ETV Bharat / sukhibhava

दीर्घ आणि निरोगी जीवनासाठी 'या' गोष्टींचे अतिसेवन टाळा - पौष्टिक तत्व अतिसेवन आरोग्य नुकसान

पोषणयुक्त आहार आपल्या चांगल्या आरोग्यासाठी आवश्यक असते. मात्र, अनेकदा नकळत आपण काही विशिष्ट प्रकारच्या आहाराचे सेवन अधिक प्रमाणात करतो, ज्यामुळे त्यांच्यातील तत्व आपल्या शरीरात आवश्यक्तेपेक्षा अधिक प्रमाणात शिरतात. सामान्यत: शरीराला एक अशी मशीन मानली जाते जी आहारातील कोणतेही पौष्टिक तत्व जर शरीरात आवश्यक्तेपेक्षा अधिक प्रमाणात आले तर त्यास अतिसार, उलट्या किंवा इतर मार्गांनी शरीराबाहेर काढते. पण, अनेकदा असे न झाल्यास हे तत्व आपल्या आरोग्याला गंभीररीत्या प्रभावित करू शकतात.

avoid addictions to live longer life
food
author img

By

Published : Dec 19, 2021, 5:00 PM IST

Updated : Dec 19, 2021, 10:07 PM IST

इंदोरच्या पोषण तज्ज्ञ डॉ. संगीता मालू सांगतात की, अनेकदा डॉक्टर विशिष्ट परिस्थितींमध्ये काही विशिष्ट प्रकारच्या आहारांपासून दूर राहायचा सल्ला देतात. या आहारांच्या प्रमाणावर नियंत्रण किंवा त्यांचे सेवन कमी करण्याचा सल्ला देतात. कारण ते शरीराला नुकसान पोहचवू शकतात. मात्र, सामान्य परिस्थितींमध्ये देखील लोकांनी आपल्या दैनंदिन सामान्य आहारामधील पोषणाच्या प्रमाणाची विशेष काळजी घेतली पाहिजे. आणि काही विशिष्ट प्रकारचे आहार किंवा पौष्टिक तत्वांचे आवश्यक्तेपेक्षा अधिक सेवन करणे टाळले पाहिजे. कारण अनेकदा आवश्यक्तेपेक्षा अधिक पोषण किवा पौष्टिक तत्वांचे सेवन आरोग्याला नुकसान पोहोचवू शकते.

अतिसेवन केल्यास शरीराला नुकसान पोहचवणारे तत्व आणि त्यांचे नुकसान पुढील प्रमाणे आहेत.

1) शुगर

avoid addictions to live longer life
शुगर

गोड खाणे अनेकांना आवडते. पण, जेवणात गोडाचे प्रमाण आवश्यक्तेपेक्षा अधिक वाढले तर, ते नुकसानदायक ठरू शकते. अधिक गोड मधुमेहाचे कारण ठरते, त्याचबरोबर ते तुमच्या रोगप्रतिकारक शमतेला देखील कमजोर करते. याव्यतिरिक्त त्यामुळे फॅटी लिवर, स्मरणशक्तीमध्ये कमी होणे, त्वचेवर दाणे किंवा एग्जिमा, पुरळ किंवा अकाली सुरकुत्या पडण्याची समस्या, हृदय रोग, उच्च रक्तदाब आणि कोलेस्टेरॉल वाढ यांसारख्या समस्यांचा सामना देखील करावा लागू शकतो.

2) ट्रांस आणि सॅच्युरेटेड फॅट

avoid addictions to live longer life
ट्रांस आणि सॅच्युरेटेड फॅट

ट्रांस आणि सॅच्युरेटेड फॅटला आरोग्यासाठी सर्वात धोकादायक मानले जाते, कारण याच्या अधिक प्रमाणात सेवनाने केवळ बॅड कोलेस्टेरॉलच वाढत नाही, तर गुड कोलेस्टेरॉल देखील कमी होते, ज्यामुळे ऑबेसिटी म्हणजेच लठ्ठपणा, टाईप - 2 मधुमेह (Type-2 Diabetes) आणि हृदय रोगासह अनेक समस्या होण्याचा धोका वाढतो. ट्रांस फॅट आणि सॅच्युरेटेड फॅटने होणाऱ्या धोक्यांची अमेरिकन हार्ट असोसिएशन ( American Heart Association ) देखील पुष्टी करतो.

3) लोह ( Iron )

avoid addictions to live longer life
लोह

शरीरात आयरनचे अधिक प्रमाण देखील नुकसानदायक ठरू शकते. शरीरातील हिमोग्लोबिन बनवण्यासाठी लोहची गरज असते. हिमोग्लोबिन हा रक्ताचा भाग सर्व पेशींमध्ये ऑक्सिजन वाहून नेतो. मात्र, जेव्हा शरीरात लोह अधिक असते तेव्हा हिमोक्रोमाटोसिस होण्याची शक्यता वाढते. ते यकृत ( liver) आणि हृदयाला नुकसान पोहचवू शकते. या व्यतिरिक्त लोहच्या अतिरेकामुळे व्यक्तीमध्ये मधुमेह, सांधेदुखी ( Arthritis ) सारखे आजार देखील होऊ शकतात.

4) प्रोटीन

avoid addictions to live longer life
प्रोटीन

जेवणात प्रोटीनचे प्रामाण वाढवल्याने कार्बोहायड्रेटचे सेवन कमी होते, ज्यामुळे शरीराला फाईबर कमी मिळते आणि बद्धकोष्ठतेची समस्या होते. तेच किडनीच्या समस्येने ग्रस्त लोकांमध्ये ही समस्या अधिक गंभीर होते. प्रोटीनच्या चयापचय क्रियेतून ( metabolism ) निघणाऱ्या निरूपयोगी पदार्थांना शरीरातून बाहेर काढण्यास शरीराला समस्या होते. 2013 मध्ये लॉनिस डेलिमॅरिसच्या नेतृत्वात झालेला एक आभ्यास सांगतो की, हाई प्रोटीन डाईटचे अत्याधिक सेवन आपल्या हाडांना धोकादायक ठरू शकते.

5) सोडियम

avoid addictions to live longer life
सोडियम

अधिक सोडियम तुम्हाला सर्वात अधिक नुकसान पोहोचवू शकते. शरीरात सोडियमची मात्रा अधिक झाल्याने उच्च रक्तदाब, हृदय रोग आणि स्ट्रोकचा धोका राहतो. त्याचबरोबर, ते तुमच्या हाडांना देखील कमजोर करते, कारण त्याने कॅल्शियम लॉस होते. इंटरनॅशनल जर्नल ऑफ एपिडेमिओलॉजी ( International Journal of Epidemiology ) मध्ये प्रकाशित एका आभ्यासात जेवणात मिठाचे अधिक प्रमाण आणि मृत्यूचा धोका यांच्यात थेट संबंध असल्याची पुष्टी झाली आहे.

6) नाइट्रेट ( Nitrate )

नाइट्रेट हे रासायनिक संयुगे ( Chemical compound ) आहे, ज्यांना पोषकाच्या ( Nutrient ) श्रेणीतही ठेवले जाते. मात्र, नाईट्रेट अधिक प्रमाणात असलेल्या आहाराचे सेवन अधिक प्रमाणात केल्यास डोकेदुखी, पोटदुखी, हृदय गती वाढणे आणि मळमळ येणे या समस्येसारखे लक्षण दिसू शकतात.

हेही वाचा - महिलांनो आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका, 'या' समस्यांकडे वेळीच लक्ष द्या, अन्यथा..

Last Updated : Dec 19, 2021, 10:07 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.