हैदराबाद - तणावापासून मुक्ती आणि झोपेच्या तक्रारीही नाहीशा करणारी वॅलेरियन औषधी वनस्पती ही बहुपयोगी आहे. याचे शास्त्रीय नाव वलेरियाना वॉलिची आहे. ही वनस्पती मूळची युरोपची असून ती आशियातल्या काही भागात आढळते. उत्तराखंडचे आयुर्वेदमध्ये एमडी आणि पीएचडी असलेले आमचे आयुर्वेदिक तज्ज्ञ डॉ. व्ही. व्ही. प्रसाद म्हणतात, 'वॅलेरियन ही उंच ठिकाणची वनस्पती आहे. भारतात हिमालयात ही वनस्पती उगवते. या वनस्पतीच्या मुळांचा वापर केला जातो. वॅलेरियनच्या मुळात जाड थराचे अॅसिड आणि ज्वलनशील तेल असते. यामुळे या वनस्पतीला चांगला गंध येतो आणि गोड – कडू अशी चव असते.'
डॉ. प्रसाद यांनी सांगितलेले या वनस्पतीचे फायदे -
नर्व्हस डिसऑर्डर्स
शरीरातल्या नसा तीव्र उत्तेजीत होत असतील तर या वॅलेरियन वनस्पतीमुळे ते कमी होते. जर क्रोध, तणाव इत्यादी भावना असतील तर त्यापासून आराम मिळण्यासाठी मदत होते. ही वनस्पती तणाव दूर करण्यासाठीच आहे. एखाद्या व्यक्तीला झोप येत नसेल तर या वनस्पतीचा उपयोग करतात.
हृदय
नर्व्हस डिसऑर्डर्समुळे शरीरातल्या अनेक भागांवर परिणाम होतो. त्यापैकी एक आहे हृदय. सुरुवातीला हृदयाची धडधड जास्त असते आणि नंतर हृदयाचे स्नायू कमकुवत होतात. अशा परिस्थितीत वॅलेरियन मुळांचे सेवन केले जाते.
अँटिऑक्सिडेटिव्ह
शरीरातले नको असलेले पदार्थ मल, मूत्र याद्वारे विसर्जित होतात. पण कधी कधी विषारी पदार्थ मागे राहतात. त्यामुळे काही विशिष्ट आजार उद्भवू शकतात. म्हणून वॅलेरियन फायदेशीर होऊ शकते.
खालील आजारातही ही वनस्पती उपयोगी आहे
- अर्धांगवायू
- पार्किन्सन
- मधुमेह
- उन्माद
- अपस्मार ( एपिलिप्सी )
- मानसिक विकार
- डोळ्यांचे विकार
- मासिक पाळीच्या समस्या इत्यादी
डोस
कुठल्याही आजारावर औषध घेण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घेणे अत्यावश्यक आहे. तुम्हाला लिहून दिल्याप्रमाणे डोस घ्या. डॉ. प्रसाद म्हणतात, पावडरच्या स्वरूपात घेत असाल तर 250 मिलिग्रॅम -1 ग्रॅम ( विभाजीत डोस ) किंवा काढ्याच्या स्वरूपात घेणार असाल तर 10 – 20 मि.ली. घ्या. हे औषध जास्त घेतले किंवा जास्त काळ घेतले तर यामुळे नैराश्य, हृदयाची सुस्ती, उलट्या, डोकेदुखी इत्यादी विकार उद्भवू शकतात. हे एकमेव औषध म्हणून देत नाहीत, तर ते अनेक फॉर्म्युलेशनमध्ये असलेले औषध मिळते.
लोक रासायनिक फॉर्म्युलेशन असलेली औषधे घेण्यापेक्षा इतर औषधांकडे वळत असताना, ही औषधी वनस्पती खूप उपयोगी आहे. याचे फार कमी दुष्परिणाम होतात. सध्याच्या काळात वेगवान, स्पर्धात्मक आणि अनिश्चित आयुष्यामुळे अनेक लोकांना तणाव, चिंता आणि झोपेच्या समस्या असतात. त्यांच्यासाठी वॅलेरियन ही औषधी वनस्पती अतिशय उपयोगी आहे.