यवतमाळ - जिल्ह्यात गेल्या 24 तासात 64 जण पॉझिटिव्ह आले असून एका कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला आहे, तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालाच्या आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हिड केअर सेंटर आणि कोव्हिड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेले 10 जण कोरोनामुक्त झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. मृतांमध्ये पुसद येथील 64 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार सोमवारी (दि.2) एकूण 354 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 64 जण नव्याने पॉझिटिव्ह तर 290 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले. जिल्ह्यात सद्यस्थितीत 363 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. तसेच आतापर्यंत एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 10 हजार 290 झाली आहे. आज 10 जणांना सुटी मिळाल्याने सुरुवातीपासून बरे झालेल्यांची एकूण संख्या 9097 आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 347 मृत्यूंची नोंद आहे. सुरुवातीपासून आतापर्यंत 91 हजार 817 नमुने पाठविले असून यापैकी 91 हजार 435 प्राप्त तर 382 अप्राप्त आहेत. तसेच 81 हजार 145 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आले आहेत.