ETV Bharat / state

Yavatmal Robbery 10 लाख रुपयांच्या दरोड्याचा 24 तासात छडा, तिघांना ठोकल्या बेड्या

author img

By

Published : Aug 20, 2022, 4:33 PM IST

किराणा व्यवसायाची वसुली करून येत असताना तीन दुचाकीवर आलेल्या सात जणांनी व्यावसायिकाला मारहाण beating businessman करून लाखोंची रोकड पळविल्याची घटना Yavatmal Businessman Robbery बुधवारी ता. 17 महागाव तालुक्यात घडली होती. यवतमाळच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने टोळीतील तिघांना जेरबंद करून तीन लाख 42 हजारांची रोकड जप्त केली, अशी माहिती पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांनी दिली. Yavatmal police arrested robbers

yavatmal police arrested three people
यवतमाळात 10 लाख रुपयांच्या दरोड्याचा 24 तासात छडा

यवतमाळ किराणा व्यवसायाची वसुली करून येत असताना तीन दुचाकीवर आलेल्या सात जणांनी व्यावसायिकाला मारहाण beating businessman करून लाखोंची रोकड पळविल्याची घटना Yavatmal Businessman Robbery बुधवारी ता. 17 महागाव तालुक्यात घडली होती. यवतमाळच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने टोळीतील तिघांना जेरबंद करून तीन लाख 42 हजारांची रोकड जप्त केली, अशी माहिती पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांनी दिली. Yavatmal police arrested robbers

यवतमाळ स्थानिक गुन्हे शाखा पथकाचे पोलीस अधिकारी माहिती देताना

भररस्त्यात हल्ला करून पळविली रोकड पोलिस अधीक्षक कार्यालयात शुक्रवारी (ता.19) आयोजित पत्रकार परिषदेत एसपी भुजबळ बोलत होते. महागाव येथील व्यापारी अनिल शर्मा हे बुधवारी ता. 17 ऑगस्ट रोजी नांदेड जिल्ह्यातील वाईबाजार, सारखनी, माहूर येथून किराणा मालाच्या उधारीचे दहा लाख रुपये घेऊन येत होते. खडका फाटा पुलावर तीन दुचाकीवर आलेल्या सात जणांनी त्यांना अडवून डोळ्यात मिरची पूड फेकली. चाकूने हल्ला करून दहा लाखांची रोकड असलेली बॅग पळवून नेली. yavatmal businessman money robbery याप्रकरणी महागाव पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. स्थानिक गुन्हे शाखा पथकाला महागाव पोलिसांनी घटनास्थळ दाखविले. सीसीटीव्ही फुटेज व सायबर सेल यांच्या तांत्रिक मदतीने गुन्ह्याच्या तपासास सुरुवात केली.

लुटलेल्या रकमेपैकी 42 हजारांची रोकड जप्त पोलिस अधीक्षकांना मिळालेल्या माहितीच्या आधारे तपास माहूरच्या दिशेने केंद्रित करण्याचे निर्देश पथकाला दिले. प्रारंभी माहूर येथून एकाला ताब्यात घेतले. त्याच्याकडून दुसर्‍या आरोपीची माहिती मिळाली. दोघांना विचारपूस केली असता, त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. आरोपीच्या शोधासाठी इतरही पथके कामाला लावली. त्यात तिसरा आरोपी पोलिसांच्या हाती लागला. आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेली दोन दुचाकी, तीन मोबाईल, लुटमार केलेल्या रकमेपैकी तीन लाख 42 हजारांची रोकड जप्त करण्यात आली. या गुन्ह्याचा 24 तासांत उलगडा करण्यात पोलिसांना यश आले. ही कारवाई पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ, अपर अधीक्षक खंडेराव धरणे, एसडीपीओ प्रदीप पाडवी यांच्या मार्गदर्शनात एलसीबीचे पोलिस निरीक्षक प्रदीप परदेशी, महागावचे ठाणेदार विलास चव्हाण, सहायक पोलिस निरीक्षक गणेश वनारे, विवेक देशमुख, संजय खंडारे, सायबर सेलचे विकास मुंडे, नीलेश पेंढारकर, पंकज पातुरकर, विनोद राठोड, किशोर झेंडेकर, नीलेश राठोड, वसीम शेख, ताज मोहमद, अजय निंबोळकर आदींनी केली.

पथकाला 25 हजारांचे बक्षीस दरोड्याचा गुन्हा हा गंभीर व आव्हानात्मक होता. पोलिस पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी कौशल्याचा व नैपुण्याचा पुरेपूर वापर करून गुन्हा उघडकीस आणला. तपास पथकास 25 हजार रुपये, सी नोट, जीएसटी असे प्रोत्साहनपर बक्षीस पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांनी जाहीर केले.

हेही वाचा एव्हरग्रीन हॉटेलमध्ये प्रेयसीला नेलं अन् केला असा प्रयत्न की ती पण हादरली

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.