ETV Bharat / state

ज्येष्ठांचा अनुभव नवीन पिढीसाठी खजिना - डॉ. दिलीप पाटील

author img

By

Published : Jan 2, 2021, 7:50 PM IST

ज्येष्ठांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. यात आर्थिक, सामाजिक, कौटुंबिक व आरोग्य विषयक बाबींचा समावेश आहे. या कक्षाच्या माध्यमातून नागरिकांच्या तक्रारी व अडचणी सोडविण्यास मदत होईल, असे जिल्हा पोलीस अधीक्षकांनी यावेळी सांगितले.

ज्येष्ठ सुरक्षा कक्षाचे उद्घाटन
ज्येष्ठ सुरक्षा कक्षाचे उद्घाटन

यवतमाळ - आपल्यापेक्षा जास्त उन्हाळे-पावसाळे अनुभवलेल्या या नागरिकांचे कुटुंबासाठी तसेच समाजासाठी मोठे योगदान आहे. आयुष्याच्या उत्तरार्धात त्यांच्या अडचणींचे निराकरण करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांनी व्यक्त केले. ते पोलीस अधीक्षक कार्यालयातीत ज्येष्ठ नागरिक सुरक्षा कक्षेच्या उद्घाटनाप्रसंगी बोलत होते.

जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ म्हणाले, की ज्येष्ठ नागरिकांचे अनुभव हे नवीन पिढीसाठी अमुल्य खजिनाच आहेत. पोलीस विभागामार्फत ज्येष्ठ नागरिकांच्या विविध तक्रारींचे निराकरण करण्यासाठी तसेच त्यासंबंधातील प्रकरणे संवेदनशीपणे हाताळण्यासाठी जिल्हा समन्वय समिती नेमण्यात आली आहे.

ज्येष्ठ सुरक्षा कक्षाचे उद्घाटन
ज्येष्ठ सुरक्षा कक्षाचे उद्घाटन

हेही वाचा-बापाची निर्घृण हत्या करणाऱ्या मुलाला जन्मठेपेची शिक्षा

ज्येष्ठांबाबतचा प्रत्येक प्रश्न कायद्याने न सोडविता समुपदेशाने सोडविला जाईल-

ज्येष्ठांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. यात आर्थिक, सामाजिक, कौटुंबिक व आरोग्य विषयक बाबींचा समावेश आहे. या कक्षाच्या माध्यमातून नागरिकांच्या तक्रारी व अडचणी सोडविण्यास मदत होईल, असे जिल्हा पोलीस अधीक्षकांनी यावेळी सांगितले. कक्षात आलेल्या प्रत्येकाच्या तक्रारीची योग्य दखल घेतली जाणार आहे. ज्येष्ठांबाबतचा प्रत्येक प्रश्न कायद्याने न सोडविता समुपदेशाने सोडविला जाईल, अशी ग्वाही पोलीस अधीक्षक भुजबळ पाटील यांनी दिली. मात्र, काही प्रकरणात आवश्यक असल्यास कायदेशीर कारवाईसुध्दा करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा-पिंपरीत 80 तळीरामांवर कारवाई; चलनातून एका दिवसात 12 लाखाहून दंड
राज्यातील पहिल्यांदाच ज्येष्ठांसाठी सुरक्षा कक्ष -

ज्येष्ठ नागरिक सुरक्षा कक्षाच्या 9112240466 या क्रमांकावर भ्रमणध्वनीने संपर्क साधून रितसर तक्रार नोंदविण्याचे पोलिसांनी आवाहन केले आहे. तसेच महिला व बाल अत्याचार प्रतिबंध कक्षाच्या 9112240465 या क्रमांकावर महिला व बालकांसंबंधी तक्रार असल्यास संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.