एकदा का लग्न झाले की मुले होणे हे गृहित धरले जाते आणि त्यामुळेच ज्यांना मूल होत नाही, त्यांच्यासाठी ही समस्या कळीची बनते. समाजाचा तुमच्याकडे पाहायचा दृष्टिकोन बदलतो. यामुळे तणावात वाढच होते. एकूण जोडप्याला फक्त वैद्यकीय समस्येलाच नाही, तर सामाजिक समस्येलाही तोंड द्यावे लागते. याबद्दलच ई टी व्ही भारत सुखीभवच्या टीमने प्रसूती रोग विशेषज्ञ, स्त्रीरोगतज्ज्ञ आणि वंध्यत्व विशेषज्ञ तज्ज्ञ डॉ. पूर्णा सहकारी यांच्याशी बातचीत केली.
पालकत्वाच्या प्रवासाचा अनुभव घ्यायला अनेकजण उत्सुक असतात. काहींवर ही कृपा लगेच होते, तर काहींना मात्र आई आणि बाबा होण्याची वाट पाहावी लागते. आपण वंध्यत्वाच्या समस्येची संख्या पाहतो, तेव्हा ते फक्त हिमनगाचे शिखर असते. कारण याच्याशी सामाजिक दृष्टिकोनही जोडला जातो. त्यामुळे त्याचा स्वीकारच होत नाही.
समाज म्हणून वंध्यत्वाकडे आपण एक वैद्यकीय समस्या म्हणूनच पाहिले पाहिजे. यामुळे मूल हवे असणाऱ्या जोडप्यांसाठी याकडे सकारात्मकतेने पाहिले जाईल. वंध्यत्व म्हणजे काय? या समस्येच्या निराकारणसाठी कुणाला भेटायचे? एक वर्ष निरोधाचे कुठलेही साधन न वापरता समागम करूनही स्त्री गरोदर होत नसेल, तर ते वंध्यत्व असते. वंध्यत्वामागे काय कारणे असतात? पत्नीमध्ये दोष असतो की पतीमध्ये? वंध्यत्वाची अनेक कारणे आहेत. पत्नी आणि पती दोघांमध्येही दोष असू शकतो.
स्त्री आणि पुरुषांमध्ये वंध्यत्वाची अनेक कारणे असू शकतात. काहींमध्ये ठोस कारणे सापडत नाहीत. अशा समस्यांना 'अनएक्सप्लेन्ड' म्हटले जाते.
वंध्यत्वामागची कारणे
स्त्रियांमधली कारणे
- अंड्याची अयोग्य पद्धतीने वाढ
- एनोव्युलेशन (अंडाशयातून अंडी उत्पन्न न होणे)
- पोलिस्टिक ओव्हरीयन सिंड्रोम
- नलिकेत ब्लॉक्स
- गर्भाशयामध्ये दोष
- शुक्राणूंच्या प्रवेशास अडथळा
- एंडोमेट्रिओसिस ( गर्भाशयाच्या बाहेर पेशींची वाढ )
- स्त्रीचे वय वाढते तशी तिची प्रजनन क्षमता कमी होते
पुरुषांमधली कारणे
- शुक्राणूंचा अभाव
- शुक्राणूंच्या गतिशीलतेची समस्या
- शुक्राणूंमध्ये दोष
- स्खलनाची समस्या
दोघांमधल्या समान समस्या
- मधुमेह, थायरॉईड समस्या, उच्च रक्तदाब, काही स्वयंप्रतिकार रोग, लैंगिक संक्रमित रोग इ. सारख्या वैद्यकीय समस्यांचा परिणाम प्रजननावर होतो.
- धूम्रपान, मद्यपान, लठ्ठपणा, काही औषधांचा दीर्घकाळ वापर केल्याने पुरुषांमधील वीर्यावर परिणाम होतो आणि स्त्रियांमध्ये हार्मोनल असंतुलन उद्भवू शकते.
- योग्य लैंगिक शिक्षणाचा अभाव, मासिक चक्र दरम्यान लैंगिक संबंधाची अयोग्य वेळ इत्यादींचा गर्भधारणेवर परिणाम होतो.
वंध्यत्वाचा काय परिणाम होतो ?
वंध्यत्वाचा परिणाम जोडप्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर होतो. अनेक मानसिक परिणाम होतात. जोडपे निराशा आणि औदासिन्य इत्यादींमध्ये होऊ शकते. वंध्यत्वामुळे सामाजिक परिणामही जोडप्यावर होतो. अनेकदा ही जोडपी एकटी पडतात. बराच काळ घेतलेल्या उपचारामुळे जोडप्यावर आर्थिक ओझे येते.
अधिक माहितीसाठी डॉ. पूर्णा सहकारी purvapals@yahoo.co.in यांच्याशी संपर्क साधावा.
हेही वाचा - वंध्यत्वाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलण्याची गरज
हेही वाचा - गरोदरपणातील व्हिटॅमिन-डीचा मुलांच्या बुध्यांकांवर होतो परिणाम