ETV Bharat / state

यवतमाळ जिल्हा सहकारी बँकेला भीषण आग, १० वर्षांतील रेकॉर्ड जळाले - fire

यवतमाळ येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या इमारतीच्या वरच्या मजल्यावर ही आग लागली असून यामध्ये अकाउंट विभागाचा अर्धा भाग तर शेती विभागाचा पूर्ण भाग जळून खाक झाला आहे.

यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला लागलेली आग
author img

By

Published : May 9, 2019, 9:59 AM IST

Updated : May 9, 2019, 2:26 PM IST

यवतमाळ - जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला बुधवारी मध्यरात्रीनंतर भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीमध्ये शेतकऱ्यांच्या मागील १० वर्षांतील नोंदी असलेल्या जुन्या कागदपत्रांसह संगणक, फर्निचर व इतर साहित्य जळून खाक झाले आहे. शॉर्टसर्किटमुळेच ही घटना घडली असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला लागलेली आग

यवतमाळ शहर पोलीस ठाण्याला लागून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आहे. रात्री आग लागताच बँकेच्या चौकीदारांनी प्रशासकीय अधिकारी आणि बँकेचे मुख्य अधिकारी दीपक देशपांडे यांना तत्काळ घटनेची माहिती दिली. इमारतीच्या वरच्या मजल्यावर ही आग लागली असून यामध्ये अकाउंट विभागाचा अर्धा भाग तर शेती विभागाचा पूर्ण भाग जळून खाक झाला आहे. मात्र, गेल्या १० वर्षांतील बँकेत सीबीएस प्रणाली असल्यामुळे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसंदर्भात कुठलाच डाटा नाही. तसेच बँकेची पदभरती ऑनलाइन पद्धतीने असल्यामुळे आगीचा कुठलाही परिणाम त्यावर झाला नसल्याचे मुख्याधिकारी देशपांडे यांनी सांगितले.

या आगीच्या घटनेत २५-३० संगणक, कपाटे, फर्निचर यांचे नुकसान झाले आहे. मात्र, नेमके किती रुपयांचे नुकसान झाले हे सध्यातरी सांगता येणार नसल्याचे देशपांडे म्हणाले. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक जुनी आहे. त्यामुळे या बँकेत शॉर्टसर्किटमुळे आग लागण्याची शक्यता असल्याचेही संभावना मुख्याधिकारी देशपांडे यांनी वर्तवली आहे. त्याचप्रमाणे १० वर्षांतील रेकॉर्ड जळून खाक झाले असले तरी बँकेत सीबीएस प्रणाली असल्यामुळे हा डेटा रिकव्हर करण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

Intro:यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला आग Body:यवतमाळ- यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला रात्रीला भीषण आग लागली आहे. यवतमाळ शहरातील या मुख्य शाखेला रात्री 3 च्या सुमारास आग लागली यात बँकेतील महत्त्वाची कागदपत्रे आणि साहित्य जळून राख झाली आहे.
ही आग नेमकी कशाने लागली याची माहिती अजून कळू शकले नाही. या बँकेच्या सोमरस नगरपालिका असून या पालिकेचा अग्निशमन बंबाने आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले.
या आगीमध्ये मध्यवर्ती बँकेचे महत्त्वाची कागदपत्रे जळून खाक झाल्याची माहिती देण्यात आली. बँकेच्या 143 रिक्त जागेची पदभरती ची परीक्षा जून महिन्यात घेण्यात येणार होती. यामध्ये ही कागदपत्रे असल्याची चर्चा सुरू आहे. बँकेच्या भरती संदर्भात संचालकांनी प्रत्येकी एक ते दोन उमेदवारी वाटून घेण्यात आल्याने या संदर्भात पैशाची उमेदवाराकडून व्यवहारी झाले आहेत. मात्र काही दिवसांपासून या संचालकांमध्ये वाद निर्माण झाल्याने ही कागदपत्रे जाळली याचीही चर्चा सध्या जोर धरत आहे.
सहकार खात्याने शासकीय अध्यादेश काढून कुठल्याही सहकारी संस्थेवर केवळ 21 संचालक त्याची नेमणूक करण्याचे आदेश काढण्यात आले होते. या निर्णयाच्या विरोधात बँकेतील काही संचालक न्यायालयात गेले होते. त्यामुळे मागील १२ वर्षापासून या बँकेचे संचालक मंडळाची निवडणूक झालेली नाही. राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात असलेली ही बँक भाजपची सत्ता येतात भाजपचे संचालक अमन गावंडे यांना अध्यक्षपदि बसवण्यात आले. त्यामुळेच नाबार्डकडून मध्यवर्ती बँकेच्या रिक्त 143 पदाची भरतीला मंजुरात देण्यात आली होती. या लागलेल्या आगीमध्ये बँकेच्या महत्त्वाचे कागदपत्रासह भरतीचे कागदपत्रे जाळण्यात आली तर नाही ना अशी चर्चा यवतमाळ शहरात सध्या सुरू आहे.
Conclusion:
Last Updated : May 9, 2019, 2:26 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.