वॉशिंग्टन : मुलांना जर समान वंशाच्या शिक्षकांनी शिकवले तर त्यांच्यात अडचणी सोडवण्याची कौशल्य विकसित होत असल्याचा दावा संशोधकांनी केला आहे. या मुलांमध्ये वयाच्या सातव्या वर्षी उच्च शिक्षण आणि समस्या सोडवण्याची कौशल्ये असतात. कृष्णवर्णीय आणि लॅटिनक्स मुलांमध्ये याचा परिणाम सर्वात जास्त दिसून आल्याचा निष्कर्ष या संशोधकांनी काढला आहे. या संशोधकांनी अमेरिकेतील तब्बल 18 हजार पेक्षा जास्त विद्यार्थ्यांवर संशोधन केले आहे.
समानतेला चालना देण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल : मुलांची वांशिकता त्यांच्या शिक्षकांसोबत जोडली गेली, तर मुलांची कार्य करण्याची क्षमता अधिक असते. त्यासह मुलांची स्मृती चांगली विकसित होण्याची शक्यता असते. कौशल्य शिकण्यासाठी आणि समस्या सोडवण्यासाठी त्यांचे वांशिक गुण जुळणे आवश्यक असल्याचा दावा या संशोधकांनी केला आहे. शिक्षक आणि कर्मचाऱ्यांमध्ये विविधता आणणे हे शाळांमध्ये अधिक समानतेला चालना देण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल असल्याचे मत युनिव्हर्सिटी ऑफ पेनसिल्व्हेनियाच्या ग्रॅज्युएट स्कूल ऑफ एज्युकेशनचे प्राध्यापक मायकेल गॉटफ्राइड यांनी व्यक्त केले. याबाबतचे संशोधन अर्ली एज्युकेशन अँड डेव्हलपमेंट या जर्नलमध्ये प्रकाशित झाले आहे.
विद्यार्थ्याची शैक्षणिक प्रगती होण्यास मदत : मुलांची बौद्धीक पातळी विकसित होण्यासाठी वयाच्या सातव्या वर्षापासून सुरूवात होते. या काळात त्यांना त्यांच्या समान वंशांच्या शिक्षकांनी शिकवल्यास त्यांची बौद्धीक पातळी चांगल्या प्रकारे विकसित होत असल्याचा दावा या संशोधनातून करण्यात आला आहे. या संशोधनाने अमेरिकन शिक्षकांमध्ये वांशिकतेच्या मुद्द्यावरही प्रकाश टाकण्यात आल्याचा दावा या संशोधकांनी केला आहे. समान वंशांच्या शिक्षकाने शिकवल्यामुळे विद्यार्थ्याची शैक्षणिक प्रगती सुधारू शकते. नऊ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांमध्ये शिक्षकआणि विद्यार्थ्यांच्या वांशिक समानतेचा प्रभाव केवळ शैक्षणिक प्रगतीवरच नव्हे तर विकासावरही परिणाम करतो. याबाबतची तथ्ये या संशोधनातून मांडण्यात आली आहेत. हे संशोधन १८ हजार १७० बालवाडीतील बालकांवर करण्यात आले. अमेरिकेच्या शिक्षण विभागाने याबाबतचे विश्लेषण केल्याचा दावाही या संशोधनात करण्यात आला आहे.
हेही वाचा - World Water Day 2023 : जल है तो जीवन है, जाणून घ्या काय आहे जल दिनाचा इतिहास आणि महत्त्व