ETV Bharat / state

गोरज फाट्याजवळ युवकाचा मृतदेह आढळला; कारण अस्पष्ट - अस्पष्ट

गावात शुभमचा खून झाल्याची चर्चा आहे. परंतु, मृत्यू कशामुळे झाला हे अद्याप उघडकीस आले नाही.

मृत शुभम झाडे
author img

By

Published : May 16, 2019, 5:26 PM IST

यवतमाळ - मारेगाव तालुक्यातील वनोजादेवी येथे युवकाचा मृतदेह आढळला आहे. गावापासून ३ किलोमीटर अंतरावर असलेल्या गोरज प्रवासी निवाराच्यामागे शुभम अनिल झाडे (२१) याचा मृतदेह आढळला. गावात शुभमचा खून झाल्याची चर्चा आहे. परंतु, मृत्यू कशामुळे झाला हे अद्याप उघडकीस आले नाही.

मारेगाव पोलीस ठाणे

मागील काही दिवसांपासुन शुभम औरंगाबाद येथील कंपनीत कार्यरत होता. गावातील संबंधितांच्या लग्नाप्रसंगी वनोजादेवी येथे २ दिवसापूर्वी तो आला होता. सर्वत्र आनंदाचे वातावरण असताना बुधवारी रात्रीपासून शुभम अचानक बेपत्ता झाला होता. दरम्यान, नातेवाईकांनी त्याचा शोध घेतला. मात्र, शुभमचा त्यांना पत्ता लागला नाही.

गुरुवारी सकाळी शेत शिवारात कामास जाणाऱ्या शेतकऱ्यांना गोरज प्रवासी निवाऱ्यामागे शुभमचा मृतदेह रक्तांनी माखलेल्या अवस्थेत आढळला. यामुळे एकच खळबळ उडाली. शुभमच्या मृत्यूचे रहस्य अद्याप उलगडले नाही. याप्रकरणी मारेगाव पोलीस ठाण्याकडून तपास सुरू आहे.

Intro:वनोजा देवी येथे युवकाचा खुण
गोरज फाट्यानजिक मृतदेह आढळला
खुणाबाबत तर्कवितर्कांना उधानBody:यवतमाळ : मारेगाव तालुक्यातील वनोजादेवी येथील युवकाचा मृतदेह तीन किलोमीटर अंतरावरील गोरज प्रवाशी निवारा मागे उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. मृतक युवकाचा खुन झाल्याची चर्चा असुन वेगवेगळ्या तर्कवितर्कांना उधान आले आहे.
शुभम अनिल झाडे (२१) वनोजादेवी येथील वास्तव्यास असणारा युवक मागील काही दिवसापासुन औरंगाबाद येथे कंपनीत कार्यरत असतांना गावातील संबंधितांच्या लग्न प्रसंगी वनोजादेवी येथे दोन दिवसापुर्वि आला होता. सर्वत्र आनंदाचे वातावरण असतांना बुधवारच्या रात्री पासुन शुभम अचानक बेपत्ता झाला. दरम्यान नातेवाईकांनी ईतरत्र शोध घेतला मात्र थांगपत्ता लागला नाही. गुरुवारला सकाळी शेत शिवारात कामास जाणा-या शेतक-यांना गोरज प्रवाशी निवारा मागे शुभमचा मृतदेह रक्तानी माखलेल्या अवस्थेत आढळल्याने खळबळ उडाली आहे. शुभमच्या मृत्युचे रहस्य अद्याप उलगडले नसुन वेगवेगळ्या तर्कवितर्कांना उधान आले आहे. पुढील तपास मारेगांव पोलीस करीत आहे.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.