ETV Bharat / sukhibhava

Benefits of Roasted chana : फुटाणे आहेत अनेक समस्येवर रामबाण उपाय; जाणून घ्या फायदे

Benefits of Roasted chana : हरभऱ्यामध्ये अनेक पौष्टीक घटक आहेत. बरेच लोक सकाळचा किंवा संध्याकाळचा नाश्ता म्हणून खातात. यामध्ये फायबर, आयरन आणि अँटी-ऑक्सिडेंट गुणधर्म आढळतात जे शरीराला अनेक समस्यांपासून वाचवतात. फुटाणे खाण्याचे अनेक फायदे आहेत. यामुळे वजन कमी करण्यासोबतच पचनक्रियाही चांगली राहते.

Benefits of Roasted chana
फुटाणे
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 15, 2023, 1:18 PM IST

हैदराबाद : फुटाणे हि अशी गोष्ट आहे जे आरोग्यासाठी रामबाण औषध मानलं जातं, जे शरीराला अनेक फायदे देतं. फुटाण्यांमध्ये प्रथिने, आर्द्रता, कॅल्शियम, लोह, कार्बोहायड्रेट्स आणि जीवनसत्त्व मुबलक प्रमाणात आढळतात, त्यामुळ ते दररोज खाल्ल्यानं शरीराला फायदा होतो. खास गोष्ट अशी आहे की जर तुम्ही तुमच्या सकाळच्या नाश्त्यामध्ये फुटाण्यांसोबत गूळ किंवा मधाचं सेवन केलं तर ते तुमचं आरोग्य तर मजबूत करेलच शिवाय तुम्हाला अनेक आजारांपासून दूर ठेवेल. त्यामुळं निरोगी व्यक्तीनं 50 ते 60 ग्रॅम भाजलेल्या हरभऱ्याचं सेवन करावं.

रोगप्रतिकार शक्ती मजबूत होते : फुटाणे खाल्ल्यानं शरीराची रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते. फुटाण्यांमध्ये पुरेशा प्रमाणात अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म असल्यानं, ते शरीराची प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात. त्यामुळे फुटाणे खाण्याचा सल्ला दिला जातो.

वजन कमी करण्यास उपयुक्त : फुटाणे खाल्ल्यानं वजनही कमी होतं, कारण हरभर्यात फायबरचं प्रमाण जास्त असतं, ज्यामुळं शरीराची पचनक्रिया सुरळीत राहते, याशिवाय हरभरे खाल्ल्यानं शरीरात ऊर्जा राहते, त्यामुळं वारंवार भूक लागत नाही. अशा परिस्थितीत भाजलेले हरभरे खाण्याचा सल्ला दिला जातो.

रक्तातील साखरेच्या रुग्णांसाठी फायदेशीर : ज्यांना रक्तातील साखरेची समस्या आहे त्यांच्यासाठीही फुटाणे फायदेशीर आहे. जर तुम्ही सकाळी फुटाणे खाल्ले तर रक्तातील साखरेच्या समस्या असलेल्या रुग्णांसाठी ते फायदेशीर ठरतं. त्यामुळे अशा रुग्णांना फुटाणे खाण्याचा सल्ला दिला जातो.

मधुमेहाच्या रुग्णांसाठीही फायदेशीर : मधुमेहाच्या रुग्णांसाठीही फुटाणे खाणे फायदेशीर आहे. फुटाणे कमी ग्लायसेमिक इंडेक्स (GI) खाद्यपदार्थ असल्यामुळे, ते सर्व मधुमेही रुग्णांसाठी चांगले आहे. कारण इतर अन्नपदार्थ खाल्ल्यानं रक्तातील साखरेची पातळी वर-खाली होत असते, परंतु हरभऱ्याची जीआय पातळी केवळ 28 असते, त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांसाठी ते फायदेशीर आहे.

हेही वाचा :

  1. Right time to eat salad : जेवताना जर तुम्ही सॅलड खात असाल तर काळजी घ्या; जाणून घ्या सॅलड खाण्याची योग्य वेळ
  2. World Lymphoma Awareness Day 2023 : जागतिक लिम्फोमा जागरूकता दिवस 2023; वेळेवर उपचारानं बरा होऊ शकतो लिम्फोमा
  3. Treatment of lymphoma : लिम्फोमाच्या उपचाराबरोबरच योग्य काळजी घेणे देखील महत्त्वाचे....

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.