ETV Bharat / state

यवतमाळ येथे तरुणाचा निर्घृण हत्या; दोन संशयित ताब्यात

author img

By

Published : May 11, 2021, 2:17 PM IST

यवतमाळ येथे जुन्या वादाच्या कारणावरून एका ३० वर्षीय तरुणाची धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली. त्यावरून उपविभागीय अधिकारी माधुरी बाविस्कर, शहर ठाणेदार प्रदीप शिरस्कर, डॉग स्कॉड, फिंगर एक्सपर्ट आदी घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान घटनास्थळाची पाहणी केली असता तो आरिफ शहा असल्याचे निष्पन्न झाले. त्यांनतर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणी करीता जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविला आहे.

murdered at Yavatmal
तरुणाचा निर्घृण हत्या

यवतमाळ - जुन्या वादाच्या कारणावरून एका ३० वर्षीय तरुणाची धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली. ही घटना शहरातील विठ्ठलवाडी भाजी मंडई परिसरात सोमवार (दि. १०) रात्रीच्या सुमारास घडली. आरिफ शहा (३०) वर्ष असे मृतकाचे नाव आहे.

तरुणाचा निर्घृण हत्या

डॉग स्कॉड, फिंगर एक्सपर्ट आदी घटनास्थळी दाखल -

या प्रकरणी पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील विठ्ठलवाडी परिसरात राहणाऱ्या एका ३० वर्षीय युवकाची धारदार शस्त्राने हत्या झाल्याची माहिती परिसरातील नागरिकांना मिळाली.

दोन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले -

आरिफ शहा विरोधात शहर ठाण्यात अनेक गुन्हे दाखल असून जुन्या वादातूनच हा खून झाल्याचे पोलीस वर्तुळातून बोलल्या जात आहे. या प्रकरणी दोन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार प्रदीप शिरस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस करीत आहे.

हेही वाचा - ठाण्यात आढळला म्युकरमायकोसिसचा पहिला रुग्ण

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.