नॉर्थ कारोलिना हेल्थ केअर विद्यापीठाद्वारे मास्क संबंधी एक नवे संशोधन करण्यात आले. यात चेहऱ्यावर दुहेरी सुरक्षा आवरण असल्यास ते दुप्पट क्षमतेने प्रभावीपणे सार्स - कोव - २ आकाराचे कण गाळू शकतात, त्यांना नाकावाटे किंवा तोंडावाटे अंदर जाऊ देत नाही, आणि कोरोनापासून सुरक्षा देतात, असे समोर आले आहे.
तुम्ही मास्क कसे घालता हे खूपच महत्वाचे
तुमच्या मास्क घट्ट लागलेला असावा. जर तुम्ही संसर्गजन्य क्षेत्रात नसाल तर तुम्ही तीन थर असलेला मास्क घालायला हवा. पण, जर तुम्ही संभाव्यत: जास्त जोखिमीच्या परिस्थितीत असाल, तर तुम्ही एन ९५ मास्क घालायला हवा. मास्क व्यवस्थित तोंडाला बसला की नाही, हे देखील तुम्ही बघायला हवे. मास्क घालताना तुम्ही तो व्यवस्थित घालायला हवा. गळ्याभोवती मास्क घातल्यास आसपास असलेल्या एखाद्या संसर्गित व्यक्तीमार्फत तुमच्या मास्कवर विषाणू जमा होऊ शकतात. गळ्याभोवती मास्क घातल्यास आपण विषाणूला जमा करण्यासाठी एक बास्केट बनवतो. तोच मास्क नंतर नाकाभोवती लावल्यास त्यातून नाकात विषाणू पोहचवतो. त्यामुळे, जेव्हा तुम्ही मास्क घालाल तेव्हा ते व्यवस्थित घालणे गरजेचे आहे. तो चुकीच्या पद्धतीने घातल्यास तो न घालताना जितका धोका आहे, त्यापेक्षा अधिक धोका तुम्हाला होऊ शकतो. मास्क घातल्याने विषाणूचा प्रसार १० टक्क्यांनी कमी होतो. आणि जेव्हा तुम्ही एन ९५ मास्क घातला तेव्हा तो ९५ टक्क्यांनी कमी होतो.
कामावर असताना काय करावे?
कामाच्या ठिकाणी असताना शक्य असल्यास तुम्ही खोलीतील शेवटच्या भागी जेथे खिडकी आहे, तेथे जावे आणि आपला मास्क काढावा. त्यानंतर ताज्या हवेचा दीर्घ श्वास घ्यावा, परत मास्क चेहऱ्याला लावावा आणि कामावर परतावे. हे करणे महत्वाचे आहे, कारण तुम्ही त्याच हवेचा पुन्हा पुन्हा श्वास घेता.
खरे पाहता कामाच्या ठिकाणी असताना तुम्ही मास्कला हात लावू नये, तसेच काही खावू नये, असे सूचवले जाते. तरी तुम्हाला जर कामावर चहा ब्रेक आवश्यक असल्यास तुम्ही आळीपाळीने मास्क काढायला हवे. उदाहरण, जर एक व्यक्ती चहा पीत असेल, त्यावेळी दुसऱ्यांनी मास्क घालून राहावे. तसेच, मास्क व्यवस्थित लावण्याबाबत दुसऱ्या व्यक्तीला सांगायचे असल्यास, तुम्ही व्यवस्थित मास्क घाला, असे म्हणण्या ऐवजी, तुमचा मास्क घसरला आहे, असे म्हणावे. यातून तुम्हाला पुढच्या व्यक्तीची काळजी आहे, असे त्या व्यक्तीला वाटायला हवे.
मास्क व्यवस्थित तोंडाला लागला आहे की नाही, हे कसे ओळखाल?
- मास्क घातल्यावर जर तुमचा चष्मा दवाने अच्छादला, तर तुमचा मास्क व्यवस्थित लागला आहे. मास्क घातले असताना चष्म्यावरील दव अच्छादन कमी करण्यासाठी देखील उपाय आहेत.
- बोलताना जर मास्क नाकाच्या खाली सरकला, तर तो मास्क बरोबर बसलेला नाही.
मास्क काढताना कुठली काळजी घ्यावी?
एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवावी ती म्हणजे, तोंडाला मास्क लावण्यासाठी त्यास काणाला अडकवायला दोऱ्या असतात. कानाला लावलेल्या दोऱ्यांना पकडूनच मास्क काढावा. त्यानंतर मास्कला बंद करून ठेवावे, त्यास उघडे ठेवू नये. वापरलेला मास्क कधीही लटकवून ठेवू नये. पावसाळ्यात ओला मास्क घातल्यास तो कुचकामी ठरतो. कारण त्यामुळे मास्क आपल्या योग्य ठिकाणाहून खाली घसरतो. मास्कवर फेस शिल्ड घातल्यास तो ओला होणारा नाही.
हेड स्ट्रॅप असलेल्या मास्कला सहसा प्राधान्य दिले जाते. जर हेड स्ट्रॅप लावताना ते घट्ट असल्याकारणाने दुखत असेल किवा अस्वस्थ वाटत असेल, तर चिंतीत होण्याची गरज नाही, कारण बऱ्याचवेळी मास्क चेहऱ्यावर फिट झाल्याने असे होते. आणि कालांतराने व्यक्तीला ते सामान्य वाटते. सध्या बाजारात असे बरेचसे मास्क मिळत आहेत, ज्यात कानाला लावणाऱ्या स्ट्रॅपना क्लिप लावलेली आहे. यामुळे कानाला दुखत नाही.
डबल मास्कचा वापर
सुरक्षेच्या दृष्टिकोणातून डबल मास्क देखील घालता येतील. सीडीसीनुसार, सुरक्षा अजून मजबूत करण्यासाठी डिस्पोजेबल मास्कच्यावर कपड्याचा मास्क देखील घालता येईल. तसेच, ज्या व्यक्तींची त्वचा संवेदनशील आहे किंवा त्वचासंबंधी समस्येशी संघर्ष करत आहेत, ते आधी कापडी मास्क घालू शकतात व त्यावर डिस्पोजेबल मास्क घालू शकतात.
मास्कचे फायदे आणि विल्हेवाट
फक्त कोरोना संक्रमणातच नव्हे, तर मास्कच्या नियमित वापराने अॅलर्जीने ग्रस्त असलेल्या व्यक्तींना देखील आराम मिळत आहे. मास्कला फेकण्याअगोदर त्याला डिसइन्फेक्ट करावे, त्यानंतर त्यास पिवळ्या रंगाच्या थैलीत टाकून सुक्या कचऱ्यात फेकून द्यावे. काही महानगरांमधील मोठ्या सोसायट्यांमध्ये मास्कला जाळून नष्ट करण्याची देखील व्यवस्था करण्यात आली आहे. जर अशी काही व्यवस्था नसेल तर मास्कला फेकण्याअगोदर त्यास साबणाच्या पाण्यात धुवूनच फेकावे.
मास्क पुन्हा वापरण्याबद्दल
सामान्यतः कपड्याने निर्मित मास्कला परत धुवून त्याचा पुन्हा वापर करता येते. मात्र, एन ९५ मास्कला साबनाच्या पाण्यात धुता येत नाही. पण, कदाचित या मास्कचे हॉट एअर ओव्हनमध्ये ७० अंश सेल्सियस तापमानात निर्जंतुकीकरण होऊ शकते.
- डॉ. इरा अलमेडा
डॉ. इरा अलमेडा या मारगाव गोवा येथील होस्पिसिओ रुग्णालयातील वरिष्ट बालरोग तज्ज्ञ आहेत. ज्यांनी २०१५ ते २०२० या ५ वर्षांच्या काळात वैद्यकीय अधीक्षकांची जबाबदारी देखील पार पाडली. या दरम्यान गोवा राज्यासाठी कविड संबंधी मानक कार्यप्ररणाली (एसओपी) निर्माण कार्यात देखील त्यांचा समावेश होता. सध्या त्या दक्षिण गोव्यातील लसीकरणासाठीच्या नोडल अधिकारी आहेत. आणि त्या तिसऱ्या लाटेच्या तयारीसाठीच्या टास्क फोर्स आणि स्टिअरिंग कमिटीच्या सदस्या देखील आहेत.