ETV Bharat / state

उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची खुर्ची काढली कक्षाबाहेर; जिल्हा परिषद सदस्यांचा संताप - yavatmal district news

बुधवारी होणारी सर्वसाधारण सभा ऑनलाइन घेण्याचा घाट सत्ताधार्‍यांनी घातला आहे. सभेची नोटीसही अनेकांना मिळाली नाही. प्रोसिडींगची मागणी करुनही दिली गेली नाही, असे आरोप करत संतप्त झालेल्या जिल्हा परिषद सदस्य श्याम जयस्वाल आणि निमिष मानकर यांनी गुरुवारी (दि. 2 सप्टेंबर) सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरविंद गुदधे यांची खुर्ची कक्षाबाहेर काढून संताप व्यक्त केला.

v
v
author img

By

Published : Sep 2, 2021, 8:04 PM IST

यवतमाळ - कोणतेही काम मार्गी लागत नसल्याने आता ऑफलाइन सभेची मागणी केली जात आहे. बुधवारी होणारी सर्वसाधारण सभा ऑनलाइन घेण्याचा घाट सत्ताधार्‍यांनी घातला आहे. सभेची नोटीसही अनेकांना मिळाली नाही. प्रोसिडींगची मागणी करुनही दिली गेली नाही, असे आरोप करत संतप्त झालेल्या जिल्हा परिषद सदस्य श्याम जयस्वाल आणि निमिष मानकर यांनी गुरुवारी (दि. 2 सप्टेंबर) सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरविंद गुदधे यांची खुर्ची कक्षाबाहेर काढून संताप व्यक्त केला.

बोलताना जिल्हा परिषद सदस्य

अनेकांना मिळाली नाही नोटीस

ऑफलाइन सभा घेण्याच्या संदर्भात सत्ताधारी पदाधिकारी व विरोधी पक्षातील सदस्यांनी 27 ऑगस्टला जिल्हाधिकारी अमोल येडगे यांची भेट घेतली. त्यात त्यांनी ऑफलाइन सभा घेता येणार नाही, त्याबाबत कुठलेही निर्देश नसल्याचे सांगितले. मात्र, 90 लोकांना सभागृहात बसण्याची परवानगी दिली जाऊ शकते, असे स्पष्ट केले. जिल्हाधिकार्‍यांच्या पत्राची कुठलिही प्रतीक्षा न करता सत्ताधार्‍यांनी सभेची नोटीस काढून ऑनलाइन सभा घेण्याचा घाट घातला. त्यातही सभा सहा दिवसांवर आली असताना अनेक सदस्यांना गुरुवार (दि. 2)पर्यंत नोटीस मिळाली नाही.

वारंवारच्या उत्तराने सदस्य संतप्त

प्रोसिडींग पंधरा दिवसांपूर्वीच मिळणे आवश्यक आहे. वारंवार मागणी करुनही दिले गेले नाही. अखेर आज (गुरुवार) जिल्हा परिषद सदस्य श्याम जयस्वाल व निमिष मानकर यांनी उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरविंद गुदधे यांच्या कक्षात धडक दिली. व्हिडिओ कॉन्फरन्स असल्याचे सांगून गुदधे जिल्हाधिकारी कार्यालयात निघून गेले. त्यामुळे दोन्ही जिल्हा परिषद सदस्य चांगलेच संतप्त झाले. त्यांनी गुदधे यांची खुर्ची कक्षाबाहेर काढून जिल्हा परिषद कार्यालयाच्या बाहेर आणली. जिल्हा परिषद सदस्यांच्या या पावित्र्यामुळे चांगलीच खळबळ उडाली होती.

हेही वाचा - यवतमाळमध्ये लहान मुलांसह म्युकरमायकोसिसच्या रुग्णांसाठी वेगळ्या वॉर्डाचे नियोजन

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.