ETV Bharat / sukhibhava

New Insulin Oral Capsule : मधुमेहाच्या रुग्णांची होणार इंजेक्शन पासून मुक्ती!, ओरल कॅप्सूल करणार इंजेक्शनचे काम

काही मधुमेहाच्या रुग्णांना नियमितपणे इन्सुलिनची इंजेक्शन्स घ्यावी लागतात. मात्र आता रुग्णांची यातून लवकरच सुटका होऊ शकते. आता इंजेक्शनऐवजी ओरल कॅप्सूल वापरता येणार असल्याचा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे. वाचा पूर्ण बातमी..

New Insulin Oral Capsule
नवीन इन्सुलिन ओरल कॅप्सूल
author img

By

Published : Jul 22, 2023, 9:19 PM IST

सिडनी : ऑस्ट्रेलियन शास्त्रज्ञांनी एक नवीन प्रकारची ओरल कॅप्सूल तयार केली आहे. त्यामुळे आता इन्सुलिन इंजेक्शनशिवाय घेणे शक्य होणार आहे. मधुमेहाने त्रस्त असलेल्या लोकांना दिवसातून अनेकवेळा इन्सुलिनचे इंजेक्शन घ्यावे लागते. हे केवळ वेदनादायकच नाही तर खर्चिक देखील आहे. आरएमआयटी युनिव्हर्सिटीच्या डॉ. जेमी स्ट्रॅचन यांच्या मते, कॅप्सूलद्वारे औषध पोटात जाऊन लहान आतड्यात सुरक्षितपणे पोहोचते.

नवीन ओरल कॅप्सूलची चाचणी : स्ट्रॅचन म्हणाले की, 'कॅप्सूलमध्ये एक विशेष आवरण आहे जे पोटाच्या कमी pH वातावरणात विरघळण्यापासून संरक्षण करण्यासाठी डिझाइन केले आहे'. ते म्हणाले की, आम्ही इन्सुलिनला फॅटी नॅनोमटेरियल असलेल्या कॅप्सूलमध्ये ठेवतो, जे इन्सुलिन स्रावित करण्यास मदत करते.' बायोमटेरिअल्स अ‍ॅडव्हान्सेस या आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या प्री - क्लिनिकल अभ्यासात नवीन ओरल कॅप्सूलची चाचणी इंसुलिनसह करण्यात आली. यामध्ये जलद काम करणारी आणि हळू काम करणारी, अशा दोन्ही प्रकारच्या इन्सुलिनसह ओरल कॅप्सूलच्या कार्यक्षमतेचे मूल्यांकन केले गेले आहे.

इंसुलिनच्या इंजेक्शनपेक्षा चांगले आहे : आरएमआयटी युनिव्हर्सिटीच्या स्कूल ऑफ सायन्समधील बायोफिजिकल केमिस्ट व सह-मुख्य संशोधक प्रोफेसर शार्लोट कॉन म्हणाले की, 'रक्तातील साखर नियंत्रित करण्यासाठी जर तुम्ही काही खात असाल तर तुम्हाला जलद प्रतिसाद आवश्यक आहे. ते कार्य जलद करणाऱ्याला इन्सुलिन म्हटले जाते. 'आमच्याकडे स्लो-अ‍ॅक्टिंगसाठी उत्कृष्ट शोषण परिणाम चाचणीमध्ये मिळाला, जे इंसुलिनच्या इंजेक्शनपेक्षा सुमारे 50 टक्के चांगले आहे, असे कॉन म्हणाले.

आणखी चाचण्या करण्याची आवश्यकता : कॉन म्हणाले की, कॅप्सूलने जलद क्रिया करणाऱ्या इंसुलिनसाठी चांगले शोषण परिणाम प्राप्त केले. आमचे परिणाम असे दर्शवतात की या ओरल कॅप्सूलचा स्लो-अ‍ॅक्टिंग इंसुलिनसाठी वापर होऊ शकतो, जे मधुमेही जलद क्रिया करणाऱ्या इंसुलिन इंजेक्शन्सने बदलू शकतात. ही चांगली सुरुवात आहे पण आम्हाला आणखी चाचण्या कराव्या लागतील, असे ते शेवटी म्हणाले.

हेही वाचा :

  1. UTI Problem In Monsoon : पावसाळ्यात वाढतो यूटीआय (UTI) चा धोका ; संसर्ग टाळण्यासाठी करा या पद्धतींचे अनुसरण
  2. Liver Disease : शरीराच्या या भागांमध्ये सूज येते ? करू नका दुर्लक्ष, असू शकतो हा आजार...
  3. Parkinsons disease : पार्किन्सन रोग शांतपणे वाढत असल्याची शक्यता; रोगाची लक्षणे कमी करण्याचे नवीन मार्ग

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.