वॉशिंग्टन : जगभरात कर्करोगाने लाखो रुग्णांना आपला जीव गमवावा लागतो. त्यामुळे कर्करोग झालेल्या रुग्णांचे कुटुंबिय मोठ्या चिंतेत असतात. आता मात्र कर्करोगाबाबत मोठ्या प्रमाणात संशोधन होत असून रुग्णांच्या जीवाला धोका होत नसल्याचे या संशोधनातून स्पष्ट होत आहे. प्रोस्टेट कर्करोगाच्या रुग्णांवर रेडिओ थेरेपी किवा शस्त्रक्रिया केल्यामुळे त्यांना 15 वर्षांनंतरही कोणताच धोका नसल्याचे संशोधकांनी केलेल्या संशोधनात पुढे आले आहे. ऑक्सफर्ड आणि ब्रिस्टल विद्यापीठांच्या संशोधकांनी याबाबतच्या चाचणीचे निष्कर्ष नुकतेच मिलानमधील युरोपियन असोसिएशन ऑफ युरोलॉजी (EAU) काँग्रेसमध्ये सादर केले. हे संशोधन न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिनमध्येही प्रकाशित झाले. या संशोधनासाठी नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर हेल्थ अँड केअर रिसर्च (NIHR) ने निधी दिला होता.
रेडिओथेरपी केलेल्या रुग्णांना कमी धोका : प्रोस्टेट कर्करोगाच्या रुग्णांवर शस्त्रक्रिया किवा रेडिओ थेरेपी केल्यानंतर त्यांना कोणताही धोका नसल्याचे चाचमीतून स्पष्ट झाले आहे. रेडिओ थेरपीचे किवा शस्त्रक्रियेचे परिणाम मूत्र आणि लैंगिक कार्यावर १२ वर्षापर्यंत टिकून राहत असल्याचेही या चाचण्यामध्ये स्पष्ट झाले आहे. ऑक्सफर्ड विद्यापीठातील प्राध्यापक फ्रेडी हॅम्डी यांनी कमी जोखीम असलेल्या प्रोस्टेट कर्करोगाच्या निदानानंतर उपचारात घाई करण्याची गरज नसल्याचे या निष्कर्षावरुन स्पष्ट होत असल्याचे सांगितले आहे.
यूकेच्या नऊ केंद्रांमध्ये घेण्यात आली चाचणी : प्रोस्टेट कर्करोगाचे निदान झाल्यानंतर रुग्णांनी किवा त्यांच्या नातेवाईकांनी घाबरुन जाण्याचे कारण नसल्याचे प्राध्यापक फ्रेडी हॅम्डी यांनी यावेली स्पष्ट केले. रुग्ण आणि चिकित्सक विविध उपचारांचे फायदे आणि संभाव्य नुकसान जाणून घेण्यासाठी वेळ घेऊ शकतात, असेही त्यांनी स्पष्ट केले. रुग्णांच्या जगण्यावर यामुळे विपरित परिणाम होणार नसल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. ही चाचणी यूकेच्या नऊ केंद्रांमध्ये घेण्यात आली. हा सर्वात दीर्घकाळ चालणारा अभ्यास आहे. प्रोस्टेट कर्करोग असलेल्या रुग्णांसाठी निरीक्षण, शस्त्रक्रिया ( रॅडिकल प्रोस्टेटेक्टॉमी ) आणि हार्मोन्ससह रेडिओथेरपी या तीन प्रमुख उपचारांचे मूल्यांकन करणारा हा अभ्यास असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.
९७ टक्के रुग्ण १५ वर्षापेक्षा जास्त जगले : 1999 आणि 2009 दरम्यान यूकेमध्ये 50-69 वर्षे वयोगटातील 1 हजार 643 पुरुषांना रक्त तपासणीनंतर स्थानिकीकृत प्रोस्टेट कर्करोगाचे निदान झाले होते. त्यानंतर सक्रिय निरीक्षण (545), रॅडिकल प्रोस्टेटेक्टॉमी (553) किंवा रॅडिकल रेडिओथेरपी (545) याचा अभ्यास केला. यात मृत्यू दर, कर्करोगाची प्रगती, प्रसार आणि जगण्याच्या गुणवत्तेवर उपचारांचा प्रभाव मोजण्यासाठी संशोधकांनी सरासरी 15 वर्षांमध्ये रुग्णांचा अभ्यास केला. यात ९७ टक्के रुग्ण १५ वर्षापेक्षा जगल्याचे स्पष्ट झाले.
हेही वाचा - World Sleep Day 2023 : चांगल्या आरोग्यासाठी आहे ६ तास झोप घेणे महत्वाचे, पुरेशा झोेपअभावी 'हे' होतात वाईट परिणाम