ETV Bharat / sukhibhava

Chaitra Purnima 2023 : काय आहे चैत्र पौर्णिमेचे महत्व, कशी करतात पूजा; जाणून घ्या सविस्तर माहिती - चैत्र पौर्णिमेचा मुहुर्त

देशात आज चैत्र पौर्णिमेचा उत्साह दिसून येते आहे. चैत्र पौर्णिमेच्या दिवशी चंद्राची पूजा करण्यात येते. त्यासह हनुमान जयंतीही चैत्र पौर्णिमेला साजरी करण्यात येत असल्याने नागरिकांमध्ये चांगलाच उत्साह असतो. मात्र यावर्षी हनुमान जयंती 6 एप्रिलला येत आहे.

Chaitra Purnima 2023
संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : Apr 5, 2023, 10:36 AM IST

हैदराबाद : हिंदू धर्मात चैत्र पौर्णिमेला विशेष महत्व असल्याने ही पौर्णिमा महिलांमध्ये विशेष लोकप्रिय आहे. चैत्र महिन्यातील पौर्णिमेला देशभरात उत्साहाचे वातावरण असते. चैत्र पौर्णिमेच्या दिवशी मोठ्या भक्तीभावाने चंद्राची पूजा करण्यात येते. चैत्र पौर्णिमा ही हिंदू नववर्षातील पहिली पौर्णिमा असल्याचे मानण्यात येते. त्यामुळे या दिवशी भगवान विष्णूची पूजा करण्याची परंपरा आहे. मात्र हनुमान यांचा जन्म चैत्र पौर्णिमेला झाल्यामुळे हनुमानांचीही विधीवत पूजा करण्यात येते.

कधी आहे चैत्र पौर्णिमेचा मुहुर्त : यावर्षी चैत्र पौर्णिमा 5 एप्रिलच्या सकाळी 09.19 वाजता सुरू होऊन ती सहा एप्रिलच्या 10.04 सकाळपर्यंत असणार आहे. त्यामुळे चैत्र पौर्णिमेच्या निमित्ताने सगळ्यांचा उत्साह अगदी शिगेला पोहोचला आहे. 6 एप्रिलला हनुमान जयंती असल्याने नागरिक चैत्र पौर्णिमा आणि हनुमान जयंती असा सलग सण साजरा करण्याच्या तयारीत आहेत. चैत्र पौर्णिमेला चंद्राची पूजा करण्यात येते. यावर्षी चैत्र पौर्णिमेचा शूभ मुहुर्त सायंकाळी 06.01 मिनीटांनी आहे. चंद्रोदय 06.01 मिनीटाने होणार असून त्याचवेळी चंद्राची पूजा करण्यात येते. यावेळी चंद्राला नैवेद्य दाखवून त्याची आरती करण्यात येते. त्यासह

नागरिकांचा उडाला गोंधळ : यावर्षी हनुमान जयंती ही 6 एप्रिलला आहे. तर चैत्र पौर्णिमा ही 5 एप्रिलला साजरी करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांचा चांगलाच गोंधळ उडाला आहे. देशातील काही भागात चैत्र पौर्णिमेच्या दिवशीच हनुमान जयंती साजरी करण्यात येते. यावर्षी मात्र हनुमान जयंती ही 6 एप्रिलला आल्याने नागरिकांचा गोंधळ उडाला आहे.

चैत्र पौर्णिमेला झाला हनुमान यांचा जन्म : देवाधिदेव महादेवांचा अंश आणि प्रभू श्रीरामांचे परमभक्त हनुमान यांचा जन्म त्रेता युगातील चैत्र पौर्णिमेला झाल्याची अख्यायिका रामायणात नमूद करण्यात आली आहे. त्यामुळे हनुमान यांची जयंती चैत्र शुक्ल पक्षातील पौर्णिमेला साजरी करण्यात येते. विशेष म्हणजे चैत्र पौर्मिमा हिंदू आणि बौद्ध अशा दोन्ही धर्मात खूप महत्वाची असल्याचे मानले जाते.

हेही वाचा - Hanuman Jayanti 2023 : वर्षातून दोन वेळा का साजरी करण्यात येते हनुमान जयंती, वाचा काय आहे कारण

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.