ETV Bharat / sukhibhava

रात्री उशिरा खाणे टाळा, होऊ शकतात 'या' समस्या - उशिरा जेवण आणि आरोग्य

आपल्या खाण्याच्या सवयी आपल्या आरोग्यावर परिणाम टाकतात. आपण काय खातो आणि केव्हा खातो, या सर्व गोष्टी जेवण्याच्या शिस्तीखाली मोडतात. वेळेत जेवण, हा जेवणाच्या शिस्तीचा महत्वाचा नियम आहे. जर नियमाचे पालन केले गेले नाही तर आरोग्य बिघडू शकते.

प्रतिकात्मक
प्रतिकात्मक
author img

By

Published : Aug 1, 2021, 7:13 PM IST

Updated : Aug 1, 2021, 7:44 PM IST

योग्य प्रकृतीचे, योग्य प्रमाणात आणि योग्य वेळी केलेले जेवण हे शरीरात उर्जा प्रसारित करते. या तिन्ही नियमांमधील कोण्या एकाचेही उल्लंघन आपल्या शरीराच्या क्रियाशिलतेला प्रभावित करते. जेवण शिस्तीचे सर्वात महत्वाचे नियम आहे ते म्हणजे, वेळेवर जेवण करणे. रात्री उशिरा जेवण करण्याची सवय ही आरोग्यासाठी हानीकारक समजली जाते. रात्री उशिरा जेवण केल्याने शरीरात कोणत्या प्रकारच्या समस्या उद्भवू शकतात याबाबत जाणून घेण्यासाठी 'ईटीव्ही भारत सुखीभवने' दिल्ली येथील पोषणतज्ज्ञ दिव्या कालेसकर यांच्याशी बातचित केली.

दिव्या कालेसकर सांगतात की, रात्री उशिरा जेवण केल्याने ते बरोबर पचत नाही. मानवी पाचनतंत्र हे सकाळी सार्वात जास्त सक्रिय असते आणि रात्री सर्वात जास्त कमजोर असते. जर जेवण केल्यानंतर लगेच लोकं झोपले तर अन्न पचनात समस्या होऊ लागते आणि व्यक्तीला गॅस्ट्रिक समस्या होऊ लागते. त्याचबरोबर, रात्री उशिरा जेवण केल्याने शरीराला अन्नाचे सर्व पोषक तत्व म्हणजेच न्यूट्रिशन्स मिळत नाही. यामुळे शरीरातील चयापचयक्रिया (metabolism) कमी होते.

रात्री उशिरा जेवणामुळे होणाऱ्या सामान्य समस्या

1) खराब पचन

रात्री उशिरा जेवण केल्याने पचनसंस्थेवर प्रभाव पडतो. याचे कारण असे की, रात्री उशिरा जेवल्याने पचनसंस्थेला शरीराच्या जैविक घड्याळाच्या विरोधात काम करावे लागते. यामुळे आंबटपणा (acidity) आणि छातीत जळजळ होण्यासारख्या पचनसंबंधी समस्या आणि इतर समस्या होण्याची शक्यता वाढते.

2) वजन वाढणे

आपल्या शरीराच्या बहुतेक प्रणाली या सकाळच्या तुलनेत रात्रीच्या वेळी अधिक सुस्तपणे काम करतात. अशात रात्री उशिरा जेवण केल्याने आपल्या शरीरातील कॅलरीज नियंत्रित होत नाही आणि त्यामुळे शरीराच्या चयापचयक्रियेची (metabolism) गती कमी होते आणि वजन वाढण्याची शक्यता वाढते.

3) झोप न येणे

जे लोकं उशिरा जेवण करतात त्यांना झोप न येणे किंवा कमी झोप येणे, या समस्यांचा सामना करावा लागू शकतो.

4) मधुमेह आणि रक्तदाबाचा धोका

रात्री उशिरा जेवण केल्यानंतर पचनात होणाऱ्या समस्यांमुळे कोलेस्टेरॉल आणि इन्सुलिनची पातळी प्रभावित होऊ शकते, जे बरेचदा मधुमेह किंवा अनियंत्रित रक्तदाब होण्याचे कारण ठरू शकते.

रात्रीचे जेवण कसे असावे? आणि ते कधी करावे?

पोषणतज्ज्ञ दिव्या कालेसकर सांगतात की, रात्रीचे जवण हे नेहमी हलके आणि पचायला सोपे असावे. संध्याकाळ ही रात्रीच्या जेवणासाठी आदर्श वेळ मानली जाते. जर व्यक्तीने 6.30 ते 8.00 च्या दरम्यान आपले जेवण उरकले तर अन्न पचन सुलभ होते. त्याचबरोबर, जेवण करणे आणि झोपणे या दरम्यान कमीत कमी दोन ते तीन तासांचा वेळ असावा.

रात्री लो-कार्ब असलेले जेवण केले पाहिजे आणि जड जेवण टाळायला हवे. रात्रीच्या जेवणात दाळ, हिरव्या पालेभाज्या आणि कढीपत्त्याचा (curry leaves) समावेश असावा. याशिवाय खिचडी, लापशी (दलिया), कोशिंबीर (salad) आणि सूप आदीचे सेवन करणे देखील चांगले आहे. जेवणात जर पोळी आणि भात खात असाल तर ते कमी प्रमाणात खा.

दिव्या पुढे सांगतात की, जर कामानिमित्त किंवा कुठल्या अन्य कारणास्तव जर व्यक्तीला रात्री उशिरा जेवण करावे लागत असेल तर त्या व्यक्तीने असे जेवणे करावे ज्यात भरपूर प्रमाणात फायबर असेल. यामुळे पचनासंबंधी समस्या निर्माण होणार नाहीत.

मिठाचे सेवन कमी करा

मिठ आपल्या शरीरात वॉटर रिटेंशन वाढवण्याचे कार्य करते. अशात जर रात्री उशिरा जास्त मिठ असलेले जेवण केले तर त्यामुळे हृदय आणि रक्त वाहिन्यांना नुकसान पोहचू शकते. म्हणून रात्री कमी मीठ असलेले जेवण केले पाहिजे.

हेही वाचा - गंभीर आजारांवर अर्जुन वृक्षाची साल फायदेशीर, वाचा...

Last Updated : Aug 1, 2021, 7:44 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.