी संपर्क साधा.

मुलींचा फोटो लावून फसवतात : बहुतेकदा हनी ट्रॅप करणारी गँग ही फेसबूक मेसेंजरवर मुलीचा फोटो लावून अनेकांना जाळ्यात ओढत असतात. खोटा फोटो, आयडी बनवून ते मैत्री बनवत असतात त्यानंतर न्यूड व्हिडिओ कॉल करण्यास सांगून ते ब्लॅकमेल करत असतात. त्यामुळे अनोळखी व्यक्तीकडून मेसेज आल्यास त्याला रिप्लाय करू नये. ते सतत मेसेज करत असतील त्यांना ब्लॉक केले पाहिजे.

हेही वाचा - Honey Trap : हनी ट्रॅप म्हणजे काय रे भावा? आयएसआयकडून कसा होतो हनी ट्रॅपचा वापर ?

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.