मुंबई : भूकंप हा पृथ्वीच्या भूवैज्ञानिक क्रियांचा एक भाग आहे, जो कधीही कुठेही येऊ शकतो. तुर्कीमध्ये काल आलेल्या 7.8 तीव्रतेच्या भीषण भूकंपात आत्तापर्यंत 4000 हून अधिक लोक मारले गेले आहेत. भूकंपानंतर वाचलेल्यांना ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यासाठी सोमवारी रात्री उशीरा पर्यंत शोध मोहीम चालू होती. अधिकाऱ्यांच्या मते मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. पाऊस आणि कडक थंडीमुळे बचाव कार्यात अडथळे येत आहेत. भूकंप जेव्हा पृथ्वीच्या खाली पृष्ठभागावर टेक्टोनिक्स नावाच्या प्लेट्स हलतात तेव्हा भूकंप येतो. तर मग भूकंप झाल्यावर काय करावे हे आपल्याला नेहमी माहित असले पाहिजे.
भूकंप होण्याआधी या सेफ्टी टिप्स फाॅलो करा :
- आपत्तीच्या वेळी सहज बाहेर पडता येईल अशा पद्धतीने घरात सामान ठेवा.
- प्रथमोपचार किट नेहमी घरी तयार ठेवावे.
- भूकंपासाठी नेहमी आणि नेहमी तयार असले पाहिजे. घर बांधताना ते नेहमी भूकंपाच्या दृष्टीकोनातून मजबूत केले पाहिजे, जेणेकरून भूकंपाच्या वेळी घराचा फारसा परिणाम होणार नाही.
भूकंपाचे धक्के जाणवत असताना या सेफ्टी टिप्स नेहमी लक्षात ठेवा :
- जोपर्यंत हादरे सुरू आहेत तोपर्यंत एकाच जागी बसून राहा.
- भूकंपाचे धक्के जाणवताच एका मजबूत टेबलाखाली बसा आणि घट्ट धरा.
- मोठ्या कपाटांपासून दूर रहा, ते तुमच्यावर पडले तर तुम्हाला दुखापत होऊ शकते.
- तुम्ही उंच इमारतीत राहत असाल तर खिडकीपासून दूर राहा.
- जर तुम्ही बाहेर असाल तर रिकाम्या जागेत जा, म्हणजे इमारती, घरे, झाडे, विजेचे खांब यापासून दूर राहा. ते कधीही अंगावर पडू शकते.
- त्यावेळी तुम्ही कार चालवत असाल तर गाडीचा वेग कमी करा आणि रिकाम्या जागेत पार्क करा. थरथरणे थांबेपर्यंत कारमध्येच राहा.
- जर तुम्ही अंथरुणावर असाल तर तिथेच राहा आणि घट्ट धरून ठेवा. डोक्यावर उशी ठेवा.
- थरथरणे थांबेपर्यंत तुमच्या आश्रयाला धरून ठेवा.
- तुमची जागा सुरक्षित करा.
- सुरक्षित राहण्याची योजना करा.
- आपत्ती पुरवठा आयोजित करा.
- आर्थिक त्रास कमी करा.
15,000 पेक्षा अधिक लोक जखमी : तुर्कीच्या 10 प्रांतांमध्ये किमान सुमारे 15,000 पेक्षा अधिक लोक जखमी झाले आहेत. आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, सीरियातील सरकारच्या ताब्यात असलेल्या भागात मृतांची संख्या 656 लोकांवर पोहोचली आहे, तर सुमारे 1,400 जखमी झाले आहेत. तर बंडखोरांच्या ताब्यात असलेल्या वायव्य भागात, तेथे कार्यरत असलेल्या गटांनी सांगितले की तेथे किमान 450 लोक मरण पावले असून शेकडो लोक जखमी झाले आहेत. तुर्कस्तानच्या हाते प्रांतात कोसळलेल्या घरांच्या ढिगाऱ्याखाली बरेच लोक अडकले असून अनेक इमारतींचे नुकसान झाले आहे.
हेही वाचा : India Help Turkey : भूकंपाने संकटात सापडलेल्या तुर्कीला भारताचा मदतीचा हात, विमानाने साहित्य रवाना