ETV Bharat / sukhibhava

Sleep Necessary Before Exams : परीक्षेपूर्वी झोप आहे महत्वाची, नाहीतर होऊ शकतात हे दुष्परिणाम - सकस आहार

विद्यार्थ्यांना परीक्षेच्या काळात मोठ्या अडचणींना तोंड द्यावे लागते. त्यात परीक्षेच्या काळात विद्यार्थी झोप घेत नाहीत. त्यामुळे परीक्षेच्या अगोदर विद्यार्थ्यांनी किमान ६ तास झोप घेणे गरजेचे असते.

Sleep Necessary Before Exams
संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : Mar 15, 2023, 2:14 PM IST

नवी दिल्ली : परीक्षेचा कालावधी हा विद्यार्थ्यांसह त्यांच्या कुटुंबियांसाठीही मोठा कठीण काळ असतो. त्यामुळे विद्यार्थी कायम तणावात असल्याचे दिसून येते. मात्र या काळात विद्यार्थ्यांसाठी झोप घेणे महत्वाचे असते. विद्यार्थ्यांचे माणसिक संतुलन कायम राखण्यासाठी सकस आहार आणि वेळेवर झोप खूप महत्वाचे असल्याचे दिसून आले आहे. तज्ज्ञांच्या मते परिक्षेच्या अगोदर चांगली गाढ झोप घेणे विद्यार्थ्यांच्या हिताचे असते.

विद्यार्थी घेत नाहीत झोप : बहुतेक नागरिक झोपेला आपल्या आरोग्याचा भाग मानत नाहीत. त्यामुळे झोपेला दुय्यम स्थान देण्यात आल्याने त्याचा परिणाम आपल्या आरोग्यावर पडतो. बहुतेक विद्यार्थी परीक्षेच्या वेळी झोपत नाहीत. त्यानंतर ते मध्यरात्री तेल जाळून त्याचा अभिमान बाळगतात. विद्यार्थ्यांनी अगोदरच्या दिवशीच्या अभ्यासाची उजळणी करणे आवश्यक आहे. शेवटच्या क्षणी विद्यार्थी आपली तयारी करतात. मात्र परीक्षेच्या अगोदरच्या दिवशीच नाही तर परीक्षेच्या १ महिना अगोदर रात्री चांगली झोप घेणे आवश्यक आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपले चित्त स्थिर ठेऊन जसे अभ्यास करणे गरजेचे आहे, तसेच चांगली झोप घेणेही गरजेचे आहे.

वयावर असतो कालावधी : झोपेचा कालावधी व्यक्तीच्या वयावर अवलंबून असतो. लहान मुलांना जास्त झोप घ्यावी लागते. मात्र सुदृढ शरीरासाठी सरासरी आठ ते नऊ तासांची शांत झोप आवश्यक असते. चांगली झोप शरीरातील हार्मोन्स स्थिर ठेवते. त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी, इन्सुलिनचे प्रमाण स्थिर राहण्यास मदत होते. त्यासह शरीरातील कोलेस्टेरॉल, लेप्टिन, आणि कोर्टिसोलची पातळीही संतुलित राखल्या जाते. हे संप्रेरक शरीराच्या योग्य कार्यासाठी आवश्यक आहेत. झोपेच्या अभावामुळे लेप्टिन दाबले जाते. त्यामुळे त्याचा वाईट परिणाम शरीरावर होतो. व्यक्तीला जास्त भूक आणि तहान लागते. रक्तातील साखरेची पातळी योग्य राखली जात नसल्यामुळे इन्सुलिनची पातळी वाढते. त्यामुळे लवकर मधुमेह होण्याचे प्रमाण वाढते. झोपेच्या कमतरतेमुळे कोर्टिसोलची पातळी वाढून शरीरात जळजळ होते.

प्रतिकारशक्ती वर परीनाम : अनियमित झोपेमुळे विद्यार्थ्यांची रोग प्रतिकारशक्ती कमी होते. आजारी अवस्थेत परीक्षेला बसल्याने त्याचा अभ्यासावर परिणाम होतो. कोर्टिसोलची वाढलेली पातळी देखील आकलनशक्ती आणि स्मरणशक्तीमध्ये व्यत्यय आणते. त्यामुळे स्मरणशक्ती कमी होते. गोंधळ होतो. या सर्वांमुळे विद्यार्थ्यांच्या मनात भीती, चिंता आणि तणाव निर्माण होत असल्याचे वृत्त तज्ज्ञांच्या हवाल्याने आयएएनएस या वृत्तसंस्थेने दिले आहे.

अत्यंत महत्त्वाचा घटक : झोप हा आरोग्याचा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. चांगली झोप शरीराचे सेल्युलर पुनरुत्पादन करते. शरीराच्या सर्व अवयवांना एकसंधपणे आणि शक्य तितक्या चांगल्या पद्धतीने कार्य करण्यास मदत करते. सुरक्षित मानसिक वातावरणासह निरोगी शरीर तयार करते. शरीराच्या वाढीसाठी, विकासासाठी आणि परीक्षेसह जीवनातील सर्व आव्हानांना तोंड देण्यासाठी म्हणून झोप हा महत्त्वपूर्ण घटक असल्याचे तज्ज्ञ नमूद करतात.

हेही वाचा - Tips For Manage Obesity : वजन कमी करण्यासाठी वापरा या टीप्स, झटक्यात होईल लठ्ठपणा कमी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.