हैदराबाद : Drinks for Bone आजकाल बदलती जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळं सर्वसामान्यांमध्ये सांधेदुखीची समस्या वाढत चालली आहे. चुकीच्या आसनात बसल्यामुळं अनेक वेळा कंबरदुखी, पाठदुखी आदी समस्यांना सामोरं जावं लागतं. वृद्धत्वामुळं हाडांशी संबंधित समस्या देखील उद्भवतात. हाडे मजबूत करण्यासाठी व्यायाम करणं, धुम्रपान टाळणं, काही जीवनसत्त्वं आणि खनिजं सप्लिमेंट घेणे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी युक्त पदार्थांचं सेवन करणं अत्यंत आवश्यक आहे. अर्थात दूध, दही आणि चीज यांसारख्या दुग्धजन्य पदार्थांमध्ये कॅल्शियम मोठ्या प्रमाणात आढळतं, परंतु काही ज्यूस देखील आहेत, जे कॅल्शियम, व्हिटॅमिन डी, फॉस्फरस, व्हिटॅमिन सी आणि इतर भरपूर प्रमाणात देऊन तुमची हाडे मजबूत करू शकतात. अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्या आहाराची विशेष काळजी घेतली पाहिजे. हाडे निरोगी ठेवण्यासाठी प्या ही ड्रिंक्स.
कमकुवत हाडांमुळं होणारे आजार :
- हाडांचा कर्करोग
- बोन डेंसिटी
- हाडांचा संसर्ग
- ऑस्टियोपोरोसिस
- मुडदूस
- अननसाचा ज्यूस : अननसाचा रस प्यायल्यानं हाडं निरोगी राहतात. चवीला आंबट-़गोड असण्याबरोबरच ते आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे. अननसाच्या रसामध्ये जीवनसत्त्वं आणि खनिजं पुरेशा प्रमाणात आढळतात, जे अपचन आणि संधिवात यांसारख्या आजारांवर उपचार करण्यास मदत करतात.
- संत्र्याचा ज्यूस : संत्र्यामध्ये भरपूर पोषक तत्त्वं असतात, जी शरीर निरोगी ठेवण्यास मदत करतात. त्याची चवही आंबट- गोड असते, जी सर्वांनाच आवडते. शरीराला हायड्रेट ठेवण्यासोबतच हाडांसाठीही फायदेशीर आहे. संत्र्याचा रस रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारा म्हणून ओळखला जातो, जो तुम्हाला अनेक आजारांपासून वाचवण्यास मदत करतो.
- स्ट्रॉबेरी ज्यूस : स्ट्रॉबेरीच्या ज्यूसमध्ये अनेक अँटी-ऑक्सिडंटस् असतात. यामुळे तुमचं अनेक प्रकारच्या व्याधींपासून रक्षण होतं. त्यात व्हिटॅमिन सी, कॅल्शियम, मॅंगनीज, कॉपर, झिंक असे अनेक पोषक घटक आढळतात. हा ज्यूस प्यायल्यानं हाडांना बळकटी मिळते.
- ग्रीन ज्यूस : हाडं निरोगी ठेवण्यासाठी कॅल्शियम आणि व्हिटॅमिन के खूप महत्वाचं आहे. शरीरात या जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळं हाडांशी संबंधित अनेक समस्या उद्भवतात. अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्या आहारात ग्रीन ज्यूसचा समावेश करू शकता.
- दूध : पोषक तत्वांनी युक्त दूध शरीराला अनेक प्रकारे फायदेशीर ठरतं. दूधात जास्त प्रमाणात कॅल्शियम असत. जे हाडं निरोगी ठेवण्यास मदत करतं. रोज झोपण्यापूर्वी एक ग्लास कोमट दूध प्यायल्यास अनेक समस्या टाळता येतात.
हेही वाचा :