ETV Bharat / sukhibhava

Benefits of bael leaves : बेलपत्र तुमच्या आरोग्यासाठी गुणकारी! जाणून घ्या त्याचे अनोखे फायदे - bael leaves are good for skin

आपल्यापैकी बरेच जण बेलपत्राला (bael leaves) केवळ पूजेत वापरण्यात येणारे पान म्हणून पाहतात. बेलपत्रक केवळ महादेवाला संतुष्ट करण्यासाठीच वापरले जात नाही, तर आरोग्याच्या बाबतीतही त्याचे बरेच फायदे आहेत. बेलपत्राचे फायदे केवळ आरोग्यासाठीच (bael leaves are good for health) नाही तर त्याच्या वापराने चेहऱ्याचेदेखील सौंदर्य वाढते. चला तर जाणून घेवूया बेलपत्राचे अनोखे (benefits of bael leaves) फायदे.

Benefits of bael leaves
बेलपत्र तुमच्या आरोग्यासाठी गुणकारी
author img

By

Published : Nov 10, 2022, 1:46 PM IST

हैदराबाद: आपल्यापैकी बरेच जण बेलपत्राला (bael leaves) केवळ पूजेत वापरण्यात येणारे पान म्हणून पाहतात. महादेवाच्या स्वभावाप्रमाणे थंड प्रकृतीचे बेलाचे पान भगवान शंकराला खूप प्रिय आहे. बेलपत्र हे नेहमी तीन पानांच्या गटामध्ये असते. या तीन पानांना ब्रह्मा, विष्णू आणि महेशाचे स्वरूप मानले जाते. परंतु, बेलपत्राचे फायदे केवळ आरोग्यासाठीच (bael leaves are good for health) नाही तर त्याच्या वापराने चेहऱ्याचेदेखील सौंदर्य वाढते. याला पोषक तत्वांचा खजिना देखील म्हणतात. त्यात व्हिटॅमिन-ए, व्हिटॅमिन-बी, प्रोटीन, लोह, कॅल्शियम, लोह आणि बीटा यांसारखे पोषक घटक आढळतात. याशिवाय बेलपत्रामध्ये अँटिऑक्सिडेंट, अँटीबॅक्टेरियल गुणधर्म देखील असतात. ते त्वचा आणि केस दोघांसाठी खूप फायदेशीर (benefits of bael leaves) असतात. चला तर मग जाणून घेऊया तुम्ही त्याचा वापर कसा करू शकता-

समस्येपासून आराम मिळेल: आजकाल धकाधकीच्या जीवनात चेहऱ्यावरचे तेज राहत नाही. प्रत्येकाला चेहऱ्यावर ताजेपणा हवा असतो. बेलपत्र आरोग्यासाठी, केसांसाठी तसेच त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. आजकाल धूळ, माती आणि प्रदूषणामुळे केस गळण्याची समस्याही वाढत आहे. या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी तुम्ही बेलपत्राचा वापर करू शकता.

तुम्ही याप्रकारे बेलपत्राचा वापर करा: अनेकांना घामाच्या वासाने त्रास होतो, त्यामुळे ते लोकांशी भेटणेही टाळतात. या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी तुम्ही बेलपत्राचा वापर करू शकता. बेलपत्र पाण्यात टाकून आंघोळ करावी. यामुळे तुमच्या शरीरातील दुर्गंधी दूर होईल.

बेलपत्राची पेस्ट: बेलपत्राची पेस्ट बनवून केसांना लावा. 15-20 मिनिटांनी केस शॅम्पूने धुवा. यामुळे तुमचे केस गळणे नियंत्रित होईल. तुमच्या केसांमध्ये नेहमी कोंडा आणि उवा होत असतील तर तुम्हाला या समस्येपासूनही आराम मिळेल. (bael leaves are good for hair)

त्वचेला ताजे ठेवण्यास मदत होते: त्वचेवर चमक येण्यासाठी तुम्ही बेलपत्राचा रस चेहऱ्यावर लावू शकता. यातून तुम्हाला खूप फायदा होऊ शकतो. यामध्ये अँटिऑक्सिडेंट आणि अँटीबॅक्टेरियल घटक असतात, जे तुम्हाला त्वचेला ताजे ठेवण्यास मदत करतात. याव्यतिरिक्त, त्यात वृद्धत्वविरोधी गुणधर्म देखील आहेत, ज्यामुळे त्वचेवरील सुरकुत्या कमी होतात. चेहऱ्यावर चमक येण्यासाठी कोमट पाण्यात बेलपत्राचा रस मिसळा. (bael leaves are good for skin)

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.