सुडौल स्तन हे स्रियांच्या सौदर्याचे लक्षण मानले जाते, मात्र अनेक कारणांमुळे त्यांच्यात सैलपणा येतो, जसे योग्य ब्रा चा वापर न करणे किंवा गर्भधारणा, स्तनपान आणि वाढते वय. या पार्श्वभूमीवर सुडौल स्तन मिळवण्यासाठी मदत करणारे काही व्यायाम आम्ही तुमच्याशी शेअर करत आहोत. हे व्यायाम तुम्ही घरीच कुठल्याही अडचणीशिवाय करू शकता.
जर घरी वजन किंवा डंबल नसेल तर, 1 लीटर पाण्याची बाटल वापरण्याचा सल्ला देखील फिटनेस तज्ज्ञ देतात. ज्या महिला स्तनपान करत आहेत त्यांनी डॉक्टरचा सल्ला घेतल्यानंतरच हे व्यायाम करावे.
1) भुजंगासन
![exercises for Firmer breast](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/13188547_cobra-pose.jpg)
हे एक सोपे आसन आहे.
- योगा मॅट किंवा चटईवर पोटावर झोपा.
- तुमचे पाय एकमेकांच्या शेजारी असावे आणि हाथ शरीराच्या दोन्ही बाजूंनी ठेवा.
- आता हळू हळू कंबरेवरील भागाला हातांच्या मदतीने वर उचला, यादरम्यान श्वास आत घ्या.
- आता या अवस्थेत 10 ते 30 पर्यंत मोजा.
- आता हळू हळू पूर्व अवस्थेत परत या.
2) धनुरासन
![exercises for Firmer breast](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/13188547_bow-pose.jpg)
- सर्वात आधी पोटावर झोपा. पायांच्यामध्ये नितंबांइतके अंतर ठेवा आणि हातांना सरळ करा.
- गुडघ्यांना हळू हळू वाकवा आणि आपल्या घोट्यांना हातांनी धरून ठेवा. श्वास घेत छातीला उचला आणि आपल्या पायांना अशा प्रकारे उचला की मांड्या देखील जमिनीवरून वर उठेल. समोर पाहा आणि हसा.
- या आसानात व्यक्ती धनुष्याचा आकार बनवते आणि शरीरात तणाव आणते. या आसनादरम्यान दीर्घ आणि लांब श्वास घेत रहा. 15 ते 20 सेकंद या स्थितीत राहा, मग श्वास सोडत सामान्य व्हा.
3) पुश अप्स
![exercises for Firmer breast](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/13188547_pushups.jpg)
- योग मॅट किंवा चटईवर पोटावर झोपा. दोन्ही हात खांद्यांच्या सरळ दिशेने तळ हातांच्या मदतीने जमिनीवर ठेवा.
- पायांच्या अंगठ्यांना जमिनीवर ठेवा.
- आता हळू हळू कोपर सरळ करत शरीराला वर उचला.
- या अवस्थेत तुमचे शरीर पायांचे अंगठे आणि हातांवर असले पाहिजे.
- आता शरीराला हळू हळू जमिनीच्या दिशेने खाली आणा. या दरम्यान तुमचे हात खांद्यांइतके रुंद असले पाहिजे.
- त्यानंतर तुम्ही पूर्व स्थितीत परत या.
4) डंबल बेंच प्रेस
![exercises for Firmer breast](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/13188547_bench-press.jpg)
- बेंचवर पाठीवर झोपा आणि पायांना जमिनीवर ठेवा.
- आता हळूच हातांची कोपरे वाकवून डंबल छातीकडे घेऊन या.
- आता कोपरे वर घेऊन जात डंबलला वरच्या दिशेने ठेवा.
- हा डंबल बेंच प्रेस 15 ते 20 वेळा पुन्हा करा.
5) डंबल फ्लाई
![exercises for Firmer breast](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/13188547_dumbbell.jpg)
- बेंचवर पाठीवर झोपा. पायांना जमिनीवर ठेवा.
- डंबल पकडून कोपरे मोडत हातांना पंखांसारखे पसरवा. या दरम्यान तुमचे दोन्ही हात जमिनीला समांतर असेल.
- आता दोन्ही डंबल वरच्या दिशेने न्या, येथे तुमचे दोन्ही हात समांतर असणार.
- त्यानंतर पूर्व स्थितीत परत या.
- हा व्यायाम 15 ते 20 वेळा पुन्हा करा.
- जर घरी डंबल नाही तर, 1 लीटर पाण्याच्या बाटलीचा वापर करू शकता.
हेही वाचा - 'हे' पदार्थ कोविड नंतर केस गळण्यापासून आराम देऊ शकतात