ठराविक वयानंतर स्त्री आणि पुरुषांमध्ये शारीरिक संबंध ठेवण्याची इच्छा आपोआप विकसित होत असते. ही शरीराची नैसर्गिक गरजही मानली जाते. कारण यामुळे फक्त शारीरिक नाही तर मानसिकही फायदा होत असतो. पण नेहमी असेच नाही घडत. काही स्त्रिया, तसेच पुरुष लैंगिक संबंध ठेवण्यासाठी फार उत्साही नसतात. शारीरिक संबंधांबद्दल या इच्छा आणि अनिच्छा अनेकविध कारणांमुळे उद्भवतात. म्हणूनच 'ईटीव्ही सुखीभव' लैंगिक इच्छांवर परिणाम करणारे घटक आणि लैंगिक जीवनाशी संबंधित काही विशेष गोष्टींबद्दल माहिती वाचकांसमोर ठेवत आहे.
सेक्स करताना आनंद का मिळतो?
चांगल्या शारीरिक संबंधांदरम्यान शरीरात निर्माण होणारी उत्तेजना आणि या वेळी वाहणारे हार्मोन्स केवळ शरीरच नव्हे तर मेंदूलाही आनंद आणि समाधानी बनवतात. वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिले असता, शारीरिक संबंधांदरम्यान, आपल्या शरीरात अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया येतात. त्या शारीरिक, मानसिक आणि भावनिक असतात. सन १९६० मध्ये शारीरिक संबंधांवर केलेल्या संशोधनात विल्यम मास्टर्स आणि व्हर्जिनिया जॉन्सन या संशोधकांनी लैंगिक उत्तेजन म्हणजेच सेक्सुअल अराउजल देण्याच्या चार प्रकारांचा उल्लेख केला आहे. ते खालीलप्रमाणे आहेत.
- उत्तेजना म्हणजेच एक्साइटमेंट : शारीरिक संबंधांमध्ये उत्तेजना महत्वाची असते. या अवस्थेत लिंग, योनी यामध्ये म्हणजेच क्लिटोरिसमध्ये असलेल्या तंतूंमध्ये पुरेशा प्रमाणात रक्त भरले जाते. अशा परिस्थितीत या विशिष्ट ठिकाणी नसांची संवेदनशीलताही वाढते. यामुळे अर्धपारदर्शक अशा पदार्थाची निर्मिती होते. त्याने योनीमध्ये ओलसरपणा वाढतो.
- उत्तेजना वाढत जाणे : सेक्स करते वेळी एका क्षणी उत्तेजना वाढत जाते. योनी, लिंग तसेच क्लिटोरिस जास्त संवेदनशील होतात. या वेळी संवेदनांमध्येही बदल होत जातो. कधी उत्तेजना वाढते, तर कधी कमी होते.
- भावनोत्कटता म्हणजे ऑर्गेझम : सेक्स करताना स्नायूंचे आकुंचन झाल्याने स्त्री आणि पुरुष ऑर्गेझमचा अनुभव घेतात. पण स्त्री आणि पुरुषात हे वेगवेगळ्या पातळीवर असते. स्त्रियांमध्ये जास्त करून क्लिटोरलमध्ये उत्तेजना आल्याने परमसुखाचा आनंद घेता येतो. स्त्रियांमध्ये ऑर्गेझमची अनुभूती लवकर येऊ शकते. तर पुरुषांमध्ये लिंगाचे वरचे टोक उत्तेजित झाल्याने ऑर्गेझमचा अनुभव येतो.
जास्त करून पुरुषांमध्ये ऑर्गेझम आल्यानंतर वीर्य पतन होते. पण वीर्य पतन न होता ते ऑर्गेझमचा अनुभव घेऊ शकतात. असेही होऊ शकते. पुरुषांमध्ये लिंग, गुदाशय आकुंचन पावते, तर स्त्रियांना योनी, गर्भाशय, गुदाशय इथे संवेदना जाणवतात.
- संकल्प म्हणजे रिझोल्युशन : संशोधनानुसार कामोत्तेजनेसाठी संकल्पाचीही गरज असते. हा संकल्प चांगल्या सेक्सच्या प्रयत्नासाठी नाही तर ऑर्गेझमच्या अगोदर आणि नंतर शरीराची प्रक्रिया, प्रतिक्रिया आणि स्थिती कशी आहे, हे पाहण्यासाठी असतो. ही स्थिती स्त्री आणि पुरुषांमध्ये वेगवेगळी असते. पुरुषांना वीर्य पतन झाले की ऑर्गेझमचा अनुभव येतो. पण स्त्रियांना तसाच अनुभव येईल, हे गरजेचे नाही.
संशोधनानुसार स्त्री आणि पुरुष फक्त लैंगिक संबंधातच नाही, तर हस्तमैथुन करतानाही आनंद घेऊ शकतात.
लैंगिक संबंधांचा मेंदूवर परिणाम
सेक्स करताना जननेंद्रियामध्ये असलेल्या नसा आपल्या मेंदूला सिग्नल पाठवतात. यावेळी मेंदूमधला रासायनिक संदेशवाहक असलेला न्यूरोट्रांसमीटर शरीराच्या इतर भागांमध्ये शारीरिक संबंधांशी जोडल्या गेलेल्या संवेदनांना जागृत करण्यासाठी मदत करतो. तसेच यावेळी अनेक प्रकारचे हार्मोन्स तयार होण्यास आणि ते प्रवाहित करण्यात मदत केली जाते. यावेळी शरीरात निर्माण होणारे हार्मोन्स आणि त्यांची कार्ये पुढीलप्रमाणे आहेत –
- डोपामाइन : डोपामाइन हार्मोन परम उत्तेजनेच्या वेळी वाढते.
- ऑक्सिटोसिन : ऑक्सिटोसिन हार्मोन्समुळे जोडीदारामधले प्रेम वाढते. ऑर्गेझमनंतर शरीरात हे हार्मोन क्रियाशील होते.
- नॉर-एपिनेफ्रिन : लैंगिक उत्तेजनेच्या वेळी या हार्मोन्सची शरीरात निर्मिती होते. हे हार्मोन्स रक्तवाहिन्यांना बारीक आणि संकुचित करतात. यामुळे जननेंद्रिय जास्त संवेदनशील होते.
- सेरोटोनिन : सेक्स करताना उत्तेजना वाढते तेव्हा शरीरात सेरोटोनिन हार्मोन स्रवायला लागते. यामुळे मन आनंदी, प्रसन्न होते.
- प्रोलॅक्टिन : ऑर्गेझमच्या वेळी शरीरात प्रोलॅक्टिन हार्मोनची वाढ होते.
लैंगिक संबंध नेहमीच आनंददायक नसतात
या संशोधनात शारीरिक संबंध समाधानी किंवा आनंददायक नसण्याची कारणे देखील दिली आहेत. विल्यम मास्टर्स आणि व्हर्जिनिया जॉन्सन या संशोधकांनी असे म्हटले आहे की, लैंगिकता प्रत्येकासाठी नेहमीच आनंददायक नसते. समागम करताना बर्याच वेळा लोकांना वेदना जाणवते. बहुतेक वेळा स्त्रियांनाच हा अनुभव येतो. संशोधनात असे दिसून आले आहे की जवळजवळ ७५ टक्के स्त्रिया त्यांच्या जीवनात कधी ना कधी शारीरिक संबंधांदरम्यान वेदना अनुभवतात. त्याच वेळी, साधारणतः १० ते २० टक्के स्त्रियांना लैंगिक संबंधात नियमितपणे वेदना जाणवतात. स्त्रियांमध्ये लैंगिक संबंधात वेदना होण्याची सर्वसामान्य कारणे खालीलप्रमाणे आहेत –
- हार्मोन्समध्ये बदल. योनीत ओलसरपणा कमी होणे
- बाळाच्या जन्मानंतर होणारी दुखापत
- योनीत होणारा संसर्ग
- पुरुषांना सेक्स करताना होणाऱ्या वेदनेचे कारण
- लिंगाच्या आकारामुळे निर्माण होणारी समस्या
- प्रोस्टेटचे दुखणे
- स्त्री आणि पुरुषांमध्ये सेक्स करायची इच्छा नसल्याची कारणे
- योनीत ओलसरपणा कमी झाल्याने होणारी वेदना
- लैंगिक आजार आणि संसर्ग
- एकापेक्षा जास्त जोडीदाराबरोबर सेक्स केल्याने
- उत्तेजना कमी असणे
- भूतकाळात कोणत्याही प्रकारचे लैंगिक शोषण किंवा अपघात
- लघवी करताना वेदना किंवा योनीतून जास्त रक्तस्राव