हैदराबाद: सौंदर्य केवळ चेहऱ्यावरूनच नाही तर शरीराच्या इतर भागातूनही दिसून येते. चेहऱ्याच्या काळजीसोबतच हात आणि पायांची काळजी घेणेही खूप गरजेचे आहे. हात आणि पाय तुमचे सौंदर्य वाढवतात. जर तुमचे पाय सुंदर असतील तर तुम्ही कोणताही शॉट ड्रेस आणि स्टायलिश शूज घालू शकता. पण, टॅनमुळे पायांवर काळे डाग दिसतात. अशा वेळी काही घरगुती उपाय करून तुम्ही तुमच्या पायांची योग्य काळजी घेऊ शकता. (home made pedicure to remove tan )
बेसन दह्यापासून पॅक: सौंदर्य तज्ज्ञांच्या मते, बेसन आणि दह्यापासून तयार केलेल्या पॅकने तुम्ही पायाचा काळेपणा दूर करू शकता. सर्व प्रथम एका भांड्यात एक चमचा बेसन टाका. आवश्यकतेनुसार दही घालून पेस्ट बनवा. 10-15 मिनिटे पायांवर पेस्ट लावा. ठरलेल्या वेळेनंतर पाय साध्या पाण्याने धुवावेत. (A pack made from gram flour and curd)
एलोवेरा जेल: पायातील टॅन काढण्यासाठी तुम्ही एलोवेरा जेल देखील वापरू शकता. एलोवेरा जेल एका भांड्यात काढा. यानंतर, 15 मिनिटे पायांवर लावा. ठरलेल्या वेळेनंतर पाय साध्या पाण्याने धुवावेत. रेसिपी रोज वापरल्याने पायाचा काळेपणा दूर होईल. (Aloe vera gel)
बटाट्याचा रस: तुम्ही बटाट्याचा रस पायाला लावू शकता. रस तयार करण्यासाठी दोन बटाटे घ्या. यानंतर त्यांचा रस काढा. सुमारे 10-15 मिनिटे पायांवर रस लावा. यानंतर कोमट पाण्याने पाय धुवा. पाण्याने पाय धुतल्यानंतर मॉइश्चरायझर लावा. रोज पायांवर मॉइश्चरायझर लावल्याने त्वचेत फरक दिसेल. (Potato juice)
लिंबू आणि मध: लिंबूचा रस त्वचेसाठी ब्लिचिंग एजंट म्हणून काम करतो. एक मोठा चमचा मध,दोन मोठे चमचे लिंबूचे रस एकत्र करा आणि तयार झालेली पेस्ट तुमच्या पायाला लावा. पंधरा मिनिटानंतर पाण्याने पाय धुऊन घ्या. (Lemon and honey)
संत्री पॅक: संत्र्याच्या सालीचा वापर करूनही तुम्ही पायावरील टॅन काढू शकता, असे तज्ञांचे मत आहे. सर्वप्रथम संत्र्याची साले उन्हात वाळवा. यानंतर त्यांना मिक्सरमध्ये टाकून त्यांची पावडर तयार करा. पावडरमध्ये एक चमचे कच्चे दूध घालून पेस्ट तयार करा. तयार केलेली पेस्ट पायाला लावा. 10-15 मिनिटांनी पाय धुवा. हा पॅक तुम्ही आठवड्यातून 2-3 वेळा वापरू शकता. तुमचे पाय जर काळपट दिसत असतील तर ते पुन्हा एक वेळ गोरे करण्यासाठी तुम्ही ही घरातील सहज पद्धत अवलंबू शकता. (Orange Pack)