हैदराबाद : वातावरणातील बदल झाल्याने त्याचा आपल्या शरीरावर विपरित परिणाम होतो. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजणांना वातावरणातील बदलांचा त्रास होऊ शकतो. तापमानातील बदल, अवकाळी पाऊस, तापमान आदींमुळे विविध समस्या निर्माण होतात. त्यामुळे विविध आजारांनाही आमंत्रण मिळते. तंदुरुस्त राहणे, दिनचर्या पाळणे आणि पौष्टिक आहार घेणे ही निरोगी राहण्याची गुरुकिल्ली आहे. परंतु कोणतेही आजार झाल्यास अगोदर डॉक्टरांचा सल्ला घेण्यात यावा. बदलत्या ऋतूमध्ये कसा बचाव करावा, याबाबतच्या काही टीप्स आम्ही तुमच्यासाठी देत आहोत, त्या तुम्ही वापरून पाहू शकता.
भरपूर पाणी प्या : चहा किंवा थंड पेय पिण्यामुळे आरोग्यावर विपरित परिणाम करु शकते. त्यामुळे पाण्याला पर्याय नाही. शरीराचे तापमान योग्य राखण्यासाठी जास्तीत जास्त पाणी प्यावे, त्यामुळे कोणत्याही आजाराचा सामना करण्याची वेळ येत नाही. पाणी केवळ आपल्या संपूर्ण शरीराला हायड्रेट करत नाही, तर ते सर्व साचलेल्या विषारी पदार्थांना बाहेर काढते.
![Change Of Weather Tips](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/18157220_1.jpg)
नियमित व्यायाम करा : तुम्ही कितीही व्यस्त असले तरी व्यायामासाठी थोडा वेळ नक्की काढा. तुम्हाला जिममध्ये जाता येत नसले तरी काही कामांमध्ये स्वतःला गुंतवून ठेवा. शरीर तंदुरुस्त राहण्यासाठी व्यायाम करणे गरजेचे आहे. त्यामुळे नियमित व्यायाम करा.
![Change Of Weather Tips](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/18157220_2.jpg)
हंगामी फळे खा : ऋतुमानानुसार घेतलेला आहार शरीराला तंदुरुस्त ठेवण्यासाठी उपयोगी ठरतो. त्यामुळे हवामान बदलातही ऋतुमानानुसार फळे आणि आहाराचे सेवन करा.
![Change Of Weather Tips](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/18157220_3.jpg)
लसीकरण करा : हवामान बदलल्याने सगळ्यांना त्रास होतो. त्यामुळे तुम्हाला ऋतूच्या सुरुवातीला अॅलर्जी, सर्दी किंवा इतर आजार होत असतील तर लसीकरण करा. वातावरणातील बदलांमुळे जर तुम्ही आजारी पडलात, तर अगोदर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. डॉक्टरांच्या सल्ल्यांशिवाय कोणतेही औषध घेऊ नये.
![Change Of Weather Tips](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/18157220_4.jpg)
योग्य विश्रांती घ्या : काम आणि व्यस्तता यामध्ये आपण अनेकदा विश्रांती घेणे विसरतो. शिस्तबद्ध जगणे ही निरोगी जीवनाची गुरुकिल्ली आहे. त्यामुळे योग्य दिनचर्या करा आणि विश्रांतीसाठी थोडा वेळ द्या. निरोगी राहण्यासाठी प्रत्येकाने सक्रिय असणे आवश्यक आहे. तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी फिरायला जाऊ शकता. अशा प्रकारे तुम्हाला जास्त कष्ट करावे लागत नाहीत. तुम्ही स्वतःला निरोगी ठेवू शकता. नियमित चालल्याने मनाला ताजेतवाने वाटते. त्यामुळे नियमित चालण्याचा सराव करा.
![Change Of Weather Tips](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/18157220_5.jpg)
हेही वाचा - Covid Accelerates Dementia : कोरोनामुळे स्मृतिभ्रंशाच्या रुग्णांना बसला फटका; आजारात दिसून आली वाढ