हैदराबाद : व्यस्त जीवनशैलीमुळे कामाच्या ताणतणावामुळे अनेक लोकांना रात्री उशिरा जेवण करावे लागते. एखाद्या दिवशी रात्री जेवण करण्याची पद्धत असेल तर ठिक आहे परंतु नेहमी जर रात्री उशिरा तुम्हाला जेवण करावे लागत असेल तर ते आरोग्यासाठी धोकादायक ठरण्याची शक्यता असते. त्यामुळे अनेक आजारांना निमंत्रण मिळू शकते. जर तुम्ही उशिरा जेवले, तर आरोग्याशी संबंधित अनेक समस्या उद्भवू शकतात. खरे तर उशिरा खाल्ल्याने अन्न लवकर पचत नाही. त्यामुळे शरीरात अनेक आजार निर्माण होतात. चला जाणून घेऊया रात्री उशिरा खाणे आरोग्यासाठी कसे हानिकारक असू शकते. (habit of eating late at night, risk of diseases)
1. बीपी, कोलेस्ट्रॉल आणि मधुमेहाची समस्या : रिपोर्टनुसार, रात्री उशिरा जेवण केल्याने बीपी, कोलेस्ट्रॉल आणि मधुमेहाची समस्या उद्भवू शकते. उशिरा खाल्ल्याने वजन वाढते, त्यामुळे रक्तातील साखर अनियंत्रित राहते.
2. वजन वाढू शकते : रात्री उशिरा खाल्ल्याने वजन वाढू शकते. खरे तर, वेळेवर न खाल्ल्यामुळे चयापचय मंदावतो. त्यामुळे कॅलरीज व्यवस्थित बर्न होत नाहीत. त्यामुळे वजन वाढू लागते.
3. हृदय आणि रक्तदाबाशी संबंधित समस्या : रात्री उशिरा जेवण केल्याने हृदय आणि रक्तदाबाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात.अशा परिस्थितीत चुकूनही रात्री उशिरा जेवण करू नका.
4. झोपेशी संबंधित अनेक समस्या : खाण्यापिण्याशी संबंधित इतर अनियमितता रात्री उशिरा जेवणाऱ्यांमध्ये आढळतात. अशा लोकांना झोपेशी संबंधित अनेक समस्या देखील असतात.
5. हायपरटेन्शनची शक्यता : एका रिसर्चमध्ये असेही आढळून आले आहे की, जे लोक रात्रीचे जेवण उशिरा करतात त्यांना हायपरटेन्शनची शक्यता वाढते.
6. पचनशक्तीवर परिणाम : जर तुम्ही रात्री उशिरा अन्न खाल्ले तर त्याचा पचनशक्तीवर परिणाम होतो. खरेतर जेवल्यावर काही अॅक्टिव्हिटी नसते आणि थेट झोपायला जाता. अशा स्थितीत अॅसिडिटी, फुगणे इत्यादी समस्या उद्भवू शकतात. या बदलत्या जीवनशैलीमुळे योग्य आहार आणि डाएटकडे विशेष लक्ष दिले तर आरोग्य आणि लाईफ बॅलन्स करणे सोपे होईल.