ETV Bharat / state

पुसदमध्ये भरदिवसा गोळीबार, डोक्यात गोळी लागल्याने तरुणाचा जागीच मृत्यू - Pusad

यवतमाळमधील पुसद येथे भरदिवसा एका तरुणावर दोन अज्ञात व्यक्तींनी गोळीबार करून त्याला ठार केल्याची घटना घडली आहे. दुपारच्या सुमारास पुसद-वाशिम रोडवर हा प्रकार घडला आहे. इम्तियाज खान (32) असे मृत तरुणाचे नाव आहे.

गोळीबार तरुणाचा मृत्यू
गोळीबार तरुणाचा मृत्यू
author img

By

Published : Jul 25, 2021, 7:17 PM IST

यवतमाळ - जिल्ह्यातील पुसद येथे भरदिवसा एका तरुणावर दोन अज्ञात व्यक्तींनी गोळीबार करून त्याला ठार केल्याची घटना घडली आहे. दुपारच्या सुमारास पुसद-वाशिम रोडवर हा प्रकार घडला आहे. इम्तियाज खान (32) असे मृत तरुणाचे नाव आहे.

पुसदमध्ये भरदिवसा गोळीबार, डोक्यात गोळी लागल्याने तरुणाचा जागीच मृत्यू

दुचाकीवरुन आलेल्या दोघांकडून गोळीबार

पुसद-वाशिम रोडवर एका दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात व्यक्तींनी इम्तियाज खान या तरुणावर बंदुकीतून गोळ्या झाडल्या. एक गोळी तरुणाच्या डोक्यात लागल्यामुळे तरुणाचा जागीच मृत्यू झाला. त्याला उपचारासाठी स्थनिक मेडिकेआर रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी त्या युवकाला मृत घोषित केले. इम्तियाज हा मेकॅनिकल इंजिनिअर असून तो पुसद येथील अरुण ले आऊट येथे राहतो. मृतकाचे एसआरएसी मोटर वर्क अण्ड ऑटो गॅरेजचे दुकान आहे. घटनास्थळी पोलीस हजर झाले असून पुढील तपास वसंतनगर पोलीस करीत आहे.

तरुणावर गोळीबार कुठल्या कारणासाठी झाला याचा शोध पोलीस घेत आहे. पुसद येथे वरिष्ठ पोलीस अधिकारी आता अधिक तपास करीत आहेत. मृतकावर आर्म ॲक्ट तसेच वन्य जीव संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल आहे. त्यामुळे गुन्हेगारी पार्श्‍वभूमितून मृतकावर गोळीबार तर झाला नाही ना? याचा सुद्धा तपास पोलीस करत आहे.

हेही वाचा - VIDEO : हिमाचल प्रदेशमधील भूस्खलनाचा थरारक व्हिडिओ; पूल चक्काचूर, 9 पर्यटकांचा मृत्यू

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.