ETV Bharat / state

यवतमाळ : आयसोलेशन वॉर्डातून 31 जणांना सुट्टी, तर 73 जणांचे अहवाल निगेटिव्ह

author img

By

Published : Apr 13, 2020, 7:40 PM IST

वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्डमधून 31 जणांना घरी सोडण्यात आले आहेत. तर 73 जणांचे कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तसेच एका रुग्णाचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या सध्या 9 झाली आहे.

corona
कोरोना

यवतमाळ - वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्डात दाखल असलेल्या 31 जणांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. मात्र, प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून पुढील 14 दिवस त्यांना त्यांच्या घरी आरोग्य विभागाच्या निगराणीखाली क्वारंटाईन रहावे लागणार आहे, असे वैद्यकीय महाविद्यालयाचे कोरोना नियंत्रण समन्वयक डॉ. मिलिंद कांबळे यांनी सांगितले.

वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय

नागपूर येथे तपासणीकरीता पाठवण्यात आलेल्या नमुन्यांपैकी 11 एप्रिलच्या रात्रीपासून आतापर्यंत एकूण 74 रिपोर्ट वैद्यकीय महाविद्यालयाला प्राप्त झाले आहे. यापैकी 73 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह असून एक रुग्णाचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आहे. हा व्यक्ती यवतमाळ येथील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या थेट संपर्कात आला होता. तसेच गेल्या आठवड्यापासून तो आयसोलेशन वॉर्डात भरती आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रुग्णांची एकूण संख्या आता 9 झाली आहे. सद्यस्थितीत आयसोलेशन वॉर्डात 154 जण आहेत. तसेच सोमवारी 15 नमुने चाचणीसाठी नागपूरला पाठवण्यात आले आहेत.

हेही वाचा... जनतेचा सलाम ! एकाचा मृत्यू तर दुसरा मुलगा व्हेंटिलेटर; तरीही पोलीस कर्मचारी कर्तव्यावर रुजू

सद्यस्थितीत गृह विलगीकरणातील नागरिकांची संख्या 387 आहे. यात शहरातील प्रतिबंधित क्षेत्रातील नागरिकांचासुध्दा समावेश आहे. 64 लोकांचे संस्थात्मक विलगीकरण करण्यात आले आहे. यापैकी 23 जण अल्पसंख्याक मुलींचे वसतीगृह येथे तर 41 जण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या मुलांच्या वसतीगृहात आहेत. पॉझेटिव्ह असलेल्या नागरिकांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांनी स्वत:हून यंत्रणेसमोर यावे व आरोग्य तपासणी करून घ्यावी. यासाठी 07232 - 240720, 07232 - 239515, टोल फ्री क्रमांक 104 उपलब्ध करून देण्यात आले आहे. कोव्हिड - 19 या विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी शासन आणि जिल्हा प्रशासनाने दिलेल्या सुचनांचे नागरिकांची पालन असे आवाहन जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी केले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.