सेक्स नंतर झोप येणे हे खूप सामान्य आहे आणि महिलांच्या तुलनेत पुरुष हे लवकर झोपी जातात, असे मानले जाते. परंतु, न्यूयॉर्क येथील अलबानी स्टेस युनिव्हर्सिटीमध्ये करण्यात आलेल्या आभ्यासानुसार, पुरुषांच्या तुलनेत महिलांना सेक्सनंतर चांगल्या गुणवत्तेची झोप लागते, असे समोर आले आहे. या आभ्यासात सेक्सनंतर येणाऱ्या झोपेच्या गुणवत्तेबाबत संशोधन करण्यात आले. त्यात, सेक्स नंतर पुरुषांच्या तुलनेत महिला चांगल्या गुणवत्तेची झोप घेतात, अशी शक्यता अधिक असल्याचा निष्कर्ष पुढे आला आहे.
आभ्यास काय म्हणतो?
संशोधकांनी सांगितले की, महिला आणि पुरुषांमध्ये ऑर्गाझ्ममुळे (सेक्सदरम्यान शिगेला पोहोचलेली उत्कटता) पोस्ट कोप्युलेटरी सोमनोलेन्समध्ये वाढ झाली, मात्र ऑर्गाझ्मसह किंवा त्याशिवाय देखील पुरुषांच्या तुलनेत महिलांना सेक्सनंतर झोप येण्याची शक्यता अधिक असते.
हा आभ्यास इव्हॉल्यूशनरी बिहेवियरल सायन्सेसमध्ये प्रकाशित झाला होता आणि तो महाविद्यालयीन विद्यार्थ्यांवर घेण्यात आला होता. त्यात 128 महिला, तर 98 पुरुष होते.
सेमिनल फ्लुइडमध्ये उपशामक (sedative) सारखे गुणधर्म असू शकतात, या शक्यतेशी सुसंगत असतानाच, ज्या स्त्रियांचे इन्सेमिनेशन (inseminated) केले जात होते त्यांचीही सेक्स नंतर झोपी जाण्याची शक्यता अधिक होती, असेही समोर आले आहे.
सेक्स नंतर पुरुष लवकर झोपतात
यासंबंधी झालेल्या इतर अनेक प्रकारच्या संशोधनात देखील, सेक्स नंतर बहुतांश पुरुष आफ्टर प्ले म्हणजेच, प्रेम व्यक्त करणे किंवा आपल्या जोडीदाराशी बोलण्याऐवजी केवळ झोपण्याला प्राधन्य देतात. न्यूयॉर्कच्या सायन्स, हेल्थ आणि एनव्हायरमेंट युनिव्हर्सिटीने याच्या करणांविषयी एक अहवाल प्रकाशित केला आहे, त्यानुसार सेक्सनंतर पुरुषांचे लगेच झोपी जाण्याची कारणे पुढील प्रमाणे आहेत,
1) हार्मोन्सची सक्रियता
अहवालानुसार, सेक्स नंतर शरीरातून ऑक्सिटोसीन हार्मोन आणि प्रोलॅक्टिन हार्मोनचा स्त्राव होतो. सेक्सदरम्यान हे हार्मोन महिलांच्या तुलनेत पुरुषांमध्ये अधिक सक्रिय होतात, ज्यामुळे संभोगानंतर पुरुषांना झोप यायला लागते. त्याचवेळी, महिलांमध्ये हार्मोनल बदल जलद असतात, त्यामुळे त्यांना देखील सेक्सनंतर सुस्ती वाटते.
2) ऊर्जेचा अती वापर
अहवालात सांगण्यात आले की, सेक्सदरम्यान पुरुषांची भरपूर उर्जा खर्ची होते, ज्यामुळे कॅलरी बर्न होते, त्यामुळे त्यांना थकवा जाणवतो आणि त्यांना झोप घेणे आवडते.
3) प्रोलॅक्टिन हार्मोनमुळे डुलकी येते
संभोगदरम्यान जेव्हा पुरुष क्लाइमॅक्स पर्यंत पोहोचतात आणि त्यांना शारीरिक समाधान मिळते, तेव्हा त्यांच्या शरीरात प्रोलॅक्टिन हार्मोन रिलीज होतो, ज्यामुळे त्यांना झोपायला लागते.
4) तणावापासून आराम
चांगले सेक्स संबंध केवळ तणावापासूनच आराम देत नाही तर, मनाला हल्के आणि आनंदित करते. सेक्सदरम्यान रिलीज होणारा लव हार्मोन ऑक्सिटोसिन देखील शरीराला आराम देण्यात मदत करतो, ज्यामुळे केवळ मनच नव्हे तर, स्नायूंचा तणाव देखील कमी होतो आणि पुरुषांना झोप यायला लागते.
हेही वाचा - बहुतांश स्त्रिया अंतर्वस्त्राच्या 'या' प्रकारांपासून अनभिज्ञ