कर्करोग असलेल्या रुग्णांना नव्या कोरोना विषाणूचा धोका अधिक आहे, असे प्रतिपादन बसवतारकम इंडो अमेरिकन कॅन्सर हॉस्पिटल येथील मेडिकल ऑन्कॉलॉजिस्ट डॉ. सेंथील राजप्पा यांनी केले आहे. सर्वसामान्य लोकसंख्येत कोविड-19 मुळे होणाऱ्या मृत्यूचा दर 2 ते 3 टक्के आहे तर कर्करोग असलेल्या रुग्णांमध्ये हा दर तब्बल 20 टक्के आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. ईनाडूला त्यांनी दिलेली विशेष मुलाखत...
- कर्करोग असलेल्या रुग्णांवर कोविड-19 चा काय परिणाम होतो?
बहुतांश कर्करोगाच्या रुग्णांचे वय 60 पेक्षा अधिक असते. अनेकांना मधुमेह, उच्च रक्तदाब तसेच इतर समस्या सामान्यपणे आढळून येतात. परिणामी, त्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी असते. केमो आणि रेडिएशन उपचारांमुळे व्यक्तीच्या रोगप्रतिकारक शक्तीचे दमन होऊ शकते. ज्यांना आधीच संसर्ग होण्याची भीती आहे, कोविड-19 त्यांच्यासाठी जीवघेणा ठरु शकतो. कर्करोग असलेल्या रुग्णांमध्ये विषाणूबाबत मोठ्या प्रमाणात संवेदनाक्षमता असते. संसर्ग झाल्यास त्यांना व्हेंटिलेटरचा आधार देण्याची वेळ येऊ शकते. कर्करोग रुग्णांमध्ये मृत्यूची शक्यता असते.
- कर्करोग आधीच प्राणघातक समजला जातो. कर्करोगाच्या रुग्णांना या उद्रेकादरम्यान रुग्णालयात जाण्यापासून परावृत्त करणे शक्य आहे काय?
कर्करोगाच्या रुग्णांवर ठराविक कालावधीनंतर उपचार होणे आवश्यक आहे. परंतु, येथे काही गोष्टी लक्षात घेणे गरजेचे आहे. काही रुग्णांमध्ये 100 टक्के बरे होण्याचे प्रमाण आढळून येते. अशा प्रकारचे खात्रीशीर उपचार पुढे ढकलणे जीवासाठी धोकायदायक आहे. उदाहरणार्थ, जर लवकर निदान झाले तर स्तनांचा कर्करोग पुर्णपणे बरा होऊ शकतो. काही प्रकरणांमध्ये, आम्ही उपचार सुरु ठेवतो, परंतु रोग तसाच राहतो. अशा प्रकरणांमध्ये, उपचारपद्धती या केवळ रुग्णाचे आयुर्मान वाढविण्यासाठी उपयुक्त ठरतात. अशा रुग्णांसाठी आम्ही उपचारांमध्ये किंचित बदल सुचवतो. आम्ही त्यांची शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यास सांगत आहोत. सहसा, पहिल्यांदा उपचार केले जातात, त्यानंतर शस्त्रक्रिया आणि केमोथेरपी केली जाते. सध्याच्या परिस्थितीत, आम्ही प्रथम केमो आणि रेडिओ उपचारपद्धती करीत आहोत. काही लोकांना रुग्णालयात दाखल करण्याची आणि आयव्ही उपचार देण्याची गरज आहे. त्यांना आम्ही तोंडावाटे औषधे लिहून देत आहोत. जर आम्हाला असे वाटले की काही औषधांमुळे रोगप्रतिकारकशक्तीचे दमन होऊ शकते, आम्ही त्यांची (औषधांची) ताकद कमी करण्याचा प्रयत्न करीत आहोत. ज्या रुग्णांनी अगोदरपासून सल्लामसलीतीसाठी वेळ घेऊन ठेवलेली आहे, त्यांना आणखी काही आठवड्यांसाठी वाट बघण्याचा सल्ला दिला जात आहे. जोपर्यंत आणीबाणीची परिस्थिती नाही तोपर्यंत शस्त्रक्रिया शक्य तेवढी पुढे ढकलण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. याद्वारे, आम्ही रुग्णांची संख्या कमी करण्याचा प्रयत्न करीत आहोत.
- दूरसंचार तंत्रज्ञानाद्वारे करण्यात येणाऱ्या उपचारपद्धतीचा (टेलिमेडीसीन) उपयोग होईल?
नक्कीच. आम्ही टेलिमेडिसीनचा सर्वोत्तम उपयोग करीत आहोत. आम्ही रुग्णांना व्हॉटसअॅपच्या माध्यमातून व्हिडिओ कॉलिंग करीत आहोत आणि सुयोग्य सल्ला देत आहोत. कर्करोग असलेल्या रुग्णांना माझा सल्ला आहे की, जर तुम्ही बाहेर पडत असाल तर तुम्ही तुमचे आणि तुमची काळजी घेणाऱ्या व्यक्तीचे आयुष्य धोक्यात घालत आहात. केवळ काही गंभीर लक्षणे आढळून आपल्या रुग्णांना थेट रुग्णालयात आणण्यात यावे.
- कर्करोग असलेल्या रुग्णांनी काय विशिष्ट खबरदारी घ्यावी?
त्यांनी इतर लोकांप्रमाणेच सर्व खबरदारी बाळगावी. त्यांनी पौष्टिक आहार घेणे गरजेचे आहे. कर्करोगाच्या रुग्णांना कोविड-19 च्या पुढील धोक्यांपासून टाळण्यासाठी कुटुंबातील सदस्य आणि काळजी घेणाऱ्या व्यक्तींनी त्यांच्याबरोबर जवळून संपर्क साधण्याचे टाळावे.
हेही वाचा : लॉकडाऊन : सोसायटीवाले बाहेरच्यांना घेत नव्हते आत; मित्राला सुटकेसमध्ये टाकून आणले घरात..